Thursday, February 27, 2025

मनपाच्या दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन 610 दिव्यांग खेळाडूंचा सहभाग

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून व त्यांच्या प्रतिभेला वाव मिळण्यासाठी दिव्यांग व्यक्तींकरिता पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे गुरुवारी (ता.27) दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून दक्षिण नागपूरचे आमदार श्री. मोहन मतेमनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरीअतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलउपायुक्त श्रीमती डॉ. रंजना लाडेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरपरिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधवक्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकरहनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त श्री नरेंद्र बावनकरजिल्हापरिषदेचे समाज कल्याण 
अधिकारी किशोर भोयरसमग्र शिक्षण विभगाचे जिल्हा समन्वयक अभिजित राऊतक्रीडा तज्ज्ञ श्री. उमेश वाझुरकरअर्जून व द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित श्री विजय मुनिश्वरश्री संजय लुंगेश्री चंद्रशेखर पाचोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. त्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे ध्वजारोहण झाले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांकडून पथसंचलन व सलामी देण्यात आली. यावेळी मातृसेवा संघाच्या स्नेहांगण शाळातर्फे स्वागत गीत सादर करण्यात आले.

आमदार श्री मोहन मते यांनी मनपातर्फे दिव्यांग क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल महानगरपालिकेचे कौतुक केले. ते म्हणाले कीमनपातर्फे विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. परंतु मनपातर्फे पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने दिव्यांगाकरिता क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मनपाने पुढे मतीमंद मुलांकरिताही अशा क्रीडा स्पर्धाचे आयोजन करावेयामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अशा स्पर्धांकरीता  आमदार निधी मधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अनेक दिव्यांगांनी पॅरालिम्पिक मध्ये पदक जिंकले आहेत. दिव्यांग क्रीडा स्पर्धेमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना पॅरालिंपिक स्पर्धेत भाग घेण्याची प्रेरणा मिळेल असेही आमदार श्री. मते म्हणाले. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सुद्धा मुलांना शुभेच्छा दिल्यात. महानगरपालिकातर्फे खेळाडूंसाठी दरवर्षी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींकरीता स्पर्धा आयोजित करण्याचे मनपाने ठरविले. ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये टॅलेन्ट आणि स्पार्क आहेत्यांना समोर जाण्याकरिता अशा क्रीडा स्पर्धा महत्वपूर्ण ठरणार आहेत. नागपूर शहरातील 1210 शाळांमधील 22 क्रीडा प्रकारात 610 दिव्यांग खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेत सहभाग नोंदविणे ही कोणतीही स्पर्धा जिंकण्या इतकेच महत्वाचे आहे. स्पर्धेत सहभागी असणारे सर्वच विजेते आहात. जिंकण्याबरोबर 
खेळाडू वृत्तीने या स्पर्धेत भाग घेण्यात यावे असेही ते म्हणाले. शिक्षक आणि पालकांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतल्याने त्यांचे अभिनंदनही आयुक्त यांनी केले.अशाप्रकारच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील स्पार्क आणि टॅलेन्ट बाहेर येऊ शकते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येईल असेही ते म्हणाले. दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे अभिप्राय सुद्धा पालकांनी नोंदवावे असे आवाहन आयुक्त यांनी यावेळी केले. दरवर्षी अशा दिव्यांग क्रीडा स्पर्धा आयोजित केले जातील असेही त्यांनी सांगितले. पॅरालिम्पिक मध्ये भारताचा चढता आलेख आहे. ज्या खेळाडूंमध्ये चमक (स्पार्क) आणि प्रतिभा आहे. ज्यांना वेगवेगळ्या खेळामध्ये पुढे जायचेराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळायचे आहेत्यांच्याकरीता अशा क्रीडा स्पर्धामुळे व्यासपीठ मिळेल. पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये असलेले चमक(स्पार्क) आणि प्रतिभेला मदत करावे असेही ते म्हणाले. दिव्यांग
खेळाडूकरीता शिष्यवृत्ती योजना सुद्धा सुरु आहे. इतर योजना सुद्धा सुरु आहेत अशी माहिती  डॉ. चौधरी यांनी दिली. नागपूर महानगरपालिकेद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात दोन दिवसीय ‘दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी क्रीडा ज्योत प्रज्वल्लाने स्पर्धेची सुरुवात झाली. यानंतर खेळाडूंना शपथ श्री. संजय लुंगे यांनी दिली. यावेळी तिरंगा रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले. संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले. तर आभार क्रीडा अधिकारी श्री पियुष आंबुलकर यांनी मानले.



