Monday, March 17, 2025

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 63 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (17) रोजी शोध पथकाने 63 प्रकरणांची नोंद करून  52,000/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 29 प्रकरणांची नोंद करून 11,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 1,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून 17,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून 4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 10,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. जे. डी. बिल्डकॉन यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. गुरु माऊली अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. तसेच मे. साज वूमनस फॅशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी असे एकुण रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. 











गांधी बाग झोन अंतर्गत मे. चेतेश्वर किराणा स्टोर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. एम.एस. अकॅडमी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल  5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 05 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला.

स्वत:ची काळजी घ्या, इतरांना जागरुक करा उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आशा सेविकांना प्रशिक्षण

नागपूर:- वाढत्या तापमानासोबतच उष्माघाताचा धोका वाढत आहे. शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा स्थितीत उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाच्या महत्वाच्या दुवा आहेत. आशांनी उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करतानाच इतरांना देखील त्याबद्दल जागरुक करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या उष्माघात प्रतिबंधक यंत्रणेचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरात उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात मनपा क्षेत्रातील सर्व आशा सेविकांना 
उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सोमवारी (ता.१७) इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा सेविकांना उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक उर रहमानजीएनएम सिल्विया सोनटक्के आदी उपस्थित होते.यावेळी आशा सेविकांना उष्माघात म्हणजे काय, त्यावर प्राथमिक उपचार काय व उष्माघात झालेल्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी करावयाचे उपाय तसेच उष्माघात होउ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली.खूप तापमान राहिल्यास त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. 
थेट उन्हात काम केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम जाणवतात शिवाय घरात राहूनही तापमान वाढीचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. अशा स्थितीत काळजी घेणे आवश्यक आहे. घामोळ्या येणे, पायाची नस लागणे (क्रॅम्प येणे), सुस्त वाटणे, चक्कर येउन पडणे ही साधारणत: उष्णतेमुळे दिसणारे परिणाम आहेत. पण यात सर्वांत उष्माघात हा अत्यंत धोकादायक आहे. उष्माघात झालेली व्यक्ती अचेत होउन जाते व त्याला स्वत:वर नियंत्रण करता येत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होउन जाते घाम देखील येत नाही. शरीर संपूर्ण कोरडे असताना शरीराचे तापमान प्रचंड वाढते. अशा स्थितीत अशा व्यक्तीला सावलीत नेऊन वारा घालणे, त्याच्या डोक्यावर कापड, टॉवेल ठेवून त्यावर पाणी टाकून शरीराचे तापमान थंड करण्याचा प्रयत्न व १०८ या रुग्णवाहिका सेवा क्रमांकावर फोन लावून माहिती देणे अशा बाबींची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी नोडल अधिकाऱ्यांनी केले. 



मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक उर रहमान यांनी आशा सेविकांनी कार्यक्षेत्रात आढळणाऱ्या बेघर व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन केले. बेघरांच्या सोयीसाठी मनपाद्वारे बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. या केंद्रांमध्ये मनपाद्वारे बेघरांचे निवासभोजनआरोग्यप्रशिक्षण या सर्व बाबींच काळजी घेत जात असल्याचेही माहिती डॉ. अतीक उर रहमान यांनी दिली. आशा सेविकांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती कार्य करताना नागरिकांना ओआरएसचे पॉकीट व जनजागृती पत्रक देण्याचे देखील आवाहन डॉ. रहमान यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एएनएम शीला सयामबकुळी अरमरकरलीना तागडे,  फार्मासिस्ट सोनाली सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येत आशा सेविका उपस्थित होत्या. नागरिकांनी  कामाशिवाय उन्हात निघणे टाळावेउन्हात जाण्याची वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावेभरपूर पाणी प्यावेस्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी,  हलकीपातळ  सच्छिद्र कपडे वापरावीतबाहेर जाताना गॉगल्सछत्री किंवा हॅटबूट किंवा चप्पलचा वापर करावाप्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावीउन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा.  ओल्या कपड्याने डोकेमानचेहरा झाकणेशरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएसलिंबूपाणीताक आदी पेय नियमीत पिणेघर थंड  ठेवण्यासाठी ओलसर पडदेपंखाकुलर आदींचा वापर करावा.उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणेउन्हात कष्टाची कामे करणे टाळालहान मुले किंवा  पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या  पार्क केलेल्या वाहनात ठेवू नकागडदघट्ट  जाड कपडे परिधान करणे  टाळावेउन्हात स्वयंपाक करणे टाळावेस्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे  खिक्या उघडी ठेवावीतमद्यचहाकॉफीसॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावीशिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.

