Monday, July 22, 2024

शंकरनगर परिसराची पाहणी करीत मनपा आयुक्तांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

नागपूर ता २२: नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शंकरनगर परिसराची पाहणी करीत स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी आमदार श्री. विकास ठाकरे व भागातील नागरिक उपस्थित होते.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी धरमपेठ झोनच्या अधिकार्‍यांसोबत इंदिरा गांधी रुग्णालय ते शंकरनगर दरम्याच्या बाभुळकर मार्गाचा दौरा केला आणि नाग नदीच्या काठावर असलेले झोपडे तत्काळ हटविणायचे निर्देश दिले. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत 
चौधरी यांनी इंदिरा गांधी रुग्णालय ते शंकरनगर दरम्यानची पाहणी केली. यावेळी आयुक्त श्री. चौधरी यांनी नाग नदीच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या झोपडे हटविण्याचे निर्देश दिले. याशिवाय तुटलेली सीवर लाइन तात्काळ  दुरुस्त करून पुलाची दुरूस्ती करावीरस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या कापाव्यात आदी निर्देशित केले.याप्रसंगी मनपाचे अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारकार्यकारी अभियंता श्री. विजय गुरुबक्षानीकनिष्ठ अभियंता श्री. मनोहर राठोड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...