# 610 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग:- दोन दिवसीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत 22 क्रीडा प्रकारात शहरी भागातील सर्वसामान्य शाळांमधील तसेच विशेष शाळेतील अशा एकूण 1210 शाळांमधील 610 दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये प्रथमत: प्रकारच्या क्रीडा प्रकारात सहभागी होऊन आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे.  गुरुवारी बौद्धिक दिव्यांगकर्णबधिर दिव्यांग अस्थिव्यंग दिव्यांग अंध व अल्पदृष्टी दिव्यांग व्यक्तीच्या विविध क्रीडा स्पर्धेत अॅथलेटीक्स
 , दौड (रनिंग)शॉर्ट जम्पलाँग जम्प , सॉफ्टबॉल थ्रोलांब उडी,  जलतरणसायकलिंगरस्सीखेचक्रिकेटगोळाफेककॅरम,  फ्री स्टाईलसिटींग व्हॉलीबॉलव्हिल चेअर रनिंगबुद्धीबळपासिंग द बॉलस्पॉट जम्प यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शुक्रवारी विविध दिव्यांग क्रीडा स्पर्धांसह स्पर्धेचा समारोप  होणार आहे.

मनपातर्फे राबविण्यात आलेल्या नदी जनजागृती अभियानाला नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद

नागपूर:-नागरीकांमध्ये नद्यांविषयी जनजागृती वाढावी याकरिता गुरुवारी (ता.२७) रोजी नागपूर महानगरपालिकातर्फे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत योगाभ्यास विविध सांस्कृतिक कार्यक्रम व यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. या अभियानाला उत्फुर्त प्रतिसाद देत गांधीसागर तलावाजवळ नागरिकांनी सूर्यनमस्कार सह विविध योग प्रात्यक्षिके सादर केले.जलशक्ती मंत्रालय जल संसाधन नदी विकास व गंगा संरक्षण विभागभारत सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय कार्यक्रमाअंतर्गत नद्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिने हे अभियान राबविण्यात आले. नागपूर महानगरपालिका तर्फे 
नद्यांबाबत जनजागृती कार्यक्रमांतर्गत नागरीकांमध्ये नदीबाबत जनजागृती वाढविण्याकरिता पुढाकार घेण्यात आला. या अभियानाला उत्फुर्त प्रतिसाद देत गांधीसागर तलावाजवळ नागरिकांनी सूर्यनमस्कार सह विविध योग प्रात्यक्षिके सादर केले. या कार्यक्रमाद्वारे शहरात असणाऱ्या नद्यांचे महत्व व निसर्ग जपण्याचा संदेश देण्यात आला. मनपा उद्यान विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांनी चित्र काढून अभियानाला प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाने निसर्ग संवर्धन व जबाबदारी आणि एकतेची जाणीव वाढवली. यामुळे शाश्वत संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे एक अर्थपूर्ण पाऊल उचलले गेले. कार्यक्रमात नदी संवर्धन व पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांमध्ये समुदायाच्या सहभागाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यात आली.

