Wednesday, April 3, 2024

होय…मी मतदान करणार" म्हणत शेकडो नागरिकांनी घेतली प्रतिज्ञा

नागपूर:उज्वल भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी 'होय..मी मतदान करणारम्हणत नागपूर महानगरपालिकाद्वारे आयोजित कार्यक्रमात बुधवारी (ता:०३सकाळी शेकडोंच्या संख्येत नागरिकांनी मतदान जनजागृती प्रतिज्ञा घेतलीतसेच "तुम्ही मतदान करणार ना.." असे फलक हाती घेऊन पथनाट्यफ्लॅश मॉब आणि रँलीद्वारे मतदानाचा जागर करण्यात आला.सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकाद्वारे बुधवारी (ता.०३सकाळी सीए रोड स्थित भारत माता 
डॉबाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मतदार जनजागृती करीता फ्लॅश मॉब आणि पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आलेयाप्रसंगी गांधीबाग झोनचे सहाय्यक आयुक्त श्रीगणेश राठोडशिक्षणाधिकारी श्री प्रफुल्ल कचवे, मनपाचे क्रीडा अधिकारी  डॉपियुष  आंबुलकर शाळा निरीक्षक जयवंत पितळे, प्रशांत टेंभुर्णे, कार्यकारी अभियंता संजय माटे, रोशन अहीरे  यांच्यासह  मनपा अधिकारी कर्मचारी  मनपा  शाळेचे विद्यार्थी प्रामुख्याने  उपस्थित होते.  


सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागपूर शहरातून जास्तीत जास्त मतदान व्हावे  ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता मॅट्रिक्स वॉरियर्सच्या स्वयंसेवकांद्वारे फ्लॅश मॉब  पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आलेतसेच मनपाच्या डॉराम मनोहर लोहिया शाळेच्या व संजय नगर हिंदी माध्यामिक शाळा, मिनी माता नगर विद्यार्थांमार्फत  परिसरात मतदान  जनजागृती  रँली काढण्यात आलीमॅट्रिक्स वॉरियर्सच्या स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडादेशभक्तीपर गीत अशा विविध गीतांमधून नागरिकांचे लक्ष वेधले  पुढे ‘मतदान कर…’ अशी साद देखील घातलीतसेच पथनाट्याद्वारे मतदान का आवश्यक आहे,


हे देखील पटवून दिले.मॅट्रिक्स वॉरियर्स संस्थेतर्फे पथनाट्याचे लेखन नंदिनी मेनजोगे यांनी केले तर संकल्पना आदित्य खोब्रागडे यांची होतीसंस्थेचे आकाश निखाडेसर्वेश हरडेसुजाता कावरेसंजना मानवटकरकुणाल पवारआदर्श दुधनकरनयन हावरेप्रशांत बेलसरेपलाश हेडाऊरोशन वांढरेजान्हवी वांढरेवृषाली भानारेसाक्षी सारडानिखिल दुधनकरआचल पौनीकरविनीत चांडकगौरी रुद्राकरचेतन दुधनकरमोहिनी जंगलेसमीक्षा जंगले या स्वयंसेवकांनी पथनाट्य  फ्लॅश मॉब मध्ये सहभाग नोंदविलानागरिकांनी देखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

No comments:

Post a Comment

नदी सफाई अभियानाचे कार्य प्रगतीपथावर

नागपूर: -   नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत...