Friday, August 9, 2024

ऑगस्ट क्रांती शहीद दिना निमित्त म.न.पा. द्वारा शहीदांना अभिवादन

नागपूर:- भारतीय स्वातंत्र्य लढयातील शहीदांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिना प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. अभिजीत चौधरी आयुक्त तथा प्रशासक यांनी जुने मॉरीस कॉलेज फ्रिडम पार्क (‍झिरो माईल) जवळील हुतात्मा स्मारकास पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नागपूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीचे अध्यक्ष माजी आमदार यादवराव देवगडे, संयोजक रघुवीर देवगडे, माजी आमदार दिनानाथ पडोळे
, माजी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, म.न.पा.चे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी आदि उपस्थित होते. तत्पूर्वी इतवारी शहीद चौक येथील शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण
करुन अभिवादन केले. तसेच कॉटन मार्केट शहीद चौक येथील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली दिली. यावेळी अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, सुरज पांडे आदि उपस्थित होते.जागतिक आदिवासी दिना निमित्त मनपा मुख्यालयातील क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनपा तर्फे विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे स्वप्निल लोखंडे, आयुक्त कार्यालयाचे जितेश धकाते, राजेश गजभिये, शैलेश जांभुळकर, प्रकाश ढोके, जितेंद्र पवनीकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, August 7, 2024

नियमित टीकाकरण पर टास्क फोर्स समिति की बैठक - मच्छर जनित बीमारियों पर नियंत्रण के उपायों पर चर्चा

 नागपुर :- नागपुर नगर निगम के माध्यम से शहर में नगर अस्पताल , सरकारी एवं निजी अस्पतालों में नियमित टीकाकरण एवं मलेरिया , डेंगू, चिकनगुनिया जैसी मच्छर जनित बीमारियों पर नियंत्रण के उपाय चलो भी इस संबंध में अपर आयुक्त श्रीमती आंचल गोयल की अध्यक्षता में मंगलवार ( 06 बजे ) काम बल समिति की बैठक हुई.मनपा मुख्यालय पर अपर आयुक्त सभाकक्ष में हुई बैठक में मनपा के चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर , अतिरिक्त चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी डॉ. विजय जोशी ,  प्रजनन एवं बाल कल्याण अधिकारी डॉ. सरला लाड , विश्व स्वास्थ्य संगठन के चिकित्सा अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद , महामारी अधिकारी डॉ
गोवर्धन नवखरे , हाथी रोग अधिकारी डॉ मंजूषा मठाधीश , सीपीएम अश्विनी निकम क्षेत्रीय चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगड़े , डॉ. सुनील कांबले , डॉ. जयश्री चन्ने , डॉ. गजानन पवने , डॉ. अतीक खान , डॉ.ख्वाजा मोइनुद्दीन , डॉ. विजयकुमार तिवारी , डॉ. सुलभा शेंडे , डॉ. वर्षा देवस्थले , डॉ.मालखंडेल , डॉ.शीतल वांडिले टीकाकरण क्षेत्र नियंत्रक , आशा सेविका एवं अन्य प्रतिनिधि मुख्य रूप से उपस्थित थे। बैठक में अपर आयुक्त श्रीमती आंचल गोयल ने मलेरियाडेंगू , चिकनगुनिया जैसी मच्छर जनित 
बीमारियों पर नियंत्रण के उपायों पर चर्चा की। साथ ही कुल कितने क्षेत्र में फॉगिंग और उन्होंने समीक्षा की कि छिड़काव किया गया है. जोन के हिसाब से मशीन कितनी है और मच्छरों के प्रजनन को रोकने के लिए भी फॉगिंग और जो स्प्रे करते हैं शेड्यूल में बदलाव करके हर जोन के हिसाब से फॉगिंग तथा नियमित छिड़काव करें करने के निर्देश जोनल अधिकारियों को दिया गया। इसी तरह उन्होंने 
अस्पताल में नियमित टीकाकरण की भी समीक्षा की. उच्च जोखिम वाले क्षेत्रों में सरकारी अभियान चलाया जाएगा और वंचित बच्चों की सूची तैयार कर उनका टीकाकरण किया जाएगा। जिन क्षेत्रों में टीकाकरण की दर कम है, वहां नागरिकों में टीकाकरण के बारे में जागरूकता पैदा की जानी चाहिए , नागरिकों को आवश्यकता के अनुसार परामर्श दिया जाना चाहिए , संबंधित अधिकारियों, जोनल अधिकारियों को टीकाकरण बढ़ाने के लिए यूपीएचसी स्तर पर आंगनवाड़ी कार्यकर्ताओं, आशा एएनएम आदि का उचित मार्गदर्शन करना चाहिए। अधिकारी आशा एवं एएनएम के रजिस्टर की नियमित जांच करें , ऐसे निर्देश बैठक में श्रीमती गोयल ने दिये. इसके अलावा श्रीमती गोयल ने यह भी निर्देश दिये कि बच्चों के टीकाकरण में महिला स्वास्थ्य समिति के सदस्यों की भागीदारी बढ़ाने के लिये नियमित बैठक आयोजित की जाये। बैठक में प्रजनन एवं शिशु कल्याण अधिकारी डॉ.सरला लाड ने पिछले माह टीकाकरण से वंचित एवं देर से टीकाकरण की जानकारी दी। विश्व स्वास्थ्य संगठन के चिकित्सा अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद ने कम्प्यूटरीकृत प्रेजेंटेशन के माध्यम से नियमित टीकाकरण का सिंहावलोकन प्रस्तुत किया।
 

