Wednesday, January 22, 2025

कचरा संकलना करिता मनपाच्या नव्याने 30 वाहने सेवेत

 
नागपूर:- नागपूर शहरातील कचरा संकलनाचे कार्य अधिक चांगले व्हावे तसेच नागरिकांना चांगली सोयी सुविधा व्हावी याकरिता नागपूर महानगरपालिका द्वारे नवीन 30 वाहने खरेदी करून त्यांना कचरा संकलनाचे कामाकरीता भाडेतत्त्वावर एजन्सीला मा. आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांचे हस्ते हस्तांतरित करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आँचल गोयलउपायुक्त श्री विजय देशमुखउपायुक्त श्री प्रकाश वराडेघनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख. डॉगजेंद्र महल्ले व इतर अधिकारी उपस्थित होते.नागपूर महानगरपालिका द्वारा कचरा संकलन व वाहतूक करिता दोन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. मे. ए.जी. इंविरो. प्रा. लि. यांचेकडे झोन क्र.ते 5 या झोन ची व मे. बी. व्ही.जी. इंडिया लि. यांचेकडे झोन क्र 6 ते 10 या झोन मधील घराघरांतून कचरा संकलन 
करून वाहतूक करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दोन्ही एजेन्सीला कचरा संकलनाकरिता वाहनांच्या संख्येमध्ये वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु पुरेशा प्रमाणात वाहन वाढविण्यात आले नाही. त्याकरिता दोन्ही एजन्सी विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच यामधून महानगरपालिका द्वारे कचरा संकलनाचे नवीन वाहन खरेदी करण्यात आली. एकूण 30 वाहने खरेदी करण्यात आली असून या नवीन वाहनांमुळे कचरा संकलनाच्या कामामध्ये नियमितता दिसून येईल. शहरातील ज्या भागांमध्ये वाहने अनियमितरित्या घराघरामधून कचरा संकलन होत होत्या अशा भागांमध्ये या वाहनांचा वापर करून या परिसरातील कचरा संकलनाचे कामामध्ये सुधारणा होणार आहे. यामुळे अशा परिसरतील कचरा जमा होणारे ठिकाणांचे प्रमाण कमी करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात मदत होणार आहे. या वाहनांची संपूर्ण देखभाल व मनुष्यबळ कचरा संकलन करणाऱ्या दोन्ही एजन्सी मार्फत करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...