Thursday, March 13, 2025

तूर, उडीद आणि मसूर यांचे 100% उत्पादन किमान हमी भावाने खरेदी करण्यासाठी सरकार वचनबद्ध

नवी दिल्‍ली:- भारत सरकारने एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान(पीएम-आशा) ही योजना 15 व्या वित्त आयोगाच्या काळात 2025-26 पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे. एकात्मिक पीएम आशा योजना ही खरेदी प्रक्रियेची अंमलबजावणी अधिक प्रभावी पद्धतीने करण्यासाठी राबवली जातेजी शेतकऱ्यांना केवळ त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव देण्यासाठीच मदत करत नाही तर ग्राहकांना परवडण्याजोग्या दरात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करून दरातील संवेदनशील चढउतारांवर नियंत्रण देखील ठेवते. एकात्मिक पीएम-आशा योजनेच्या भाव हमी योजने अंतर्गत अधिसूचित डाळीतेलबिया आणि सुके खोबरे यांची विहित न्याय्य सरासरी दर्जाला अनुसरून पूर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून राज्य स्तरीय संस्थांच्या माध्यमातून  केंद्रीय नोडल संस्थांद्वारे किमान हमी भावाने खरेदी केली जाते. डाळींचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनलाभ देण्यासाठीआणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने 2024-25 या खरेदी वर्षासाठी राज्याच्या उत्पादनाच्या 100% इतकी तूरउडीद आणि मसूर 
किमान हमी भावाने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.सरकारने 2025 च्या अर्थसंकल्पात अशी देखील घोषणा केली आहे की देशातील डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सींद्वारे पुढील चार वर्षांसाठी 2028-29 पर्यंत राज्याच्या उत्पादनात 100% तूरउडीद आणि मसूरची खरेदी केली जाईल.त्यानुसारकेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तूर(अरहर)मसूर आणि उडदाची अनुक्रमे  13.22 एलएमटी, 9.40 एलएमटी आणि 1.35 एलएमटी खरेदी करायला मान्यता दिली आहे. त्यांनी 2024-25 च्या खरीप हंगामासाठी हमीभाव योजने अंतर्गत महाराष्ट्र


आंध्रप्रदेशछत्तीसगडगुजरातहरियाणाकर्नाटकमध्य प्रदेशतेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एकूण 13.22 एलएमटी तूर खरेदीला मान्यता दिली.महाराष्ट्रआंध्र प्रदेशगुजरातकर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये खरेदी आधीच सुरू झाली आहे आणि 11.03.2025 पर्यंत या राज्यांमध्ये एकूण 1.31 एलएमटी तूर (अरहर) खरेदी करण्यात आली आहे जिचा लाभ या राज्यांमधील 89,219 शेतकऱ्यांना मिळाला आहे. इतर राज्यांमध्येही तूर खरेदीला लवकरच सुरुवात होईल. नाफेडचे ई-समृद्धी पोर्टल आणि एनसीसीएफचे असंयुक्ती पोर्टलवर देखील पूर्व-नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली जाते. भारत सरकार नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सींद्वारे शेतकऱ्यांकडून 100% तूर खरेदी करण्यास वचनबद्ध आहे.

मनपा विद्यार्थ्यांनी केली दुर्गुणांची होळी अनोख्या संकल्पनेचे कौतुक : वाईट सवई सोडण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या प्रियदर्शिनी मराठी उच्च प्राथमिक शाळा फुटाळा येथील विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता.१३) दुर्गुणांची होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी विविध वाईट गुण कागदावर लिहिले आणि त्याचे होळीसोबत दहन केले. आपल्यातील दुर्गुणांचे दहन करुन नियमित चांगल्या सवयी अंगीकारण्याचा संकल्प चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केला. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वसुधा वैद्य यांच्या संकल्पनेतील या अभिनव उपक्रमाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरीअतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी कौतुक केले.विद्यार्थ्यांमध्ये अनेक वाईट सवयी अथवा दुर्गुण असतात. खोटे बोलणेचोरी करणेआज्ञा न पाळणेमोबाईलवर घातक खेळ खेळणेस्वच्छता न राखणेमारामारी करणेशिव्या देणे वगैरे या सर्व दुर्गुणांचे दहन 
करुन विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्याची संकल्पना प्रियदर्शिनी मराठी उच्च प्राथमिक शाळा फुटाळा येथील मुख्याध्यापिका डॉ. वसुधा वैद्य यांनी मांडली. त्यानुसार विद्यार्थ्यांचे सुमारे १५ दुर्गुण एकेका कागदावर लिहिण्यात आले. हे फलक विद्यार्थ्यांच्या हातात देउन त्यांनी या सर्व दुर्गुणांना मनातूनआचरणातून काढून टाकण्यासाठीविद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्यासाठी 'होळी रे होळी दुर्गुणांची होळीअशा आवेशपूर्ण घोषात  त्यांच्याकडूनच ही दुर्गुणांची होळी करण्यात आली.फुलांची उधळण आणि एकमेकांना गुलाल लावून होळी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री. गवरेश्रीचावरे,  श्री. शेंडेश्रीमती मोहरीरश्रीमती घायवाटश्रीमती हटवारश्री. उरकुडे,  श्री. बबनराव चौधरी तसेच माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