मनपाद्वारे दोन लाखावर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी सुपूर्द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मनपा मुख्यालयात विशेष कक्ष स्थापित

 नागपूर:- महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज स्वीकृती बाबत नागपूर महानगरपालिकेने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. लाभार्थी महिलांनी भरलेल्या अर्जाच्या नमुन्याची  तपासणी करून दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आठवड्याभरातच मनपाने हा दोन लाख अर्जांचा आकडा गाठला आहे.मुख्यमंत्री  माझी  लाडकी बहीण योजनेद्वारे 2.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवारातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये आर्थिक सहकार्य मिळणार आहे. नागपूर शहरातील जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा, त्यांच्या अर्जाची योग्य तपासणी व्हावी याकरिता नागपूर महानगरपालिकेने विशेष पुढाकार घेतला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतील हे महत्वपूर्ण यश असून यासाठी मनपा आयुक्तांनी अर्जाच्या नमुन्याची तपासणी करणारे 280 पेक्षा अधिक संगणक मॅनेजर तसेच समाज विकास विभागाचे अधिकारी आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.मनपा 
आयुक्त यांच्या निर्देशनानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये विशेष कक्ष स्थापित करण्यात आले आहे. या कक्षामध्ये 100 पेक्षा अधिक संगणक उपकरणांची व्यवस्था करण्यात आली. यावर तीन शिफ्टमध्ये सुमारे 280 संगणक मॅनेजर नियुक्त करण्यात आले. या संगणक मॅनेजरकडून अर्जाची तपासणी करून ते मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहे. मनपाचे संगणक मॅनेजर या प्रक्रियेसाठी अहोरात्र काम करीत असून त्यांच्या परिश्रमामुळेच मनपाने महत्वाचा टप्पा गाठला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याकरिता राज्य सरकारकडून नेहमी आवाहन करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत महिलांनी मोठ्या संख्येत या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज मनपाचे झोनल कार्यालय तसेच प्रभाग स्तरावरील जमा केले. 