Thursday, March 13, 2025

तूर, उडीद आणि मसूर यांचे 100% उत्पादन किमान हमी भावाने खरेदी करण्यासाठी सरकार वचनबद्ध

नवी दिल्‍ली:- भारत सरकारने एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान(पीएम-आशा) ही योजना 15 व्या वित्त आयोगाच्या काळात 2025-26 पर्यंत सुरू ठेवायला मंजुरी दिली आहे. एकात्मिक पीएम आशा योजना ही खरेदी प्रक्रियेची अंमलबजावणी अधिक प्रभावी पद्धतीने करण्यासाठी राबवली जातेजी शेतकऱ्यांना केवळ त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव देण्यासाठीच मदत करत नाही तर ग्राहकांना परवडण्याजोग्या दरात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करून दरातील संवेदनशील चढउतारांवर नियंत्रण देखील ठेवते. एकात्मिक पीएम-आशा योजनेच्या भाव हमी योजने अंतर्गत अधिसूचित डाळीतेलबिया आणि सुके खोबरे यांची विहित न्याय्य सरासरी दर्जाला अनुसरून पूर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून राज्य स्तरीय संस्थांच्या माध्यमातून  केंद्रीय नोडल संस्थांद्वारे किमान हमी भावाने खरेदी केली जाते. डाळींचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनलाभ देण्यासाठीआणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने 2024-25 या खरेदी वर्षासाठी राज्याच्या उत्पादनाच्या 100% इतकी तूरउडीद आणि मसूर 
किमान हमी भावाने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.सरकारने 2025 च्या अर्थसंकल्पात अशी देखील घोषणा केली आहे की देशातील डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सींद्वारे पुढील चार वर्षांसाठी 2028-29 पर्यंत राज्याच्या उत्पादनात 100% तूरउडीद आणि मसूरची खरेदी केली जाईल.त्यानुसारकेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तूर(अरहर)मसूर आणि उडदाची अनुक्रमे  13.22 एलएमटी, 9.40 एलएमटी आणि 1.35 एलएमटी खरेदी करायला मान्यता दिली आहे. त्यांनी 2024-25 च्या खरीप हंगामासाठी हमीभाव योजने अंतर्गत महाराष्ट्र


आंध्रप्रदेशछत्तीसगडगुजरातहरियाणाकर्नाटकमध्य प्रदेशतेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एकूण 13.22 एलएमटी तूर खरेदीला मान्यता दिली.महाराष्ट्रआंध्र प्रदेशगुजरातकर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये खरेदी आधीच सुरू झाली आहे आणि 11.03.2025 पर्यंत या राज्यांमध्ये एकूण 1.31 एलएमटी तूर (अरहर) खरेदी करण्यात आली आहे जिचा लाभ या राज्यांमधील 89,219 शेतकऱ्यांना मिळाला आहे. इतर राज्यांमध्येही तूर खरेदीला लवकरच सुरुवात होईल. नाफेडचे ई-समृद्धी पोर्टल आणि एनसीसीएफचे असंयुक्ती पोर्टलवर देखील पूर्व-नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली जाते. भारत सरकार नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सींद्वारे शेतकऱ्यांकडून 100% तूर खरेदी करण्यास वचनबद्ध आहे.

मनपा विद्यार्थ्यांनी केली दुर्गुणांची होळी अनोख्या संकल्पनेचे कौतुक : वाईट सवई सोडण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या प्रियदर्शिनी मराठी उच्च प्राथमिक शाळा फुटाळा येथील विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता.१३) दुर्गुणांची होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी विविध वाईट गुण कागदावर लिहिले आणि त्याचे होळीसोबत दहन केले. आपल्यातील दुर्गुणांचे दहन करुन नियमित चांगल्या सवयी अंगीकारण्याचा संकल्प चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केला. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वसुधा वैद्य यांच्या संकल्पनेतील या अभिनव उपक्रमाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरीअतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी कौतुक केले.विद्यार्थ्यांमध्ये अनेक वाईट सवयी अथवा दुर्गुण असतात. खोटे बोलणेचोरी करणेआज्ञा न पाळणेमोबाईलवर घातक खेळ खेळणेस्वच्छता न राखणेमारामारी करणेशिव्या देणे वगैरे या सर्व दुर्गुणांचे दहन 
करुन विद्यार्थ्यांना प्रेरीत करण्याची संकल्पना प्रियदर्शिनी मराठी उच्च प्राथमिक शाळा फुटाळा येथील मुख्याध्यापिका डॉ. वसुधा वैद्य यांनी मांडली. त्यानुसार विद्यार्थ्यांचे सुमारे १५ दुर्गुण एकेका कागदावर लिहिण्यात आले. हे फलक विद्यार्थ्यांच्या हातात देउन त्यांनी या सर्व दुर्गुणांना मनातूनआचरणातून काढून टाकण्यासाठीविद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्यासाठी 'होळी रे होळी दुर्गुणांची होळीअशा आवेशपूर्ण घोषात  त्यांच्याकडूनच ही दुर्गुणांची होळी करण्यात आली.फुलांची उधळण आणि एकमेकांना गुलाल लावून होळी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री. गवरेश्रीचावरे,  श्री. शेंडेश्रीमती मोहरीरश्रीमती घायवाटश्रीमती हटवारश्री. उरकुडे,  श्री. बबनराव चौधरी तसेच माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

