Tuesday, January 28, 2025

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 67 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (28) रोजी शोध पथकाने 67 प्रकरणांची नोंद करून 42,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 5,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. 
मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 19,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत श्री. अक्षय चौधरी यांनी खराब कचरा रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. राजेश किराणा शॉप यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला.
सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अंजली किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. सोनी बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. सिनर्जी हॉस्पिटल तसेच मे. अजमेर टायर प्रा. एलटिडी यांनी मनपा विरूध्द विना परवानगी शिवाय  विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला.

सोनी समाज ने मनाया गणतंत्र दिन

नागपुर:- सोनी समाज मित्र मंडल की ओर से गणतंत्र दिवस पर नव नियुक्त अध्यक्ष श्री प्रकाश वर्मा ने ध्वज वंदन कियामनपा समाज भवन, गणेशपेठ में आयोजित कार्यक्रम में उपाध्यक्ष श्री संजय सोनी, महासचिव श्री मनीष सोनी, कोषाध्यक्ष श्री उदय सोनी, संगठन सचिव श्री संदीप सोनी, सर्वश्री कांतिलाल सोनी, अधि राधेश्याम वर्मा, अजय वर्मा, गोवर्धनदास वर्मा, रणजीत सोनी, श्री आशीष सोनी. श्री योगेश्वर सोनी. श्री लक्ष्मीनारायण सोनी. श्रीमती नंदिता सोनी. श्रीमती संगीता वर्मा. श्रीमती सपना सोनी. रणजीत सोनी जी की माता जी. पुत्र और श्री देशकरजी. श्री वाघाडे जी प्रमुख रूप से उपस्थित रहे।

Monday, January 27, 2025

ग्लोबल’ आणि ‘अफॉरडेबल’ नागपूर शहर विकसीत करण्याचा निर्धार : डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर:- नागपूर शहरातील नागरिकांना सर्व प्राथमिक सुविधा प्रदान करतानाच शहरातील विविध विकास प्रकल्पांना वेळेत पूर्ण करण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहराचा चौफेर विकास होत असताना नागरिकांना सुलभता प्रदान करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न् सुरू आहेत. शहरातील नागरिकांच्या सहकार्याने नागपूर शहर हे ‘ग्लोबल’ आणि ‘अफॉरडेबल’ शहर म्हणून विकसीत करण्याचा निर्धार करुअसे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रजासत्ताक दिनी केले. रविवारी २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात आलेयाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलअतिरिक्त आयुक्त श्रीअजय चारठाणकरमुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्येउपायुक्त श्रीमती विजया बनकरउपायुक्त सर्वश्री विजय देशमुखप्रकाश वराडेमिलींद मेश्रामगणेश राठोडअशोक गराटे, उपायुक्त डॉरंजना लाडेपरिवहन व्यवस्थापक श्रीविनोद जाधवअधीक्षक 
अभियंता श्रीमनोज तालेवारडॉश्वेता बॅनर्जीडॉ. अनुश्री चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी अग्निशमन विभागाच्या पथसंचलनाचे निरीक्षण केले व मानवंदना स्वीकारलीअग्निशमन विभागाच्या तीन प्लाटून ने आयुक्तांना मानवंदना दिली. पहिल्या प्लाटूनचे नेतृत्व कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रचे केंद्राधिकारी श्री. भगवान बी. वाघदुसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व लकडगंज अग्निशमन केंद्राचे उप. अग्निशमन अधिकारी श्री. दिलीप पी. चव्हान आणि तिसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व गंजीपेठ अग्निशमन केंद्रचे उप. अग्निशमन अधिकारी श्री. प्रकाश एन. कावडकर यांनी केले.  ध्वजवंदन कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच यावेळी क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मूलनाची शपथ घेण्यात आलीपुढे बोलताना आयुक्त म्हणालेशहरातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांगमहिलाबालक यांच्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याकरिता अनेक योजना अंमलत आणण्यात आलेल्या आहेत. नागपूर शहराचे महापौर राहिलेल्या मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला  १०० दिवसीय सात कलमी कृती कार्यक्रम आखून दिलेला आहेया कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी मनपाद्वारे 
करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुलभतेसाठी अनेक महत्वाचे कार्य करण्यात येत आहेत. नागपूर शहराची स्वच्छसुंदर ही ओळख अधिक प्रभावीपणे जनमानसात जावी याकरिता स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शहराची कामगिरी उंचावण्याची प्राथमिकता असल्याचेही आयुक्त म्हणाले. नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे ‘शिक्षणोत्सव’ सुरु आहे. या महोत्सवामध्ये शिक्षकांकरिता शिक्षणोत्सवाचे लोगो तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये मनपाच्या संजय नगर माध्यमिक शाळेच्या शिक्षिका डॉ. मिनाक्षी भोयर यांच्या लोगोची निवड करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते या लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच डॉ. मिनाक्षी भोयर यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरउद्यान अधीक्षक श्री. अमोल 
चौरपगारघनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्लेसहायक आयुक्त श्री. श्याम कापसेसहायक आयुक्त श्री. घनश्याम पंधरेविजय थूलअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारकार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणेकार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड यांच्यासह मोठ्या संख्येत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मनपाचे संगीत शिक्षक श्री. प्रकाश कलसिया यांच्यासह श्री. उमेश पवार व कमलाकर मानमोडे यांनी पथसंचालनाला संगीत साथ दिली. श्री. कलसिया यांनी राष्ट्रगीत व राज्यगीत गायले. कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व मुख्य शिक्षिका श्रीमती शुभांगी पोहरे यांनी केले.
 