सार्वजनिक स्थानों पर गंदगी फैलाना 74 केस रिकॉर्ड उपद्रव टीम ने कार्रवाई की

नागपुर :- नागपुर नगर निगम की उपद्रव निरोधक टीम ने एक सार्वजनिक नोटिस जारी किया है। जो लोग जगह-जगह पेशाब करते हैं , जो लोग कूड़ा फेंकते हैं , जो लोग थूकते हैं , 79 माइक्रोन से कम मोटाई वाले प्लास्टिक बैग का उपयोग करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई शुरू की गई है।  खोज टीम द्वारा 74 मामले दर्ज करके  45,900 /- 10,000 रुपये का जुर्माना वसूला गया। हाथगाड़ियां , स्टॉल , पंथेले , फेरीवाले , छोटे सब्जी विक्रेताओं ने आस-पास के क्षेत्र में अस्वच्छ स्थिति पैदा कर दी है (रु. 400/- (जुर्माना) इसके तहत 29 मामले दर्ज करके 11 , 600 / - राशि वसूल कर ली गई। कोई व्यक्ति सड़कों, फुटपाथों, खुले स्थानों आदि पर कचरा फेंक सकता है। 1 00/- (जुर्माना) इसके तहत 1 मामला दर्ज करके 1 00 /- राशि वसूल कर ली गई। दुकानदारों को सड़कों, फुटपाथों, खुले स्थानों पर कूड़ा फेंकने पर रोक लगा दी गई है। 4 00/- (जुर्माना) इसके तहत 3 मामले दर्ज करके 1,200 / - राशि वसूल कर ली गई। मॉल , रेस्तरां , आवास , बोर्डिंग होटल , सिनेमाघर , लोकपाल कार्यालय , कैटरर्स सर्विस प्रोवाइडर्स आदि ने रोड के तहत 3 मामले दर्ज किए हैं और 6,000 / - रुपये वसूल किए हैं। राशि वसूल कर ली गई। मॉल , रेस्तरां , आवास , बोर्डिंग होटल , सिनेमाघर , लोकपाल कार्यालय , कैटरर्स सर्विस प्रोवाइडर आदि ने रोड के अंतर्गत 3 मामले दर्ज किए और 6,000 /- 
रुपये वसूले राशि वसूल कर ली गई। यातायात सड़क मंडप , आर्क , इसमें मंच आदि स्थापित करना या व्यक्तिगत कार्य के लिए उसे बंद करना शामिल है 3 मामले दर्ज करके 6,500 / - राशि वसूल कर ली गई। सार्वजनिक स्थानों जैसे सड़क, फुटपाथ, खुले स्थान आदि पर जानवरों को बांधना। 8 मामले दर्ज करके 5,500 / - राशि वसूल कर ली गई। कार्यशालाओं, गैराजों और अन्य मरम्मत पेशेवरों द्वारा सड़कों, फुटपाथों और खुले स्थानों पर कचरा फेंकने के संबंध में दो मामले दर्ज किए गए हैं। 2,000 रुपये बरामद किये गये  यदि उपरोक्त सूची में शामिल न होने वाले अन्य उपद्रवी व्यक्ति हों 1 5 मामले दर्ज करके 3, 000 /- जुर्माना वसूल कर लिया गया है। यदि उपरोक्त सूची में अन्य उपद्रवी संस्थाएं नहीं पाई जाती हैं 10 मामले दर्ज करके 10,000 /- जुर्माना वसूल कर लिया गया है। यह ऑपरेशन उपद्रव जांच दल प्रमुख वीरसेन तांबे के नेतृत्व में किया गया। इसके अलावा, उपद्रव का पता लगाने वाली टीम धरमपेठ जोन आंतरिक मई. बिना अनुमति के बिजली के खंभों पर विज्ञापन बैनर लगाने के लिए मेरिडियन हाइट्स पर 100,000 रुपये का जुर्माना लगाया गया है। 5,000/- रुपये का जुर्माना वसूला गया। मई माह में गांधी बाग क्षेत्र के अंतर्गत मामला दर्ज किया गया। डेयरी उद्योग द्वारा प्लास्टिक बैगों के उपयोग के लिए भगवान 5,000/- एक हजार रुपये का जुर्माना वसूला गया। मई में सतरंजीपुरा क्षेत्र के अंतर्गत। वासनिक किराना स्टोर्स पर प्लास्टिक बैग का उपयोग करने का आरोप  5,000/- एक हजार रुपये का जुर्माना वसूला गया। उपद्रव का पता लगाने वाली टीम द्वारा 03 मामले दर्ज कर रु. 15,000 /- जुर्माना वसूला गया।

Tuesday, February 18, 2025

गंजीपेठ येथे बनणार नवीन अत्याधुनिक अग्निशमन केंद्र मनपा आयुक्तांनी दिली अग्निशमन केंद्राला भेट

