Monday, March 17, 2025

स्वत:ची काळजी घ्या, इतरांना जागरुक करा उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आशा सेविकांना प्रशिक्षण

नागपूर:- वाढत्या तापमानासोबतच उष्माघाताचा धोका वाढत आहे. शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अशा स्थितीत उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाच्या महत्वाच्या दुवा आहेत. आशांनी उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करतानाच इतरांना देखील त्याबद्दल जागरुक करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या उष्माघात प्रतिबंधक यंत्रणेचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरात उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात मनपा क्षेत्रातील सर्व आशा सेविकांना 
उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सोमवारी (ता.१७) इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा सेविकांना उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनांच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक उर रहमानजीएनएम सिल्विया सोनटक्के आदी उपस्थित होते.यावेळी आशा सेविकांना उष्माघात म्हणजे काय, त्यावर प्राथमिक उपचार काय व उष्माघात झालेल्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी करावयाचे उपाय तसेच उष्माघात होउ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली.खूप तापमान राहिल्यास त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. 
थेट उन्हात काम केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम जाणवतात शिवाय घरात राहूनही तापमान वाढीचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. अशा स्थितीत काळजी घेणे आवश्यक आहे. घामोळ्या येणे, पायाची नस लागणे (क्रॅम्प येणे), सुस्त वाटणे, चक्कर येउन पडणे ही साधारणत: उष्णतेमुळे दिसणारे परिणाम आहेत. पण यात सर्वांत उष्माघात हा अत्यंत धोकादायक आहे. उष्माघात झालेली व्यक्ती अचेत होउन जाते व त्याला स्वत:वर नियंत्रण करता येत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होउन जाते घाम देखील येत नाही. शरीर संपूर्ण कोरडे असताना शरीराचे तापमान प्रचंड वाढते. अशा स्थितीत अशा व्यक्तीला सावलीत नेऊन वारा घालणे, त्याच्या डोक्यावर कापड, टॉवेल ठेवून त्यावर पाणी टाकून शरीराचे तापमान थंड करण्याचा प्रयत्न व १०८ या रुग्णवाहिका सेवा क्रमांकावर फोन लावून माहिती देणे अशा बाबींची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी नोडल अधिकाऱ्यांनी केले. 



मंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतीक उर रहमान यांनी आशा सेविकांनी कार्यक्षेत्रात आढळणाऱ्या बेघर व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन केले. बेघरांच्या सोयीसाठी मनपाद्वारे बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. या केंद्रांमध्ये मनपाद्वारे बेघरांचे निवासभोजनआरोग्यप्रशिक्षण या सर्व बाबींच काळजी घेत जात असल्याचेही माहिती डॉ. अतीक उर रहमान यांनी दिली. आशा सेविकांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती कार्य करताना नागरिकांना ओआरएसचे पॉकीट व जनजागृती पत्रक देण्याचे देखील आवाहन डॉ. रहमान यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एएनएम शीला सयामबकुळी अरमरकरलीना तागडे,  फार्मासिस्ट सोनाली सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येत आशा सेविका उपस्थित होत्या. नागरिकांनी  कामाशिवाय उन्हात निघणे टाळावेउन्हात जाण्याची वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावेभरपूर पाणी प्यावेस्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी,  हलकीपातळ  सच्छिद्र कपडे वापरावीतबाहेर जाताना गॉगल्सछत्री किंवा हॅटबूट किंवा चप्पलचा वापर करावाप्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावीउन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा.  ओल्या कपड्याने डोकेमानचेहरा झाकणेशरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएसलिंबूपाणीताक आदी पेय नियमीत पिणेघर थंड  ठेवण्यासाठी ओलसर पडदेपंखाकुलर आदींचा वापर करावा.उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणेउन्हात कष्टाची कामे करणे टाळालहान मुले किंवा  पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या  पार्क केलेल्या वाहनात ठेवू नकागडदघट्ट  जाड कपडे परिधान करणे  टाळावेउन्हात स्वयंपाक करणे टाळावेस्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे  खिक्या उघडी ठेवावीतमद्यचहाकॉफीसॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावीशिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...