कायाकल्प पुरस्कार विजेत्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सन्मान मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

नागपूर:- महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कायाकल्प पुरस्कार विजेत्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंगळवारी (ता.१) सन्मानित करण्यात आले.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये मंगळवारी (ता.१) छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारमाता व बाल संगोपन 
अधिकारी डॉ. सरला लाडहिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजूषा मठपतीशहर प्रमुख व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकमशहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. राजेश बुरेझोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.शिल्पा जिचकारडॉ. दीपांकर भिवगडेडॉ. सुनील कांबळेडॉ.ख्वाजा मोईनुद्दीनपीएचयू अर्चना खाडे आदी उपस्थित होते. राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 
कायाकल्प पुरस्कार योजनेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम पुरस्कार प्राप्त केला. केंद्राला राज्य सरकारच्या वतीने २ लक्ष रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने द्वितीय तर कपिल नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने तृतीय क्रमांक प्राप्त केला. दोन्ही विजेत्यांना अनुक्रमे १.५० लक्ष व १ लक्ष रुपये पुरस्कार राशी प्रदान करण्यात आली. याशिवाय नाराशांतीनगरफुटाळाजगन्नाथ बुधवारीजयताळाबाबुलखेडाडिप्टी सिग्नलके.टी.नगरमानेवाडाचिंचभवनशेंडे नगरभालदारपुरापाचपावलीसोमलवाडा व बिडीपेठ या १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी या यशाबद्दल वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय आरोग्य
अधिकारी तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या चमूचे विशेष अभिनंदन केले.कायाकल्प योजने अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील तसेच महानगरपालिकेतील सरकारी रुग्णालयप्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा सहभाग असतो. महानगरपालिका स्तरावरील आरोग्य विभागाचे एक पथक अंतिम परीक्षण करते. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी कायाकल्प सूचीनुसार अंमलबजावणी केली. त्यानुसार आरोग्य केंद्रातील स्वच्छताबाह्यरुग्ण विभागरुग्णांना बसण्याची व्यवस्थापिण्याचे पाण्याची व्यवस्थासंस्थेची देखभाल,जैविक कचरा व्यवस्थापनजंतू संसर्ग व्यवस्थापन इत्यादी सर्व बाबींवर मुल्यांकन करून गुणांकन करण्यात आले. यात नागपूर महानगरपालिकेच्या झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने सर्वाधिक ९८.३० टक्के गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने ९७.९० टक्के गुणांसह उपविजेतेपद आणि कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने ९४.६० टक्के गुणांसह तृतीय पुरस्कार प्राप्त केला. कायाकल्प पुरस्कारा संदर्भात मनपाचे शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. राजेश बुरे यांनी सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सर्व बाबींबाबत योग्य ते समन्वय व मार्गदर्शन दिले.
 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 48 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  गुरुवार (13)  रोजी शोध पथकाने  48  प्रकरणांची नोंद करून  रु. 41,000/- रुपयाचा दंड  वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 24  प्रकरणांची नोंद करून  रु.9,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु.100/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली. दुकानदाराने रस्ता
फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल
, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून रु.14,500/- रुपयांची वसुली करण्यात आली.  सार्वजनिक रस्ता, फटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे व साठवणे टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु.2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून रु.2,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून रु.7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. 
ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने हनुमान नगर झोन अंतर्गत मे. श्री राम बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला व मे. शीव गौरी ईल्कट्रोनीक्स यांनी दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जवळच्या फूटपाथ परिसरात टाकल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला असे एकुण रू. 15,000/- दंड वसुल करण्यात आला.  धंतोली झोन अतंर्गत रॉयल गोंडवाडा स्कूल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अतंर्गत राम भंडार यांनी रेस्टॉरंटमधील अन्न/जेवणाचे पदार्थ टाकल्याने चेंबरमध्ये अडथळा निर्माण करण्याबद्दल 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अतंर्गत नाईक रियालिटीज यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 05 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.
 