प्रजासत्ताक सोहळ्यातील परेडमध्ये मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग

नागपूर:- २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाचा शासकीय सोहळा शहरातील कस्तुरचंद पार्क येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री महोदयांना मानवंदना देणाऱ्या परेडमध्ये यंदा नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविण्याचा बहुमान मिळाला.नागपूर महानगरपालिकेच्या परेडमध्ये संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा व विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी आनंद 
व्यक्त केला. त्यांनी परेडमध्ये सहभागी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधलाविद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे मनपाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करुन सन्मानित केले.याप्रसंगी मनपा शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामश्री. विनय बगलेशाळा निरीक्षक श्री. प्रशांत टेंभुर्णेसंजयनगर हिंदी माध्यम शाळेच्या श्रीमती दांडेकरश्रीमती भगतश्री. डोईफोडेवैभव कुंभरे उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 40 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (27) रोजी शोध पथकाने 40 प्रकरणांची नोंद करून 41,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून  3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 20,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- 
रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून 800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 13,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. जनरल क्लिीनीक यांनी मनपा विरूध्द विनापरवानगीशिवाय विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. तसेच मे. बऊफेज कॅफे यांनी अनधिकृत ठिकाणी गरम कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. ईम्याजीन सायन्स यांनी मनपा विरूध्द विनापरवानगीशिवाय विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. माहजन सोनपापडी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 4 प्रकरणांची नोंद करून रू. 20,000/- दंड वसूल केला.

Wednesday, January 22, 2025

फिरते वाहना मुळे येणार लसीकरणाला गती आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर:- नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग व लॉयन्स इंटरनॅशनलचे युनिटलॉयन्स क्लब नागपूर कॉसमॉस यांच्या संयुक्त विद्यमाने   'फिरते वाहनाचा'   (चालते फिरते लसीकरण पथक)  मध्य नागपूरचे आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या हस्ते शुभारंभ झाला. बुधवारी (ता. २२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत येथे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकरउपायुक्त विजया बनकरलॉयन्स क्लब नागपूर कॉसमॉस पास्ट कौन्सिल चेअर पर्सन श्री. राजे मुधोजी भोसले यांनी या विशेष 'फिरते वाहनाला' (चालते फिरते लसीकरण पथक)हिरवी झेंडी दाखवली.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक बालकाच्या संपूर्ण लसीकरणाला गती देण्यासाठी मनपाद्वारे हा 
महत्वाचा पुढाकार घेण्यात आलेला आहे. सदर  'फिरते वाहन'  शहरातील विविध वस्त्याझोपडपट्टी भागांमध्ये जाऊन बालकांचे लसीकरण करेल. फिरते वाहनाच्यालोकार्पण प्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारप्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाडलॉयन्स क्लब नागपूर कॉसमॉस जीएटी एरिया लिडर श्री विनोद वर्माइमिडीएट पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. बलबीर सिंग विजक्लब प्रेसिडेंट श्री. अनिल लांजेवारसचिव श्री. आकाशकोषाध्यक्ष श्री. राजा देहारीयाप्रकल्प संचालक मोहिंदर पालसिंग मानपास्ट प्रेसिडेन्ट 






