Monday, July 22, 2024

शंकरनगर परिसराची पाहणी करीत मनपा आयुक्तांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

नागपूर ता २२: नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शंकरनगर परिसराची पाहणी करीत स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी आमदार श्री. विकास ठाकरे व भागातील नागरिक उपस्थित होते.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी धरमपेठ झोनच्या अधिकार्‍यांसोबत इंदिरा गांधी रुग्णालय ते शंकरनगर दरम्याच्या बाभुळकर मार्गाचा दौरा केला आणि नाग नदीच्या काठावर असलेले झोपडे तत्काळ हटविणायचे निर्देश दिले. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत 
चौधरी यांनी इंदिरा गांधी रुग्णालय ते शंकरनगर दरम्यानची पाहणी केली. यावेळी आयुक्त श्री. चौधरी यांनी नाग नदीच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या झोपडे हटविण्याचे निर्देश दिले. याशिवाय तुटलेली सीवर लाइन तात्काळ  दुरुस्त करून पुलाची दुरूस्ती करावीरस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या कापाव्यात आदी निर्देशित केले.याप्रसंगी मनपाचे अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारकार्यकारी अभियंता श्री. विजय गुरुबक्षानीकनिष्ठ अभियंता श्री. मनोहर राठोड उपस्थित होते.

मनपा आयुक्तांनी घेतला आपात्कालीन यंत्रणेच्या कामाचा आढावा

नागपूर:- पावसामुळे नागपूर शहरात निर्माण झालेल्या आपात्कालीन प्रसंगातून दिलासा देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचे कार्य निरंतर सुरू आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सोमवारी (ता.२२) मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर व प्रादेशिक आपत्ती मुख्य नियंत्रण कडून अग्निशमन विभाग येथे भेट दिली व सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.शनिवारी २० जुलै रोजी मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी जमा झाले तर अनेक भागांमध्ये झाडांची पडझड झाली.  रविवार २१ जुलैपर्यंत अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागउद्यान विभागघनकचरा व्यवस्थापन विभागसार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाद्वारे मदत आणि बचाव कार्य करण्यात आले. रस्त्यावरपरिसरात जमा झालेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. रस्त्यावर 
पडलेली झाडे बाजूला सारुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. तर आरोग्य विभागहिवताप व हत्तीरोग विभाग या विभागाद्वारे परिसरात फवारणी करून नागरिकांना आवश्यक औषधांचा देखील पुरवठा करण्यात आला. आज सोमवारी २२ जुलै रोजी अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाद्वारे अनेक अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये जमा असलेले पाणी काढण्याबाबत कार्य करण्यात आले.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर व प्रादेशिक आपत्ती मुख्य नियंत्रण कडून अग्निशमन विभाग येथील नियंत्रण कक्षामध्ये भेट दिली व संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी. पी. चंदनखेडे यांनी शहरात अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाद्वारे करण्यात आलेली कामे आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या मदतकार्याची माहिती आयुक्तांना दिली. मदतकार्य करण्यात आलेल्या भागांची यादी हिवताप व हत्तीरोग विभागाला सोपवून संबंधित भागात फवारणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.शनिवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. हुडकेश्वर मार्गावरील सेंट पॉल स्कूल जवळील नाल्यामध्ये ८५ वर्षीय सुधा वेळुकर ही महिला वाहून गेली. याबाबत माहिती मिळताच सक्करदरा अग्निशमन केंद्राच्या पथकाद्वारे घटनास्थळी शोध मोहिम राबविण्यात आली. यात महिलेचा मृतदेह पथकाने बाहेर काढला. पुनापुर रोड भरतवाडा येथील नाल्यामध्ये वाहून गेल्याने ५२ वर्षीय भोजराज पटले या व्यक्तीचा मृत्यू झाला. सुगत नगर व कळमना अग्निशमन केंद्राच्या पथकाने त्यांचे शव बाहेर काढले. याशिवाय भरतवाडा पवनगाव येथे, १२ वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेला. या घटनेची माहिती कळमना पोलिस स्टेशनमधून मिळताच सुगत नगर अग्निशमन व लकडगंज अग्निशमन पथकाद्वारे शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