नागपूर:- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी मंगळवारी (ता१८) गंजीपेठ अग्निशमन केंद्राची पाहणी केली. गंजीपेठ अग्निशमन केंद्राची इमारत जीर्ण झालेली असून त्या जागेवर नवीन अत्याधुनिक अग्निशमन केंद्राचे बांधकाम प्रस्तावित आहे.अग्निशमन केंद्राच्या पाहणी प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीअजय चारठाणकरउपायुक्त सर्वश्री अशोक गराटेश्री. गणेश राठोडअधीक्षक अभियंता श्रीमनोज तालेवारमुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बीपीचंदनखेडे उपस्थित होते.प्रस्तावित नवीन अग्निशमन केंद्राची इमारत ही तळमजला अधिक एक माळ्याची असणार आहे. या केंद्रावर ४ अग्निशमन वाहनांची व्यवस्था 
असेल. गंजीपेठ अग्निशमन केंद्राची निर्मिती १९२७ मध्ये करण्यात आली होती. सध्या ही इमारत जीर्ण झालेली आहे. नवीन अत्याधुनिक अग्निशमन केंद्रामध्ये अद्ययावत कार्यालय देखील असणार आहे. गंजीपेठ अग्निशमन केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. या अग्निशमन केंद्रामधून महालगांधीबाग आणि मोमीनपुरा सारख्या दाट 



रहिवासी क्षेत्राला सुरक्षा पुरविली जाते.मनपा आयुक्तांनी गंजीपेठ अग्निशमन केंद्राच्या पूर्ण इमारतीची पाहणी केली. त्यांनी कर्मचाऱ्यांचे निवास स्थानाला देखील भेट देउन पाहणी केली. गंजीपेठ येथील अग्निशमन केंद्र नागपूरमधील पहिले अग्निशमन केंद्र असून ही इमारत ९८ वर्ष जुनी आहे. सध्या इथे ३ अग्निशमन वाहन ठेवण्याची व्यवस्था आहे. इंग्रजांच्या काळात १७०० वर्ग मीटर क्षेत्रामध्ये या केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. या जागेवर नवीन अत्याधुनिक अग्निशमन केंद्राकरिता लवकरात लवकर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले. यावेळी सहायक आयुक्त श्रीघनशाम पंधरेकार्यकारी अभियंता श्रीसचिन रक्षमवारश्रीतुषार बारहातेअग्निशमन केंद्र अधिकारी श्रीसय्यद शौकत अली. श्री अजय लोखंडेश्री सुधाकर गवई आदी उपस्थित होते.

उष्माघातापासून नागरिकांना मिळणार दिलासा बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

नागपूर :- वाढता उष्मा आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी उन्हाळ्यात उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळावा याकरिता विविध उपायायोजना केल्या जातात. या नियोजनासंदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मंगळवारी (ता. १८) उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली.अतिरिक्त आयुक्तांच्या सभाकक्षात आयोजित बैठकीत उपायुक्त श्री. विजय देशमुखवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरमुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्लेकार्यकारी अभियंता (प्रकल्प) श्रीमती अल्पना पाटनेसहायक शिक्षणाधिकारी श्री. संजय दिघोरेनोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते. नागपूर महानगरपालिकेतर्फे उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची शहरात दरवर्षी अंमलबजावणी केली जाते. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांना सादरीकरणाद्वारे नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी बस डेपोपेट्रोल पंपबाजारपेठवर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात 
यावी याकरिता टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा तसेच मार्केट असोसिएशनशी चर्चा करून बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी जागा निश्चित करावी असेही निर्देश त्यांनी दिले. शहरातील सर्व उद्याने दुपारी १२ ते ४ वाजतापर्यंत सुरु ठेवावेतटँकरच्या माध्यमातून रस्त्यावर पाण्याची फवारणी करावीमहत्वाच्या चौकात ग्रीन नेट लावण्यात यावीविविध बांधकाम ठिकाणी कामगारांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी याकरिता कंत्राटदारांना संपर्क साधावारस्त्यावरील प्राण्यांकरिता आणि पक्षांकरिता महानगरपालिकेच्या विविध इमारतीशाळा या ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावेउद्यानांमध्येही पक्ष्यांकरिता पाणी उपलब्ध होईल अशी सुविधा तयार करावी तसेच रस्त्यावरील प्राण्यांकरिता शेल्टर होम तयार करण्यात यावेत्यात योग्य वेटिंलेशनची दक्षता घ्यावीआवश्यकता पडल्यास सामाजिक संघटनांची मदत घ्यावी असेही निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी यावेळी दिले. मनपाच्या विविध इमारतींमध्ये मिस्टिंग कूलिंग लावण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी सूचना केली. यावेळी समाज विकास विभागाचे प्रमोद खोब्रागडेउद्यान विभागाचे संजय गुजरजलप्रदाय विभागाचे प्रकाश यमदेनरेंद्र भांडारकरआपत्ती व्यवस्थापन विभागाचे (अग्निशमन) सतीश रहाटेस्लम विभागाचे एस. एस. चोमाटे उपस्थित होते.