श्री. हरीश गुप्तापास्ट प्रेसिडेन्ट कवलजीत कौर विजपास्ट ऍडिशनल सेक्रेटरी श्री. प्रमोद कानेटकरबोर्ड मेंबर श्री. जसकीर्थ सिंग विज,श्री. जयंतीभाई पुनामिया (पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर)श्री. परविंदर सिंग विज (पास्ट प्रेसिडेंट गुरुद्वारा गुरु नानक दरबार) यांच्यासह मनपाचे झोनल वैद्यकीय अधिकारीपी.एच. एन श्रीमती अर्चना खाडे  व इतर कर्मचारी उपस्थित होते.शहराच्या स्लम भागात राहणाऱ्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी याकरिता  'फिरते वाहन'  (चालते फिरते लसीकरण पथक)  ही विशेष सेवा नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.  हे वाहन लायन्स क्लब नागपूर कॉसमॉस यांच्याकडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे वाहन शहरात लसीकरणसपासून वंचित असलेल्या बालकांचे लसीकरण करण्याकरिता उत्तम कार्य करेल असा विश्वास आमदार श्री. प्रवीण दटके यांनी व्यक्त केला.नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे चमूवैद्यकीय अधिकारीपरिचारिका यांचा या 'फिरते वाहनामध्ये' (चालते फिरते लसीकरण पथक) सहभाग असेल. मनपाकडून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. या वाहनाचा उपयोग मुख्यतः शहरातील बालकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याकरिता करण्यात येईल. ही चमू शहरातील सर्व झोनमध्ये व तसेच 'हाय रिस्क एरियामध्ये जाऊन लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचे लसीकरण करेल. या वाहनामुळे लसीकरणात गती येईल आणि बालकांचे वेळेत लसीकरण होण्यास मदत होईल. हे फिरते वाहन (चालते फिरते लसीकरण पथक) झोननिहाय सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत लसीकरण मोहीम चालवतील. यामुळे बालकांचे ठिकठिकाणी जाऊन जास्तीत जास्त लसीकरण होण्यास मदत होईल.

कचरा संकलना करिता मनपाच्या नव्याने 30 वाहने सेवेत

 
नागपूर:- नागपूर शहरातील कचरा संकलनाचे कार्य अधिक चांगले व्हावे तसेच नागरिकांना चांगली सोयी सुविधा व्हावी याकरिता नागपूर महानगरपालिका द्वारे नवीन 30 वाहने खरेदी करून त्यांना कचरा संकलनाचे कामाकरीता भाडेतत्त्वावर एजन्सीला मा. आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांचे हस्ते हस्तांतरित करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आँचल गोयलउपायुक्त श्री विजय देशमुखउपायुक्त श्री प्रकाश वराडेघनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख. डॉगजेंद्र महल्ले व इतर अधिकारी उपस्थित होते.नागपूर महानगरपालिका द्वारा कचरा संकलन व वाहतूक करिता दोन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. मे. ए.जी. इंविरो. प्रा. लि. यांचेकडे झोन क्र.ते 5 या झोन ची व मे. बी. व्ही.जी. इंडिया लि. यांचेकडे झोन क्र 6 ते 10 या झोन मधील घराघरांतून कचरा संकलन 
करून वाहतूक करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन्ही एजेन्सीला कचरा संकलनाकरिता वाहनांच्या संख्येमध्ये वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु पुरेशा प्रमाणात वाहन वाढविण्यात आले नाही. त्याकरिता दोन्ही एजन्सी विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच यामधून महानगरपालिका द्वारे कचरा संकलनाचे नवीन वाहन खरेदी करण्यात आली. एकूण 30 वाहने खरेदी करण्यात आली असून या नवीन वाहनांमुळे कचरा संकलनाच्या कामामध्ये नियमितता दिसून येईल. शहरातील ज्या भागांमध्ये वाहने अनियमितरित्या घराघरामधून कचरा संकलन होत होत्या अशा भागांमध्ये या वाहनांचा वापर करून या परिसरातील कचरा संकलनाचे कामामध्ये सुधारणा होणार आहे. यामुळे अशा परिसरतील कचरा जमा होणारे ठिकाणांचे प्रमाण कमी करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात मदत होणार आहे. या वाहनांची संपूर्ण देखभाल व मनुष्यबळ कचरा संकलन करणाऱ्या दोन्ही एजन्सी मार्फत करण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 65 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (22) रोजी शोध पथकाने 65 प्रकरणांची नोंद करून 48,300/- रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून  400/- रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून  8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे(रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या 
अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 25,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशापगॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ताफुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 3,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. अन्ना ईडली यांनी कचरा अन्नपदार्थ टाकून चेंबरमध्ये अडथळा आणणे आणि हरित न्यायाधिकरण कायद्यांतर्गत दंड म्हणून मनपा आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच मे. भारत नर्सरी यांनी नर्सरीची रोपवाटिका रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. राधाकृष्ण्‍ा हाईट्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत मे. बन्सल क्लासेस यांनी मनपा यांच्या विरूध्द विनापरवानगीशिवाय जवळच्या रस्त्याच्या कडेला बॅनर होर्डिंगचे प्रदर्शन केल्याबद्दल 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. 
तसेच मे. संजय बिकाजी पांडे यांनी जुने घर पाडताना योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे मनपा आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. संतोष स्वीट्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. पवन सोनपापडी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत जनाब मोहम्मद रफीक तसेच अमीत मधुकर यांनी कारखान्यातून ध्वनी प्रदूषण पसरवत असल्याचे मनपा आदेशाचे उल्लंघन (तक्रारीवरून) केल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- रुपयाचा असे एकुण रु. 10,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू. 65,000/- दंड वसूल केला.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...