गोधनी रोड झिंगाबाई टाकळी प्रकाश नगर चौक येथे एका घरामध्ये मुलगा बंद झालेला होता. घटनेची माहिती मिळताच सुगत नगर अग्निशमन केंद्राच्या पथकाने घटनास्थळी जाउन मुलाला सुखरुप बाहेर काढले. याशिवाय दीनदयाल नगर आजी आजोबा उद्यानात झाड पडलेआनंद अपार्टमेंट सक्करदरा येथे पाणी जमा,  नरेंद्र नगर येथील श्री. देवतारे यांच्या घरात पाणी जमात्रिमुर्ती नगर येथील श्री. गजानन मंदिराजवळ पाणी जमाअयोध्या नगर येथे श्याम प्रिंटर्स येथे पाणी जमाभांडेवाडे येथील देवीदास चौकात पाणी जमाव्यंकटेश नगर येथे पाणी जमा अशा विविध तक्रारी प्राप्त झाल्या. यावर नजीकच्या अग्निशमन केंद्रांनी घटनास्थळी जाउन पाणी बाहेर काढून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले. मनपाच्या मलेरिया व फायलेरिया विभागा मार्फत मानेवाडा, बेसा, लकडगंज, नंदनवन, लक्ष्मीनगर, कळमना, अयोध्या नगर, मोहन नगर, सक्करदरा, सुगत नगर, हुडकेश्वर, नरसाळा, पिपळा गाव इतर भागात फवारणी करण्यात येत आहे. तसेच संतरा मार्केट, मारवाडी चाल, इंदिरा गांधीनगर, झापेडपट्टी येथे सुध्दा मनपा तर्फे फवारणी व स्वच्छता करण्यात येत आहे.
 

पावसामुळे बाधित भागात मनपाचे मदतकार्य चिखल साफ, फवारणी देखील केली

नागपूर:- शनिवारी २० जुलै रोजी आलेल्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पाणी जमा झाले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त द्वय श्रीमती आंचल गोयल आणि श्री. अजय चारठणकर यांनी जलमय झालेल्या भागांमध्ये भेट देऊन पाहणी केली. बाधित भागांमध्ये मदतकार्य करण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले. त्यांच्या निर्देशानुसार शनिवारपासून (ता.२०) मनपाद्वारे विविध भागांमध्ये मदतकार्य सुरु आहे.नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, उद्यान विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, हिवताप व हत्तीरोग विभाग या सर्व विभागांद्वारे समन्वयाने मदत आणि सेवाकार्य करण्यात येत आहे.शनिवारी आलेल्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पाणी 
जमा झाले, झाडे पडली. मनपाच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाद्वारे जलमय भागातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. झाडे पडलेल्या भागात अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग आणि उद्यान विभागाद्वारे पडलेली झाडे, फांद्या हटविण्याचे कार्य आज रविवारी देखील सुरु आहेत. पाणी जमा झालेल्या भागातून पाण्याचा निचरा करण्यात आला. या भागांमध्ये चिखल जमा असून ते देखील घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे स्वच्छ करण्यात येत आहे. पावसाळी नाल्यांची देखील स्वच्छता सुरु आहे. हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे स्वच्छता झालेल्या भागांमध्ये डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येत आहे. पावसामुळे बाधित भागातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मनपाचे सर्व विभाग प्राधान्याने जलदगतीने काम करीत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त द्वय श्रीमती आंचल गोयल व श्री. अजय चारठणकर हे देखील स्वतः वेळोवेळी कामाचा आढावा घेत आहेत. 

