Monday, January 13, 2025

मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित करुन दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी व नियोजनाच्या संदर्भात आयुक्तांनी सोमवारी (ता.१३) सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनपा मुख्यालतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलअतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकरउपायुक्त श्रीमती विजया बनकरउपायुक्त सर्वश्री विजय देशमुखमिलींद मेश्रामप्रकाश वराडेगणेश राठोडअशोक गराटेपरिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधवउपायुक्त उपायुक्त डॉ. रंजना लाडेअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारडॉ. श्वेता बॅनर्जीउद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगारसहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसेहरीश राऊतघनश्याम पंधरेनरेंद्र बावनकरविजय थुलमुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी निश्चित केलेल्या प्रत्येक बाबींवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मनपा आयुक्तांनी नागपूर महानगरपालिकेचे संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करणे तसेच संकेतस्थळ ‘यूजर 


फ्रेंडली’ करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. मनपाने सुरु केलेल्या सर्व सेवांचा संकेतस्थळामध्ये अंतर्भाव करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मनपा आणि झोन कार्यालयांच्या सखोल स्वच्छतेचे देखील आयुक्तांनी निर्देश दिले. मनपाच्या दहाही झोनमध्ये स्वच्छता स्पर्धा घेण्याची देखील त्यांनी सूचना केली. झोन कार्यालय तसेच परिसरात देखील स्वच्छता राखली जावीकार्यवाहीमध्ये जप्त साहित्यवाहन आदी पडून असल्यास ते अन्य ठिकाणी जमा करुन त्यांच्या निर्लेखनाची कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागामध्ये लावलेल्या विभागांच्या माहिती फलकावरील माहिती अद्ययावत करणे तसेच मुख्यालय झोनमध्ये पिण्याचे पाणीअभ्यागत कक्ष यांची व्यवस्था देखील अद्ययावत करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले.तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रारी निकालात काढण्याची गती वाढविण्याबाबत सुद्धा आयुक्तांनी निर्देशित केले. पोर्टलसोबतच मनपा मुख्यालय तसेच झोनमध्ये नागरिकांकडून देण्यात येणाऱ्या तक्रारी व त्यावरील प्रतिसाद याचे रेकॉर्ड ठेवून प्रलंबित सर्व निकाली काढणे व तक्रारींच्या निराकरणासंदर्भात झोनस्तरावर चमू तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आयुक्तांनी नोडल विभाग म्हणून जबाबदारी निश्चित केली.

No comments:

Post a Comment

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...