Friday, August 9, 2024

ऑगस्ट क्रांती शहीद दिना निमित्त म.न.पा. द्वारा शहीदांना अभिवादन

नागपूर:- भारतीय स्वातंत्र्य लढयातील शहीदांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिना प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. अभिजीत चौधरी आयुक्त तथा प्रशासक यांनी जुने मॉरीस कॉलेज फ्रिडम पार्क (‍झिरो माईल) जवळील हुतात्मा स्मारकास पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नागपूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीचे अध्यक्ष माजी आमदार यादवराव देवगडे, संयोजक रघुवीर देवगडे, माजी आमदार दिनानाथ पडोळे
, माजी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, म.न.पा.चे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी आदि उपस्थित होते. तत्पूर्वी इतवारी शहीद चौक येथील शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण
करुन अभिवादन केले. तसेच कॉटन मार्केट शहीद चौक येथील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली दिली. यावेळी अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, सुरज पांडे आदि उपस्थित होते.जागतिक आदिवासी दिना निमित्त मनपा मुख्यालयातील क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनपा तर्फे विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे स्वप्निल लोखंडे, आयुक्त कार्यालयाचे जितेश धकाते, राजेश गजभिये, शैलेश जांभुळकर, प्रकाश ढोके, जितेंद्र पवनीकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...