सुभान नगर येथील मल वाहिनीची दुरूस्ती सुरू

नागपूर:- पारडी येथील सुभान नगरमध्ये सोमवारी (ता. २२) सकाळी फुटपाथ खचले व त्यामुळे येथील मलवाहिनी बाधित झाली. याबाबत तात्काळ दखल घेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मनपाद्वावारे तात्काळ रस्त्यावर बॅरीकेडिंग करण्यात आले. तसेच लकडगंज झोनतर्फे पथदिवे देखील हटविण्यात आले आहेत. आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे लकडगंज झोन तर्फे मलवाहिनीचे सांडपाणी दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. फुटपाथच्या खाली असलेली ९०० डायमीटरची मलवाहिनी खचल्याने १० फुट खोल मोठा खड्डा तयार झाला. यासंदर्भात कार्यकारी अभियंता श्री. संजय माटे यांनी सांगितले कीखड्ड्याभोवती सँड बॅग्स लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 41 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई....

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (22) रोजी शोध पथकाने 41 प्रकरणांची नोंद करून 25200 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/ उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 500  रुपयांची वसुली करण्यात आली.  हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत प्रकरणांची नोंद करून 1600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 900 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप,
कमान स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद 
करणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 10000 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आलीउपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 11 प्रकरणांची नोंद करून 2200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून 8000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत अनिल वराडे (बिल्डर्स) व मे. मायक्रोप्रो सॉफ्टवेअर प्रा. लि. यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 15,000/- चे दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन मे. अर्थकॉन बिल्डर्स यांच्या कडून सुध्दा रू. 10,000/- दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत जयबजरंग स्वीट्स प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. आसमा बिल्डकॉन यांच्या कडून रू. 10,000/- दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.

Saturday, July 20, 2024

नागपुरवासियों को 'ऑक्सीजन पार्क' का मिलेगा अनोखा उपहार,वरिष्ठ नागरिकों की सेवा के लिए एक और इलेक्ट्रिक बस....

 नागपुर:- केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने घोषणा की है कि पक्षियों को पूरी तरह से समर्पित 'बर्ड पार्क' और आम नागरिकों को स्वच्छ हवा देने वाले ऑक्सीजन पार्क का अनूठा उपहार अगले महीने नागपुरवासियों को दिया जाएगा। वह सीनियर सिटीजन फाउंडेशन की ओर से आयोजित एक कार्यक्रम में बोल रहे थे. वरिष्ठ नागरिकों की तीर्थयात्रा के लिए आज एक और इलेक्ट्रिक बस आ गई है और इसका उद्घाटन गड़करी द्वारा किया गया। गडकरी ने 'ऑक्सीजन पार्क' के बारे में जानकारी दी. नेशनल हाईवे अथॉरिटी ने जामथा इलाके से गुजरने वाली आउटर रिंग रोड पर यह ऑक्सीजन पार्क बनाया है। यह पार्क गड़करी की संकल्पना से साकार हुआ है। ऐसे में दिव्यांग पार्क के बाद एक और अनोखी जगह नागपुरवासियों के साथ-साथ पर्यटकों का भी ध्यान खींचने वाली 

है। पार्क में एक कैफे, साइकिल ट्रैक, केवल पक्षियों के लिए बगीचे शामिल होंगे। यहां के फलों पर केवल पक्षियों का ही अधिकार होगा। गडकरी को वातानुकूलित इलेक्ट्रिक बस की चाबी जायका मोटर्स के मुख्य निदेशक कुमार काले ने दी गई। इसके बाद गडकरी ने फीता काटकर इस बस को वरिष्ठ नागरिकों की सेवा में पेश किया. इस अवसर पर टाटा मोटर्स के महाप्रबंधक आनंद खारवडीकर, उपमहाप्रबंधक सुधीर भाले, सीनियर सिटीजन फाउंडेशन के सचिव डॉ राजू मिश्रा, डॉ संजय उगेमुगे, मोहन पांडे उपस्थित थे साथ ही इस अवसर पर पुणे से टाटा मोटर्स के अधिकारी सर्वश्री अनिकेत वैद्य, अमोल तालेकर, आनंद अगाशे, गणेश चौधरी भी उपस्थित थे। यह बस ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान द्वारा वरिष्ठ नागरिकों को धार्मिक एवं पर्यटन स्थलों की यात्रा के लिए उपलब्ध करायी जायेगी। 
यह बस नागपुर से माहुर तक जायेगीखास यह कि यह बस नि:शुल्क चलाई जाएगी। बस एक बार चार्ज करने पर 250 किलोमीटर का सफर तय करने की क्षमता रखती है। वरिष्ठ नागरिक प्रतिष्ठान श्री.एलेक्ट्रा कंपनी और अशोक ले-लैंड कंपनी की एक डबल डेकर बस नितिन गडकरी के सौजन्य से मिल चुकी है। इन दोनों बसों के जरिए 26 हजार से ज्यादा वरिष्ठ नागरिकों ने शेगांव, अदासा, रामटेक समेत विदर्भ के कई धार्मिक स्थलों के दर्शन किए हैं। खास तौर पर फाउंडेशन की ओर से यह सेवा निःशुल्क प्रदान की जाती है।