अर्ज स्वीकार करून त्याची योग्य तपासणी करण्यासाठी मनपाद्वारे तीन शिफ्टमध्ये संगणक मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयात 4 ठिकाणी विशेष कक्ष तयार करण्यात आले व येथे देखील वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचाच परिणाम मनपाकडे प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करून 2,12,778 अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात आले.  मनपाला प्राप्त अर्जांमधून 181 अर्ज रद्द करण्यात आले. तसेच 5898 आंशिक रद्द करण्यात आले. केवळ 2589 अर्जाचा सध्या प्रक्रिया करण्यात येत आहे.




मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी या महत्वपूर्ण टप्प्याकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे आणि तपासणी प्रक्रियेमध्ये सहभागी संगणक मॅनेजर आणि कर्मचारी या सर्वांचे विशेष अभिनंदन केले आहे. या सर्वांनी समन्वयाने केलेल्या कार्याचे मोठे फलीत मिळालेले आहे. शहरातील कुणीही लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नये. यासाठी मनपाद्वारे विशेष लक्ष देण्यात येत आहे. लाभार्थी महिलांना स्वत: देखील ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय आहे. याशिवाय मनपातील झोनल कार्यालय तसेच प्रभाग कार्यालयांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑफलाईन आलेले अर्ज मनपाचे संगणक मॅनेजर ऑनलाईन माध्यमातून भरून घेतात. अर्ज तपासणीमध्ये ज्या अर्जांमध्ये कागदपत्रांची पूर्तता नसेल किंवा काही त्रुटी असेल तर ते तात्पुरते रद्द ठरविण्यात आले आहेत. लाभार्थी महिलांना संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून पुन्हा अर्ज सादर करता येणार आहे. योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 असून मोठ्या संख्येत महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात हे कार्य पूर्ण झाले. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे कमलेश झंझाड, स्वप्निल लोखंडे, प्रणय जयस्वाल, रवींद्र किदंर्ले, सिद्धार्थ झोडापे यांनी यामध्ये यशस्वी योगदान दिले. योजनेसाठी आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) ते नसल्यास महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (Leaving Certificate) किंवा जन्म दाखला (Birth certificate) किंवा मतदार ओळखपत्र (Voter ID Card), परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर पतीचा जन्म दाखला किंवा पतीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) यापैकी कुठलेही एक कागदपत्र सादर करावे. याशिवाय उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत) नसल्यास पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. (आधार कार्ड सोबत लिंक असावे.) हमीपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.विशेष म्हणजे, श्रावणबाळ,संजय गांधी निराधार तसेच इतर शासकीय आर्थिक योजना ज्या योजने-अंतर्गत रु. 1500 लाभ प्राप्त महिला सदर योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असणार आहेत तर त्याची नोंद महिलांनी घ्यावी.

हातमाग उत्पादनांच्या मार्केटिंग करिता पुढाकार घेणे आवश्यक - खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाचे केंद्रीय सदस्य जयप्रकाश गुप्ता

