नागपूर:- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक
निवडणूक २०२५-२६ च्या प्रशासकीय तयारीला आता वेग आला असून, याअनुषंगाने निवडणुकीसाठी अत्यंत
संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्ट्राँग रूमची प्रत्यक्ष पाहणी मनपा आयुक्त तथा
प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता. २४) केली. मनपाद्वारे बचत भवन नॉर्मल
स्कूल वसाहत परिसर, सीताबर्डी
येथे केंद्रीय स्ट्राँग रूम उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे,राज्य निवडणूक आयोगाद्वारे प्राप्त
होणाऱ्या ईव्हीएम मशीन या ठिकाणाहून झोन निहाय केंद्रावर पाठवले जाणार आहेत.याप्रसंगी
अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. मंगेश खवले, कार्यकारी अभियंता श्री. मनोज
गद्रे, कार्यकारी
अभियंता श्री. राजेंद्र राठोड कार्यकारी अभियंता श्री.
संजय माटे, श्री.
नवघरे माहिती
व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्नील लोखंडे, श्री. राज चौधरी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.मनपा सार्वत्रिक निवडणूक
२०२५-२६ साठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तसेच १६ जानेवारी
रोजी मतमोजणी केली जाणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि निर्दोष पार
पाडण्याच्या उद्देशाने आयुक्तांनी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा
आणि सुरक्षा व्यवस्थेची बारकाईने तपासणी केली. स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीनची
सुरक्षा, सीसीटीव्ही
कॅमेऱ्यांचे जाळे, विद्युत
पुरवठा आणि आगीपासून संरक्षणासाठीची यंत्रणा यावर आयुक्तांनी विशेष लक्ष दिले.


No comments:
Post a Comment