भांडेवाडीतील वस्तींमध्ये तात्काळ पंचनामे करण्याचे आयुक्तांचे निर्देश घटनास्थळी तत्काळ भेट देऊन आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी नागरिकांशी साधला संवाद

 
नागपूर:-भांडेवाडी परिसरातील वस्तींमध्ये झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून, नागरिकांना त्वरित लाभ देण्यात यावा असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.शनिवारी (ता: २०) सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडेवाडी येथील भिंत तुटल्याने जवळपासच्या सूरज नगर, अंतूया नगर, तुळशी नगर परिसरातील नागरिकांना  अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असून, घटनेची माहिती मिळताच मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, श्री. राजेश दुफारे, सहायक आयुक्त श्री. घनशाम पंधरे, माजी नगरसेविका श्रीमती आभा 
पांडे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, स्वच्छता विभागाचे श्री. रोहिदास राठोड यांच्यासह स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भांडेवाडी येथील तुटलेल्या भिंतीचे निरीक्षण केले. नंतर सुरज नगर, अंतूया नगर, तुळशी नगर परिसरात ज्याठिकाणी घरांमध्ये पाणी आणि कचरा पसरला आहे अशा ठिकाणी भेटदेत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी भिंत तुटून घरात आलेल्या कचऱ्याला लवकरात लवकर स्वच्छ करावे, पावसाच्या पाण्यामुळे चोक झालेली गटर लाईन त्वरित दुरुस्त करावी, तुटलेल्या भिंतीला रेतीच्या बोऱ्यांनी बंद करुन भिंतीजवळ 15 फुटाचा बफर झोन तयार करुन, पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळी नाली तयार करावी, नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, आदी निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आयुक्तांच्या निर्देशानुसार, भांडेवाडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरज नगर परिसरात क्लोरीन टँबलेटचे वितरण करण्यात आले. तसेच परिसरात स्वच्छतेचे कार्य करण्यात आले.
 

4जी संतृप्ति परियोजना के तहत नागपुर जिले के 137 गांवों में बीएसएनएल 4जी सेवा उपलब्ध होगी मुख्य महाप्रबंधक यश पन्हेकर की जानकारी

नागपुर:- भारतीय संचार निगम लिमिटेड या बीएसएनएल, केंद्रीय संचार मंत्रालय के तहत एक सार्वजनिक उद्यम, ने हमेशा ग्राहक-केंद्रित दृष्टिकोण के साथ काम किया है, न कि केवल लाभ के लिए। 4जी संतृप्ति परियोजना के तहत, बीएसएनएल की 4जी सेवा अब नागपुर जिले के 137 गांवों में उपलब्ध है जहां कोई मोबाइल सेवा नहीं थी। बीएसएनएल नागपुर के मुख्य महाप्रबंधक यश पन्हेकर ने आज नागपुर में बताया कि 4जी सेवा नागपुर की मध्य प्रदेश सीमा पर पारशिवनी और रामटेक तालुका के दूरदराज के गांवों तक भी पहुंच गई है। इस अवसर पर उप महाप्रबंधक डी.पी. वासनिक, पीटी, गणवीर, एच. एम. टिपरे एवं मुख्य जनसंपर्क अधिकारी वी. वी पराठा उपस्थित थे। अन्य निजी ऑपरेटरों की तुलना में बीएसएनएल की कम दरें होने के कारण 3 जुलाई से नागपुर शहर में 3,500 मोबाइल सिम कार्ड बीएसएनएल में पोर्ट किए गए हैं। नागपुर जिले में अब तक दो लाख बीस हजार से अधिक बीएसएनएल मोबाइल 
सिम ग्राहक हैं. 21 हजार से ज्यादा लैंडलाइन फोन इस्तेमाल में हैं. वर्तमान में नागपुर जिले में ऑप्टिक फाइबर के माध्यम से फाइबर टू द होम-एफटीटीएच हाई स्पीड इंटरनेट के 23,000 ग्राहक हैं। मौजूदा कॉपर नेटवर्क को ऑप्टिक फाइबर नेटवर्क में बदलने का काम भी चल रहा है। यश पन्हेकर ने यह भी कहा कि नागपुर में रणनीतिक स्थानों पर स्थित बीएसएनएल की सीटें सरकारी और निजी संगठनों को देने से बीएसएनएल की वित्तीय आय बढ़ रही है। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि बीएसएनएल 2025 के अंत तक मौजूदा 4जी तकनीक को 5जी में बदलने के लिए प्रतिबद्ध है। 