नागपूर:- हातमागाच्या उत्पादनांना गत वैभव मिळवून देण्यासाठी त्यांच्या मार्केटिंग करिता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाचे केंद्रीय सदस्य जयप्रकाश गुप्ता यांनी आज केले . केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या नवीन सचिवालय भवन,सिवील लाइन्स स्थित  विणकर सेवा केंद्र, नागपूर द्वारे आज 7 ऑगस्ट रोजी 10 वा राष्ट्रीय हातमाग   दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयातील विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर दिवे,  विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक संदीप ठुबरीकर, सहायक संचालक महादेव पवनीकर  प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी विणकर सेवा केंद्र नागपूर कार्यालयाचे उपसंचालक 
संदीप ठुबरीकर यांनी सांगितले की, हातमागाचे कापड हे पर्यावरण दृष्ट्या शाश्वत असते आणि याच्या निर्मितीसाठी विजेची गरज लागत नाही.नागपूरच्या तांडापेठ , धापेवाडा  आणि अकोला येथील बाळापूर येथे 3 हातमाग क्लस्टरची निर्मिती करण्यात आली असून या मार्फत हातमागचे उत्पादन चालू आहे अशी माहिती त्यांनी दिली.शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र हे विणकाम क्षेत्र होते परंतु आता हा विणकाम व्यवसाय लुप्तप्राय  होण्याच्या मार्गावर होण्याची चिन्ह दिसत आहे . यासाठी या क्षेत्रामध्ये नवीन संशोधनाशी  विणकारांनी अद्यावत राहावे असा आवाहन सुधीर दिवे यांनी केले . 
विणकर  सेवा  केंद्राचे सहाय्यक संचालक महादेव पवनीकर यांनी विणकरांसाठी केंद्र शासनाद्वारे उपलब्ध असलेल्या असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.यामध्ये विणकरांसाठी 'समर्थ' प्रशिक्षण, हातमाग यंत्र खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य,विणकरांना तांत्रिक सहाय्य करण्यासाठी  'बुनकर मित्र'  या टोल फ्री हेल्पलाइनची  सुविधा,हातमाग वस्तूच्या विक्रीसाठी दिल्ली हाट तसेच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रदर्शनाची उपलब्धता,विणकरांसाठी वैद्यकीय सुविधा आणि विमा सुविधा या योजनांचा समावेश होता. या कार्यक्रमाप्रसंगी हातमाग वस्तूंचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले तसेच  केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे हातमाग क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त  विणकारांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाला हातमाग विणकर, हातमाग निर्यातदार, उद्योजक, हातमाग व्यावसायिक आणि विणकर सेवा केंद्राचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.   
 
 

सप्ताह में एक दिन "शुष्क दिवस" ​​मनाया जाए - बुखार रोगी सर्वेक्षण में आशा वालंटियर्स को सहयोग देने की अपील - आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

[Demo Pick]
नागपुर :- मानसून शुरू होने के बाद मच्छरों का प्रकोप बड़ी संख्या में बढ़ जाता है. इसके कारण डेंगू और चिकनगुनिया जैसी जानलेवा बीमारियाँ पनपती हैं। डेंगू और चिकनगुनिया पर नियंत्रण के लिए स्वास्थ्य विभाग तैयार नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी ने किया. नागपुर शहर में डेंगू और चिकनगुनिया के प्रसार को रोकने के लिए नागपुर नगर निगम का स्वास्थ्य विभाग तैयार है। स्वास्थ्य विभाग की ओर से शहर में बुखार के मरीजों का सर्वे शुरू कर दिया गया है। आशा स्वयंसेवक द्वारा जोनवार सर्वेक्षण कराया जा रहा है। इस सर्वे में आशा स्वयंसेविकाएं घर-घर जाकर बुखार के मरीजों की जानकारी जुटा रही हैं। आयुक्त एवं प्रशासक डॉ. ने 
[DemoPick]
नागरिकों से सर्वेक्षण के दौरान उचित जानकारी देकर सर्वेक्षण कार्य में सहयोग करने की भी अपील की। अभिजीत चौधरी ने किया। नगर पालिका क्षेत्र के अनुसार आशा स्वयंसेविकाओं द्वारा चल रहे सर्वेक्षण अभियान में अब तक 162895 घरों का सर्वेक्षण किया जा चुका है। लगातार बढ़ती बारिश से कीट रोगों का प्रकोप बढ़ रहा है। जहां ऐसी बीमारियां मौजूद हैं, वहां समय पर आवश्यक उपाय करने के लिए आशा स्वयंसेवकों द्वारा सर्वेक्षण किया जा रहा है। इस सर्वे में आशा स्वयंसेविकाएं घर-घर जाकर बुखार के मरीजों की जानकारी जुटा रही हैं। इसके अलावा कंटेनर सर्वे के तहत घर और क्षेत्र में पानी जमा करने वाली वस्तुओं का निरीक्षण किया जा रहा है. 
[आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी]





