Monday, July 22, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 41 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई....

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (22) रोजी शोध पथकाने 41 प्रकरणांची नोंद करून 25200 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/ उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 500  रुपयांची वसुली करण्यात आली.  हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत प्रकरणांची नोंद करून 1600 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 900 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप,
कमान स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद 
करणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 10000 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आलीउपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 11 प्रकरणांची नोंद करून 2200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून 8000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत अनिल वराडे (बिल्डर्स) व मे. मायक्रोप्रो सॉफ्टवेअर प्रा. लि. यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 15,000/- चे दंड वसुल करण्यात आले. हनुमाननगर झोन मे. अर्थकॉन बिल्डर्स यांच्या कडून सुध्दा रू. 10,000/- दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत जयबजरंग स्वीट्स प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. आसमा बिल्डकॉन यांच्या कडून रू. 10,000/- दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...