देश में 4जी स्तर की मोबाइल सेवा हो, इस उद्देश्य से बीएसएनएल ने देश के 1 लाख गांवों में से 34 हजार गांवों में जहां सेवा नहीं थी, वहां बीएसएनएल के 4जी सिक्योरिटी प्रोजेक्ट के तहत बीटीएस टावर लगाकर 4जी सेवाएं उपलब्ध कराने का प्रोजेक्ट शुरू किया है। इनमें से, नागपुर ग्रामीण के 5 गांवों में 4जी सेवाएं शुरू की गई हैं, अर्थात् भिवापुर तालुका में गाडेघाट, घाटमोरी, कितादिमोखरबर्डी, कुही में सुभाष चौक, काटोल में खापा और कामठी में वारेगांव, जबकि शेष 111 गांवों में सरकारी जमीन का अधिग्रहण किया गया है। टावर के निर्माण की जानकारी पन्हेकर ने दी उन्होंने यह भी कहा कि नागपुर शहर में लीज पर ऐसे बीटीएस टावर का निर्माण शुरू किया जाएगा. उन्होंने कहा कि भविष्य में 'मशीन टू मशीन संचार' के लिए फिक्स्ड लैंडलाइन सेवा महत्वपूर्ण है और इसके माध्यम से सूचनाओं के आदान-प्रदान के लिए डेटा एक महत्वपूर्ण उपकरण है।

मनपाच्या संयुक्त चमूने वाचविले १०० नागरिकांचे प्राण विभागीय आयुक्तांनी केली परिस्थितीची पाहणी

नागपूर:-शहरात शनिवारी सकाळी झालेली मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले, शहरातील विविध भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेकजन पाण्यात अडकून पडले, अशा नागरिकांसाठी नागपूर महानगरपालिका, नागपूर पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त चमू देवदूतच ठरले. मनपाच्या संयुक्त चमूने विविध ठिकाणी पावसात अडकून पडलेल्या १०० नागरिकांचे प्राण वाचविले. यात शाळकरी मुले, गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शहरातील पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी मनपास्थित श्रदेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर येथे भेट देत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली.याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, अतिरिक्त 
आयुक्तद्वय श्रीमती आंचल गोयल व श्री. अजय चारठणकर प्रामुख्याने उपस्थित होते.  विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी मनपा आयुक्तांकडून शहरातील संपूर्ण परिस्थितीची माहिती जाणून घेतली.राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या घराचे पंचनामे करून, त्यांना तत्काळ मदत दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेऊन संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्देश निर्गमित केले आहे.शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचले, शहरातील विविध भागांमधल्या काही घरांमध्ये पाणी शिरले, काही ठिकाणी रस्त्यांवर झाड पडल्याने वाहतून विस्कळीत झाली, घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या चमूने त्वरित कार्यवाही करीत जनजीवन व वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले की, रविवार 21 रोजी देखील पावसासंबंधित अलर्ट प्राप्त झाला असून, नागरिकांनी सतर्कता बाळगत अनावश्यक घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी केले. तर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, ज्याठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे, अशा ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्यदेत स्वच्छता करण्यात येत असून, डासांची उत्पत्ती होऊ नये, म्हणून प्रभावित परिसरात मलेरिया-फायलेरीया विभागाद्वारे फोगिंग व जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. 
मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी. पी. चंदनखेडे यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे विविध भागात अडकून पडलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्यात मनपाच्या संयुक्त चमूला यश आले आहे. हुडकेश्वर येथील साईनगर स्थित अंटालिका महाविद्यालयात अडकलेल्या ५२ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच सेंट पाँल शाळेतील २६ विद्यार्थ्यांना व नरसाळा येथे पावसात अडकलेल्या १० नागरिकांना याशिवाय उमरेड रोड येथील विहीरगाव परिसरात अडकलेल्या २ गर्भवती महिलांना व इतर १० अशा एकूण १०० नागरिकांना सुखरूप पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. याशिवाय मनपाच्या कंट्रोल रूम मध्ये सकाळपासून अग्निशमन विभागाचे चमू नागरिकांच्या सेवेत तत्पर असल्याचे दिसून आले. घरात पावसाचे पाणी साचल्याची आणि रस्त्यांवर झाड पडण्याची विविध तक्रारी प्राप्त होताच तक्रारी संबधित झोन कार्यालय आणि अधिकाऱ्यांना पाठवूण्यात आली. 