कायाकल्प पुरस्कार विजेत्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सन्मान मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

नागपूर:- महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कायाकल्प पुरस्कार विजेत्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंगळवारी (ता.१) सन्मानित करण्यात आले.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये मंगळवारी (ता.१) छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारमाता व बाल संगोपन 
अधिकारी डॉ. सरला लाडहिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजूषा मठपतीशहर प्रमुख व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकमशहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. राजेश बुरेझोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.शिल्पा जिचकारडॉ. दीपांकर भिवगडेडॉ. सुनील कांबळेडॉ.ख्वाजा मोईनुद्दीनपीएचयू अर्चना खाडे आदी उपस्थित होते. राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 
कायाकल्प पुरस्कार योजनेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम पुरस्कार प्राप्त केला. केंद्राला राज्य सरकारच्या वतीने २ लक्ष रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने द्वितीय तर कपिल नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने तृतीय क्रमांक प्राप्त केला. दोन्ही विजेत्यांना अनुक्रमे १.५० लक्ष व १ लक्ष रुपये पुरस्कार राशी प्रदान करण्यात आली. याशिवाय नाराशांतीनगरफुटाळाजगन्नाथ बुधवारीजयताळाबाबुलखेडाडिप्टी सिग्नलके.टी.नगरमानेवाडाचिंचभवनशेंडे नगरभालदारपुरापाचपावलीसोमलवाडा व बिडीपेठ या १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी या यशाबद्दल वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय आरोग्य
अधिकारी तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या चमूचे विशेष अभिनंदन केले.कायाकल्प योजने अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील तसेच महानगरपालिकेतील सरकारी रुग्णालयप्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा सहभाग असतो. महानगरपालिका स्तरावरील आरोग्य विभागाचे एक पथक अंतिम परीक्षण करते. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी कायाकल्प सूचीनुसार अंमलबजावणी केली. त्यानुसार आरोग्य केंद्रातील स्वच्छताबाह्यरुग्ण विभागरुग्णांना बसण्याची व्यवस्थापिण्याचे पाण्याची व्यवस्थासंस्थेची देखभाल,जैविक कचरा व्यवस्थापनजंतू संसर्ग व्यवस्थापन इत्यादी सर्व बाबींवर मुल्यांकन करून गुणांकन करण्यात आले. यात नागपूर महानगरपालिकेच्या झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने सर्वाधिक ९८.३० टक्के गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने ९७.९० टक्के गुणांसह उपविजेतेपद आणि कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने ९४.६० टक्के गुणांसह तृतीय पुरस्कार प्राप्त केला. कायाकल्प पुरस्कारा संदर्भात मनपाचे शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. राजेश बुरे यांनी सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सर्व बाबींबाबत योग्य ते समन्वय व मार्गदर्शन दिले.
 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 48 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  गुरुवार (13)  रोजी शोध पथकाने  48  प्रकरणांची नोंद करून  रु. 41,000/- रुपयाचा दंड  वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 24  प्रकरणांची नोंद करून  रु.9,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु.100/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली. दुकानदाराने रस्ता
फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल
, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून रु.14,500/- रुपयांची वसुली करण्यात आली.  सार्वजनिक रस्ता, फटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे व साठवणे टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु.2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून रु.2,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून रु.7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. 
ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने हनुमान नगर झोन अंतर्गत मे. श्री राम बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला व मे. शीव गौरी ईल्कट्रोनीक्स यांनी दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जवळच्या फूटपाथ परिसरात टाकल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला असे एकुण रू. 15,000/- दंड वसुल करण्यात आला.  धंतोली झोन अतंर्गत रॉयल गोंडवाडा स्कूल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अतंर्गत राम भंडार यांनी रेस्टॉरंटमधील अन्न/जेवणाचे पदार्थ टाकल्याने चेंबरमध्ये अडथळा निर्माण करण्याबद्दल 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अतंर्गत नाईक रियालिटीज यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 05 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.
 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...