Wednesday, January 22, 2025

फिरते वाहना मुळे येणार लसीकरणाला गती आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर:- नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग व लॉयन्स इंटरनॅशनलचे युनिटलॉयन्स क्लब नागपूर कॉसमॉस यांच्या संयुक्त विद्यमाने   'फिरते वाहनाचा'   (चालते फिरते लसीकरण पथक)  मध्य नागपूरचे आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या हस्ते शुभारंभ झाला. बुधवारी (ता. २२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत येथे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकरउपायुक्त विजया बनकरलॉयन्स क्लब नागपूर कॉसमॉस पास्ट कौन्सिल चेअर पर्सन श्री. राजे मुधोजी भोसले यांनी या विशेष 'फिरते वाहनाला' (चालते फिरते लसीकरण पथक)हिरवी झेंडी दाखवली.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक बालकाच्या संपूर्ण लसीकरणाला गती देण्यासाठी मनपाद्वारे हा 
महत्वाचा पुढाकार घेण्यात आलेला आहे. सदर  'फिरते वाहन'  शहरातील विविध वस्त्याझोपडपट्टी भागांमध्ये जाऊन बालकांचे लसीकरण करेल. फिरते वाहनाच्यालोकार्पण प्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारप्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाडलॉयन्स क्लब नागपूर कॉसमॉस जीएटी एरिया लिडर श्री विनोद वर्माइमिडीएट पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री. बलबीर सिंग विजक्लब प्रेसिडेंट श्री. अनिल लांजेवारसचिव श्री. आकाशकोषाध्यक्ष श्री. राजा देहारीयाप्रकल्प संचालक मोहिंदर पालसिंग मानपास्ट प्रेसिडेन्ट 






श्री. हरीश गुप्तापास्ट प्रेसिडेन्ट कवलजीत कौर विजपास्ट ऍडिशनल सेक्रेटरी श्री. प्रमोद कानेटकरबोर्ड मेंबर श्री. जसकीर्थ सिंग विज,श्री. जयंतीभाई पुनामिया (पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर)श्री. परविंदर सिंग विज (पास्ट प्रेसिडेंट गुरुद्वारा गुरु नानक दरबार) यांच्यासह मनपाचे झोनल वैद्यकीय अधिकारीपी.एच. एन श्रीमती अर्चना खाडे  व इतर कर्मचारी उपस्थित होते.शहराच्या स्लम भागात राहणाऱ्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी याकरिता  'फिरते वाहन'  (चालते फिरते लसीकरण पथक)  ही विशेष सेवा नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.  हे वाहन लायन्स क्लब नागपूर कॉसमॉस यांच्याकडून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे वाहन शहरात लसीकरणसपासून वंचित असलेल्या बालकांचे लसीकरण करण्याकरिता उत्तम कार्य करेल असा विश्वास आमदार श्री. प्रवीण दटके यांनी व्यक्त केला.नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे चमूवैद्यकीय अधिकारीपरिचारिका यांचा या 'फिरते वाहनामध्ये' (चालते फिरते लसीकरण पथक) सहभाग असेल. मनपाकडून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. या वाहनाचा उपयोग मुख्यतः शहरातील बालकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याकरिता करण्यात येईल. ही चमू शहरातील सर्व झोनमध्ये व तसेच 'हाय रिस्क एरियामध्ये जाऊन लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांचे लसीकरण करेल. या वाहनामुळे लसीकरणात गती येईल आणि बालकांचे वेळेत लसीकरण होण्यास मदत होईल. हे फिरते वाहन (चालते फिरते लसीकरण पथक) झोननिहाय सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत लसीकरण मोहीम चालवतील. यामुळे बालकांचे ठिकठिकाणी जाऊन जास्तीत जास्त लसीकरण होण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...