Wednesday, March 12, 2025

मनपा करणार शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण सर्वेक्षणाकरिता आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण : नागरिकांना सहकार्य करण्याचे आयुक्तांनी केले आवाहन

नागपूर:- केंद्र सरकारराज्य सरकार आणि नागपूर महानरगपालिकेद्वारे दिव्यांगांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. मात्र दिव्यांगांची एकत्रिट डाटा उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत योजना पोहोचविण्यात अडचण निर्माण होते. शहरातील कुणीही दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित राहू नये याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे लवकरच शहरातील दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मनपाच्या आशा सेविका हे सर्वेक्षण करणार असून यासंदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये बुधवारी (ता.१२) हे प्रशिक्षण कार्य पार पडले. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलसमाज विकास विभागाच्या 
उपायुक्त डॉ. रंजना लाडेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारमहात्मा गांधी सेवा संघाचे प्रकल्प संचालक श्री. विजय कान्हेकरनीलेश छडवेलकर आदींची उपस्थिती होती. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य आणि समाज विकास विभागाद्वारे बुधवारी (ता.१२) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये महात्मा गांधी सेवा संघ यांच्या माध्यमातून दिव्यांग सर्वेक्षणाबाबत आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त बोलत होते.यावेळी बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिव्यांगांच्या सर्वेक्षणामुळे पुढील काळात दिव्यांगांच्या
उत्थानासाठी कृती आराखडा निश्चित होईल व यात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे ठरेलअसा विश्वास व्यक्त केला. केंद्रराज्य आणि मनपाच्या सर्व योजनांचा प्रत्येक दिव्यांगाला लाभ पोहोचून त्याच्या जीवनात सुलभता निर्माण करणे हा मनपाचा मानस आहे. मात्र अनेक दिव्यांग माहितीअभावी व कागदपत्रांच्या अभावी योजनांपासून वंचित राहतात. या सर्व कल्याणकारी योजनांचा दिव्यांगांना लाभ पोहोचविण्यासाठी सर्वेक्षण महत्वाचे पाऊल ठरणार आहे. दिव्यांगांचे सर्वेक्षण करताना दिव्यांगत्वाचे प्रकारत्यांचे यूडीआयडी कार्डआधार कार्ड तसेच इतर माहिती देखील घेतली जाणार आहे. ज्यामुळे पुढील काळात त्याची पूर्तता करुन त्यांना योजनांपासून लाभान्वित करण्यात येईल. यासाठी सर्वेक्षण करण्यात येत असून यात आशा सेविकांची भूमिका महत्वाची आहे. 


आरोग्य विभागाशी संबंधित विविध कार्य करताना आशा स्वयंसेविकांचा थेट संपर्क नागरिकांशी येतो. नेहमी त्यांच्या संपर्कात येत असल्यामुळे नागरिकांकडून योग्य माहिती मिळविण्यात आशा सेविकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. योग्य आणि बिनचूक माहितीमुळे पुढील काळात मोठा डाटाबेस’ मनपाकडे तयार होईलअसाही विश्वास डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी नागरिकांना सुध्दा या सर्वेक्षणाच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक करताना अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सर्वेक्षणाची संकल्पना विषद केली. जागतिक बँकेच्या अहवालानुसार कोणत्याही देशात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ५ ते ८ टक्के एवढे दिव्यांगांचे प्रमाण असते. कुटूंबातील एक व्यक्ती दिव्यांग असल्यास संपूर्ण कुटूंबाची दिनचर्या त्या व्यक्तीच्या अनुरूप सुरु असते. अशा स्थितीत दिव्यांगांना आधार देण्यासाठी अनेक योजना कार्यरत आहेत. 
या योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आधी दिव्यांगांची ओळख निश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वेक्षण महत्वाचे ठरणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरातील दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवन सुकर करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने दिव्यांगांच्या सर्वेक्षणाचे महत्वाचे पाऊल उचलले आहेअसेही त्या म्हणाल्या.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी प्रशिक्षणादरम्यान आशा सेविकांद्वारे उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे निराकरण केले. प्रशासकीय पातळीवरील महत्वाच्या प्रश्नांचे देखील त्यांनी उत्तरे दिली. आशा स्वयंसेविकांनी अनेक सर्वेक्षण यशस्वीपणे पार पाडून शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका निभावली आहे. डेंग्यूचिकुन गुनिया आदींच्या सर्वेक्षणामुळे रुग्णसंख्येत यावर्षी मोठी घट झाली. 



