Tuesday, January 7, 2025

सीताबर्डी येथे मनपाची अवैध पथविक्रेत्याच्या विरोधात धडक कारवाई

नागपूर:- सीताबर्डी येथे मनपाच्या प्रवर्तन विभागातर्फे अवैध पथविक्रेत्याच्या विरोधात मंगळवार (ता. ७) रोजी सकाळपासून धडक कारवाई करण्यात आली.आज मंगळवार रोजी सकाळपासून मनपाच्या प्रवर्तन विभागातर्फे सीताबर्डीत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईला  सुरूवात करण्यात आली. यावेळी पोलिस उपायुक्त श्री अर्चित चांडकमनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री अजय चारठाणकरसीताबर्डी पोलिस विभाग प्रमुख एएसआई  प्रेम वाघमारेमनपाच्या अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त हरीश रात उपस्थित होते. सहायक आयुक्त हरीश राउत यांच्या मार्गदशनाखालीअतिक्रम पथक प्रमुख श्री भास्कर माळवेश्री शहदाब खानश्री संजय कांबळेउपद्रव्य शोध पथकाचे सुधीर सुडकेश्री विजय पिल्लेश्री मंजल पटले यांच्या पथकाने सकाळी ११ वाजेपासून  टेम्पल 
रोडवरील महाजन मार्केट येथे महानगरपालिकेच्या निवारा केंद्राजवळील हातठेलेपानटपरीचे दुकाने यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर पथकातर्फेमानस चौकमोदी नंबर १,२ आणि ३ आणि व्हेरायटी चौकपंचशील चौक येथे कारवाई केली. यावेळी एकून ७ ट्रक माल जप्त करण्यात आले. यात हातठेलेकपड्याचे स्टॅन्डकाउंटरस्टॅचू  दुकानाचे साईन बोर्ड यांचा समावेश होता. ही कारवाई मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. महाल नंगा पुतला, इतवारी, टी.व्ही. टावर सेमिनरी हिल्स येथे ही प्रवर्तन पथकाने कारवाई केली.

महापालिका आयुक्तांच्या पाहणीनंतर पोलिस आयुक्तालयात आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील अतिक्रमण निर्मूलनासंदर्भात आवश्यक उपाययोजनांबाबत बैठक झाली. यामध्ये अतिक्रमण कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १०० पोलिसांचा विशेष ताफा गठित करण्याचा निर्णय झाला आहे. हा ताफा महापालिकेकडून शहरात ज्याठिकाणी कारवाई होईल तिथे सहकार्य करेलअसा निर्णय घेतला. अतिक्रमण काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष ताफ्याच्या सहकार्याने महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यांना मोकळे करण्याची कारवाई सुरू झाली आहे. 







अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांची वाहनेठेलेइतर विक्रेत्यांचे हातठेले सर्रासपणे उभे राहत असल्याने वाहतुकीला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. काही रस्त्यांवर तर यामुळे वाहतूक कोडींची समस्याही निर्माण  होत असते.  यासाठी पोलिसांचे विशेष पथक उपलब्ध झाल्याने या कारवाई अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. कारवाई करताना नागरिकांची गैरसोय होणार नाहीयाची काळजी घेण्यात आली आहे.
 

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...