नागपूर:- महिला मतदान सक्षम लोकशाही..,दिव्यांग मतदारांचा सन्मान
लोकशाहीचा अभिमान...असे मतदान विषयी जनजागृती फलक हाती घेऊन सांताक्लॉजने
शहरातील विविध ठिकाणी मतदान नक्की करा अशी जनजागृती केली. निमित्त होते ते नागपूर
महानगरपालिकेद्वारा सिस्टिमेटिक
व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या मतदान
जनजागृती अभियानाचे. नाताळ सणाचे औचित्यसाधून नागपूर महानगरपालिका मुख्यालय येथे
मतदार जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
मनपाच्या छत्रपती
शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या
हस्ते स्वीप उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.नागपूर
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती
करण्यासाठी मनपाने नाताळ सणाचे औचित्य साधून शहरातील ४० ठिकाणी सांताक्लॉजच्या
माध्यमातून अभिनव उपक्रम राबविला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती
वसुमना पंत, अतिरिक्त
आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., उपायुक्त
डॉ. रंजना लाडे, उपायुक्त
श्री. राजेश भगत, उपायुक्त
श्रीमती मेघना वासनकर, कार्यकारी
अभियंता श्रीमती अश्विनी येलचटवार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी
उपस्थित होते.मतदान जनजागृतीकरिता महानगरपालिकेच्या
मुख्यालयात आकर्षक रोषणाई करून मतदार जागृती ख्रिसमस ट्री उभारण्यात आली होती. तसेच मतदार जनजागृतीसाठी एक सेल्फी
पॉईंट तयार करण्यात आला होता. या ठिकाणी मतदानासाठी जागृती करणाऱ्या घोषणा करणारे फलक लावलेले होते.शहरातील मनपाच्या दहाही झोनमध्ये गर्दीच्या ठिकाणी
सांताक्लॉज च्या पेहरावात असलेल्या युवकांनी मतदारांमध्ये जनजागृती केली.
महानगरपालिकेच्या मुख्यालयात घोड्याच्या बग्गीत सांताक्लॉज बसलेले होते. त्यांच्या
हातात मतदानाला प्रोत्साहन देणारे घोषणांचे फलक होते. कर मतदान, सांगतंय संविधान, महिला मतदान सक्षम लोकशाही अशा
घोषणा लिहिलेले फलक लावण्यात आले होते. या सांताक्लॉजला मनपा आयुक्त तथा प्रशासक
डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रत्येक झोनमध्ये रवाना केले. यावेळी मतदान करा, अशा घोषणा देत सांताक्लॉज यांनी
महानगरपालिकेच्या मुख्यालयातून निघाले.प्रत्येक झोनमध्ये
चर्च तसेच गर्दीच्या ठिकाणी सांताक्लॉजने मतदान करण्यासाठी जनजागृती केली. या
सर्वांच्या हातात मतदानाबद्दल जागृती करणार्या घोषणा असलेले फलक होते. यावेळी लहान
मुलांना सांताक्लॉजने चॉकलेट सुद्धा दिले. या अभिनव उपक्रमाला मतदारांना चांगला
प्रतिसाद दिला. मनपा
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात ‘स्वीप’ मतदान साक्षरता कार्यक्रमाच्या
माध्यमातून मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या
सर्व झोन कार्यालयामार्फत निवडणूक
सहभागाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यात येत आहे.

.jpeg)
No comments:
Post a Comment