जय छत्रपति शिवाजी महाराज , जय भारत पदयात्रा बुधवार को राजे रघुजी भोसले महाराज स्मारक से

नागपुर :-19 फरवरी को छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर केंद्र सरकार के निर्देशानुसार नागपुर महानगरपालिका द्वारा ' जय छत्रपति शिवाजी महाराज , जय भारत पदयात्रा ' का आयोजन किया जाएगा। नागपुर शहर में राजे रघुजी भोसले स्मारक स्थल से गांधी गेट तक पैदल मार्च निकाला जाएगा। पदयात्रा की तैयारी के लिए नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी ने पदयात्रा के पूरे मार्ग का निरीक्षण किया। इस अवसर पर उपायुक्त श्री. विजय देशमुख गणेश राठोड , परिवहन प्रबंधक श्री. विनोद जाधव , सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर , विकास रायबोले , मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. दीपक सेलोकर , मुख्य स्वच्छता 
अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले , खेल अधिकारी डॉ. पीयूष अम्बुलकर , जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व अन्य उपस्थित थे। यह पदयात्रा बुधवार, 19 फरवरी को प्रातः 7 बजे सक्करदरा चौक स्थित राजे रघुजी भोसले स्मारक स्थल से शुरू होगी। 


जय छत्रपति शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा सक्करदरा चौक स्थित राजे रघुजी भोसले स्मारक स्थल से शुरू होगी। इसके बाद गजानन चौक, ओल्ड फ्राइडे , केशव द्वार चौक , रेशमबाग चौक , सी.पी. जुलूस बरार चौक और कोतवाली चौक होते हुए गांधी गेट चौक पहुंचेगा। पदयात्रा का समापन गांधी गेट चौक पर हिंदवी स्वराज्य के संस्थापक , प्रसिद्ध राजा और धनी योगी छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर श्रद्धांजलि अर्पित करने के साथ होगा। 

इस वॉक में भाग लेने वालों को ई-प्रमाणपत्र प्रदान किया जाएगा। नागपुर महानगरपालिका ने अधिक से अधिक नागरिकों से इस पदयात्रा में भाग लेने तथा वेबसाइट https://mybharat.gov.in पर आवश्यक जानकारी प्रदान कर अपना ई-प्रमाणपत्र डाउनलोड करने की अपील की है। 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 48 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (18) रोजी शोध पथकाने 48 प्रकरणांची नोंद करून 26000/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत  05  प्रकरणांची नोंद करून 2000/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 100/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृह
लाँजिग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर्स चा नुकसान केले या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 11500/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 22 प्रकरणांची नोंद



करून 4400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 6000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत सिमफनी अपार्टमेंट व मलाबार गोल्ड यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी असे एकुण रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत ऐड्यु. क्राफ्ट कोचींग क्लासेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत साईनाथ किराणा स्टोर्स व साक्षी स्विट्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल असे एकुण 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच मे. मंगळवारी झोन अंतर्गत गुरबानी पेथेलॉजी लॅब आणी कॅरीयर पॉइंट यांनी  विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी असे एकुण रु. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला.

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...