यात एकूण ७१ ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याची आणि १८ ठिकाणी झाड पडल्याची तक्रारी प्राप्त झाल्या.पाणीसाचल्याची माहिती मिळताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे व संबधित झोनचे अधिकाऱ्यांनी तत्काळ मदत केली. घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या नेतृत्वात जवळपास २०० हून अधिक कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आले होते. याशिवाय उद्यान विभागाचे ५० हून अधिक कर्मचारी झोन निहाय सक्रीय होते. यात आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर, प्रधान डाकघर चौक, पोलीस कंट्रोल रूम, पाचपावली पोलीस ठाणे, रामगिरी रोड, धोबी नगर,  लष्करीबाग, मोमिनपुरा पोलीस चौकी, छापरु नगर आदी ठिकाणी झाड पडल्याची तक्रार प्राप्त होताच त्याचे त्वरित निराकरण करून मार्ग वाहतुकीस सुरळीत करण्यात आला. याशिवाय जलप्रदाय विभागामार्फत पाणी साचलेल्या भागांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय करण्यात आली, याकामासाठी विभागाकडून जवळपास ४० टँकरची मदत घेण्यात आली.

Friday, July 19, 2024

वी.एन.आई.टी. नगर आयुक्त ने किया सड़कों का निरीक्षण

नागपुर : उच्च न्यायालय के आदेशानुसार दुपहिया वाहन चालकों हेतु वी.एन.आई.टी. क्षेत्र से सड़क गुजरने से नागरिकों को बड़ी राहत मिली है। उत्तर अंबाझारी से दक्षिण अंबाझारी मार्ग नागरिकों के लिए सुबह 9.30 बजे से 11.00 बजे और शाम 5.00 बजे से 7.00 बजे तक खुला रखा गया है। नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डाॅ. अभिजीत चौधरी ने शुक्रवार (19 जुलाई) को इस सड़क का निरीक्षण किया.सड़क को एक तरफ से दोपहिया वाहनों और एंबुलेंस के लिए खोल दिया गया है. दक्षिण अंबाझारी मार्ग से यह मार्ग मोटर 
चालकों को उत्तरी अंबाझारी मार्ग पर यशवंत नगर टी-पॉइंट तक पहुंचने की अनुमति देता है। नगर पालिका द्वारा वीएनआईटी क्षेत्र की सुरक्षा दीवार को तोड़कर 70 मीटर लंबी सड़क का निर्माण किया गया है। यहां प्रवेश के लिए फुटपाथ पर रैंप तैयार किया गया है। साथ ही सड़क पर अतिरिक्त स्ट्रीट लाइटें भी लगाई गई हैं. आयुक्त ने सड़कों पर पानी जमा होने से रोकने के उपाय करने का निर्देश दिया. आयुक्त अभ्यंकर नगर चौक से एल.ए.डी. कॉलेज चौक तक सड़क का निरीक्षण किया और सड़क पर बने गड्ढों को तुरंत भरने का आदेश दिया.