बुधवार 7 अगस्त तक सभी दस जोन में 162895 घरों का सर्वेक्षण किया गया। इन घरों में 4369 दूषित बर्तन मिले। 6278 कूलर 1112 टायर , 5290 गमले , 2889 ड्रम , 1240 गमले , 894 पक्षी और पशु कंटेनर और 1745 अन्य कंटेनर में डेंगू के लार्वा पाए गए। जहां लार्वा मिला वहां दवा लगाई गई। नागरिकों को घर और क्षेत्र में डेंगू मच्छरों के प्रजनन को रोकने के लिए स्वच्छता का विशेष ध्यान रखना चाहिए। चूंकि डेंगू का लार्वा पानी में बढ़ता है, इसलिए इस बात का ध्यान रखना चाहिए कि कहीं भी पानी जमा न हो। कूलर और गमलों का पानी रोजाना बदलें। इसके अलावा डॉक्टर ने बुखार होने पर तत्काल चिकित्सीय सलाह लेने का भी आग्रह किया।

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 75 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई


नागपूर
:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर,  कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (07) रोजी शोध  पथकाने  75  प्रकरणांची नोंद करून 47800 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेलेफेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 23 प्रकरणांची नोंद करून 9200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. 
दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 12000 रुपयांची वसुली करण्यात आली.  सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून 18000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. कैफे द ओला यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. हैलो वर्ल्ड प्रि स्कुल यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. नेहरु नगर अंतर्गत अब्दुल नजिम यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. रुपशे किराणा स्टोर यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. कुडेजा क्लॉथ व मे. पराथे किराणा शॉप यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. हयात मेडीकॉस यांच्या विरुध्द  वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यात टाकल्याबद्दल रु. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला. 

Saturday, August 3, 2024

गरिबांना उपचारासाठी ‘वेटिंग लिस्ट’मध्ये ठेवू नका! केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या एम्सच्या अधिकाऱ्यांना सूचना

नागपूर- विदर्भासह आसपासच्या प्रदेशातील गरीब रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मिळावेत, त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून आपण नागपूरमध्ये एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आणले आहे. त्यामुळे कुठलाही गरीब रुग्ण उपचारासाठी वेटिंग लिस्टमध्ये राहणार नाही, याची पूर्ण काळजी घ्या, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) एम्सच्या अधिकाऱ्यांना दिल्या.ना. श्री. नितीन गडकरी यांनी एम्स येथील कामाचा आणि यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. यावेळी एम्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विकास महात्मे, संचालक डॉ. प्रशांत जोशी व डॉक्टरांची उपस्थिती होती. कोणत्या उपचारांसाठी आणि 
शस्त्रक्रियांसाठी तसेच तपासण्यांसाठी वेटिंग लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्टचे कारण काय आहे, याचा शोध घ्या. अशी परिस्थिती एम्ससारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कधीच उद्भवणार नाही, याची विशेष काळजी घ्या. गरिबांना उपचारासाठी वाट बघायला लावू नका. गरज पडल्यास नागपुरातील ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा घेता येईल का, हे तपासून बघा,’ अशी सूचना ना. श्री. गडकरी यांनी दिल्या. यासोबतच एम्समधील परिचारिकांची संख्या वाढवून कामाचा ताण कमी करता येईल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. मुबलक औषध साठा आहे की नाही, तपासण्या करणारी यंत्रणा सुसज्ज आहे की नाही, याचीही पूर्ण काळजी घ्या. एम्समधील पूर्ण
 व्यवस्थेचा लाभ गरिबांना होईल यादृष्टीने काम करावे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. यावेळी ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट युनिट, सिकल सेल युनिट, न्युक्लियर मेडिसिन आणि आय बँक या विभागांचेही उद्घाटन झाले.सिकलसेलच्या रुग्णांचा उपचार झालाच पाहिजे ज्या भागात आपण एम्स उभे केले आहे, तेथील सर्वांत मोठी समस्या सिकलसेल आणि थॅलेसिमियाची आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे एम्समध्ये त्यांचा उपचार झालाच पाहिजे, असा आग्रह ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. ज्यांना गरज आहे अशा जास्तीत जास्त रुग्णांचे बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट एम्समध्ये जास्तीत जास्त प्रमाणात व्हावे, असेही ते म्हणाले.