गरोदर माताबालकांचे आरोग्य व लसीकरण याबाबत नियमित सुरु असलेल्या सर्वेक्षणाची देखील त्यांनी दखल घेऊन कौतुक केले. मोबाईल ॲपवरुन ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरुपात हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये वैद्यकीय आरोग्य विभाग
समाज विकास विभागमहात्मा गांधी सेवा संघ यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे सहकार्य असणार आहेअसेही डॉ. सेलोकर यांनी सांगितले.प्रशिक्षणामध्ये महात्मा गांधी सेवा संघाचे प्रकल्प संचालक श्री. विजय कान्हेकर यांनी संपूर्ण सर्वेक्षणाची पार्श्वभूमी विषद केली. नीलेश छडवेलकर यांनी सर्वेक्षणासाठी वापरले जाणारे ॲपत्याची कार्यशैली आणि प्रश्नावली याचे विस्तृत विवेचन केले. संजय पुसाम यांनी दिव्यांगत्वाची ओळख आणि प्रकार या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमात माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाडसाथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरेझोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय तिवारीडॉ. अतिक खानडॉ. ख्वाजा मोईनुद्दीनडॉ. दीपंकर भिवगडेडॉ. सुनील कांबळेशहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकमआरोग्य व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान समन्वयक दीपाली नागरेआशा योजना सुपरवायजर रेखा निखाडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सिल्विया मोरडे यांनी केले व आभार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी मानले.

झिरो माईल स्टोनचे पर्यटनाच्या दृष्टीने मनपा करणार सौंदर्यीकरण आणि विकास हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत निर्णय

नागपूर:-भारताच्या केंद्रस्थानी असलेले ग्रेड -१ हेरिटेज झिरो माईल स्टोनचा पर्यटनाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका सौंदर्यीकरण आणि विकास करणार, असा महत्वपूर्ण निर्णय हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री. अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (ता.१२) मनपामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, समितीच्या सदस्य सचिव श्रीमती लीना उपाध्ये आणि तज्ञ सदस्य उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री यांचे सल्लागार श्री. आनंद बंग आभासी पद्धतीने बैठकीमध्ये सहभागी झाले. या प्रकल्पासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन सीएसआर निधीतून अर्थसहाय्य करणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे वास्तू शिल्पकार श्री. परमजीत सिंग आहुजा यांनी झिरो माईलच्या विकासा संदर्भातील प्राथमिक स्वरूपाचा आराखडा तयार केला असून त्यांनी या प्रारूपाची मांडणी सभेत केली. त्यांनी 
सांगितले की, झिरो माईल लगतच्या जागेवर भूमिगत ग्रेट ट्रिग्नॉमेट्रीकल सर्वे चे संग्रहालय स्थापित केले जाईल. तसेच मनपाच्या जागेवर पार्कीं आणि पर्यटकांसाठी इतर व्यवस्था केली जाईल. येथे भेट देणाऱ्या नागरिकांसाठी म्पिथिएटर तसेच फूड कोर्टचा सुद्धा प्रस्ताव त्यांनी दिला त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येतीलहेरिटेज संवर्धन समितीचे कार्यालय सुद्धा तिथे राहणार आहे. असेही त्यांनी सांगितले.बैठकीतील चर्चेनुसार या प्रकल्पाला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सीएसआर निधीतून विकास कामात सहकार्य करणार आहे. नागपूरसाठी हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असूनमहानगरपालिका तर्फे सदर झिरो माईल पर्यटनक्षेत्राचा विकास होईल असे मनपा आयुक्तांनी आश्वस्त केले.
सध्या झिरो माईलच्या संवर्धनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. सभेत संवर्धन समितीच्या सदस्यांनी सुद्धा आपले मत मांडले. त्यांच्या सल्लानुसार झिरो माईलच्या विकास आरखड्यात बदल करून मा. मुख्यमंत्री यांचे समोर सादरीकरण करण्यात येईल, असे मनपा आयुक्तांनी सांगीतले.बैठकीत नगर रचना विभागाचे  सहसंचालक श्री. विजय शेंडे, केंद्रीय पुरातन सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक श्री. सतीश मल्लिक, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक श्री. मयुरेश खंडागळे, डॉ. मधुरा राठोड, डॉ. शुभा जोहरी, सर्वे ऑफ इंडियाचे भूपेन्द्र परमार, मनपा अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारमनपा नगर रचना विभागाचे उपसंचालक श्री. किरण राऊत, सहायक संचालक नगर रचना श्री. ऋतुराज जाधव उपस्थित होते.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...