नागपूर मनपाला ‘सिस्टमॅटिक प्रोग्रेसिव्ह ॲनालिटिकल रिअल टाइम रँकिंग”पुरस्कार प्रदान केंद्रीय मंत्री श्री. मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेला केंद्र सरकारचा “DAY-NULM  अंतर्गत उत्कृष्ट कार्य- द्वितीय पुरस्कारप्राप्त झाला असूननवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुक्रवारी (ता: १९) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना हा पुरस्कार सुपूर्द केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त यादीत महानगरपालिका दहा लाख लोकसंखेच्या मोठ्या महानगरपलिका गटात देशात द्वितीय स्थानी आहे.नवी दिल्ली येथील स्टीन ऑडिटोरियमइंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित 'उत्कृष्टता की और बढते कदमकार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री श्री. मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेला ‘सिस्टमॅटिक प्रोग्रेसिव्ह ॲनालिटिकल रिअल 
टाइम रँकिंग' (SPARK-2023-24) पुरस्काराने गौरविण्यात आले. मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे तसेच शहर व्यवस्थापक श्री. प्रमोद खोब्रागडेश्री. विनय त्रीकोलवारश्रीमती नूतन मोरेश्री. रितेश बांते यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे मा. सचिव श्री. अनुराग जैन दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका व पीएम स्वनिधीचे सहसचिव श्री.राहुल कपूर व केंद्रीय गृह निर्माण व शहरी राज्य मंत्री श्री. तोखन शाहूनगर परिषद प्रशासन संचनालयमुंबई संचालक श्री. मनोज रानडेनगर विकास विभागाचे उपसचिव श्रीमती सुशीला पवारसह आयुक्त श्री. शंकर गोरे उपस्थित होते. पं. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नागपूर शहरात वर्ष 2014 सुरू असूनसदर  योजनेत सामजिक अभिसरण व संस्थात्मक मध्ये एकूण 2510 बचत गट तयार करण्यात आले. यात एकूण 2008 बचत गटांना कर्ज उपलब्ध
करून दिलेतर 2235 लाभार्थ्यांना वैयक्तिक व्यवसायाकरिता बँक मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. 10987 लाभार्थ्यांना  प्रशिक्षण देण्यात आले. शहरात 250 क्षमता असलेले एकूण 5 शहरी बेघराना निवारा कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच शहरी पथविक्रेत्यांना अर्थसहाय्य अंतर्गत पथ विक्रेते करीता शासन निर्णय नुसार महाराष्ट्र सर्वप्रथम मतदान पद्धतीने पथविक्रेता समिती स्थापन करण्यात आली. तसेच पीएमस्वनिधी योजने अंतर्गत महानगरपालिकेला 48,113 उद्दिष्टे प्राप्त होतेया अनुषंगाने 59,330 (123टक्केलाभार्थ्यांना प्रथम कर्ज उपलब्ध करून दिलेतर 1110 लाभार्थ्यांना द्वितीय तर 2323 लाभार्थ्यांना तृतीय कर्ज बँक मार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर उपांग अभियान संनियंत्रण व मूल्यांकन प्रणाली (उपंग) मध्ये उत्कृष्ट कार्या विषयी रिअल टाइम रँकिंग नुसार भारततील DAY-NULM कार्यरत (million plus cities) मध्ये नागपूरने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.केंद्रीय ग्रहनिर्माण व शहरी मंत्रालयाच्या दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत 2023-24 वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या देशातील 33 महानगर पालिका व नगरपालिकामधून नागपूर महानगरपालिकेला “उत्कृष्ट कार्य- द्वितीय पुरस्कार” प्राप्त झाला आहे.नागपूर महानगरपालिकेला पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मनपाच्या दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत शहर व्यवस्थापक व समूह संघटक यांना चमूचे अभिनंदन केले आहे.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...