गेल्या १० वर्षांत काँक्रीटीकरण, डांबरीकरण आणि दुरुस्ती केलेल्या रस्त्यांचे ऑडिट करावे: आमदार विकास ठाकरे

नागपूर: डांबरीकरण, काँक्रीटीकरण आणि खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती केलेले रस्ते काही महिन्यांतच खराब होताना दिसतात. खरे तर हे रस्ते 3-5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ टिकले पाहिजेत. यामुळे सार्वजनिक पैशांचा मोठा अपव्यय होत आहे आणि नागरिकांना गंभीर गैरसोय होत आहे. म्हणूनच, नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, PWD, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि MahaMetro यांनी गेल्या दशकात काँक्रीटीकरण, डांबरीकरण आणि दुरुस्ती केलेल्या सर्व रस्त्यांचे ऑडिट करावे, अशी मागणी पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर जिल्हा (शहर) काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरेंनी केली. पश्चिम नागपूर विधानसभेत शंकर नगर 
चौक ते रामनगर चौक हा रस्ता ताजे उदाहरण आहे. नागपूर महानगरपालिकेने या रस्त्याचा डांबरीकरण करण्यासाठी, पादचारी मार्गाचे पुनर्निर्माण इत्यादींसाठी सुमारे २ कोटी रुपयांचे कामाचे कार्यदेश एका ठेकेदाराला दिले होते. रस्ता मार्चमध्ये डांबरीकरण करण्यात आला होता आणि उर्वरित कामे सुरू आहेत. पाच महिन्यांत रस्त्यावर खड्डे पडले आहेत आणि रस्ता खडीने भरलेला आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची DLP (defect liability period) सुमारे तीन वर्षांची असते. रस्ता डीएलपीच्या 3 वर्षांहून अधिक काळ टिकून राहायचा होता, ठाकरे म्हणाले.सिमेंट काँक्रीट रस्त्यांचीही तीच अवस्था आहे. DLP कालावधी पाच वर्षांहून अधिक असूनही काँक्रीटीकरणानंतर काही महिन्यांतच भेगा, खड्डे, तडकलेली पृष्ठभागाची थर, पेव्हर ब्लॉकचे बसणे वगैरे सामान्य दृश्य आहे,” असे ठाकरे म्हणाले.ठाकरे पुढे म्हणाले, "खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती केलेल्या रस्त्यांची स्थिती खूपच खराब आहे आणि त्यामुळे अपघात होत आहेत. हे सर्व अभियंते आणि कंत्राटदारांमधील साटेलोटे आहे. गेल्या १० वर्षांत या सरकारी यंत्रणांनी एकही कंत्राटदार काळ्या यादीत टाकलेला नाही. नागपूरभरातील रस्त्यांची स्थिती चालू पावसाळ्यात खूपच खराब आहे. त्यामुळे, विभागीय आयुक्तांनी नागपूरमध्ये गेल्या १० वर्षांत केलेल्या सर्व रस्त्यांच्या कामांचे, DLP कालावधीतील रस्त्यांची स्थिती, संबंधित सरकारी यंत्रणेने केलेली कारवाई, संबंधित सरकारी यंत्रणेने केलेली दुरुस्ती आणि इतर बाबींसह ऑडिट करावे. यामुळे निश्चितच मोठा घोटाळा उघड होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे सार्वजनिक पैशांच्या नुकसानीची आणि नागरिकांच्या गैरसोयीची टाळणी करण्यात मदत करेल,” असे ठाकरे म्हणाले.
 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...