Wednesday, April 3, 2024

शहर आणि जिल्ह्यात विविध भागांमध्ये मतदानासाठी करणार जनजागृती

नागपूर:- सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मतदार जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे मतदान जनजागृती रथ तयार करण्यात आलेले आहेत या रथांना बुधवारी (ता.३) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपा मुख्यालयामध्ये तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आणि जिल्हा परिषदमधून जिल्हा निवडणूक नोडल अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.मनपा मुख्यालयात उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त डॉ. 

गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, कार्यकारी अभियंता श्री सर्वश्री रवींद्र बुंधाडेविजय गुरुबक्षाणीश्रीकांत वाईकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदान करावे, यासाठी संपूर्ण शहरभर रथ जनजागृती करणार आहे. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून यात प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. 





नागपूर शहरात किमान ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करून नागपूरला प्राविण्य श्रेणीत आणण्यासाठी प्रत्येक मतदाराचे योगदान अमूल्य ठरणार आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या अधिकाराचा उपयोग करून मतदानाचा हक्क नक्की बजावावा, असे देखील आवाहन डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

No comments:

Post a Comment

नदी सफाई अभियानाचे कार्य प्रगतीपथावर

नागपूर: -   नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत...