नागपूर:- महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या
प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्रांवर लाभार्थी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत
आहे. मनपाच्या दहाही झोनमधील प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र आणि आंगणवाडी
केंद्रांवर आतापर्यंत ७६०३२ अर्ज जमा झाले आहेत. पात्र महिलांनी विहित मुदतीपूर्वी
आपले अर्ज भरण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले
आहे.मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेद्वारे २.५ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या
परिवारातील महिलांना प्रतिमाह १५०० रुपये आर्थिक सहकार्य मिळणार आहे. या योजनेचा
शहरातील जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व
झोन कार्यालयांमध्ये तसेच प्रत्येक प्रभागामध्ये अर्ज स्वीकृती केंद्र सुरू
करण्यात आले आहेत. अर्ज स्वीकारताना महिलांना कागदपत्रांची योग्य माहिती देणे तसेच
त्यांच्या शंकांचे निराकरण करण्याचे देखील काम या केंद्रांवरून केले जाते. मनपाचे
झोन कार्यालय तसेच प्रत्येक झोनमधील प्रभागात अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. याशिवाय
आंगणवाडी केंद्रांमध्ये देखील अर्ज स्वीकारले जात आहेत. या व्यतिरिक्त लाभार्थी
महिलांना स्वत: ‘नारी शक्ती दूत’ या
मोबाईल ॲप वरूनही अर्ज करता येतो. ॲपमध्ये नाव, पत्ता, यासोबतच इतर माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर
अर्ज स्वीकारला जातो, अशी माहिती समाजविकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे
यांनी दिली.नागपूर शहरातील प्रत्येक पात्र महिलेला मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण
योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी तसेच अतिरिक्त आयुक्त
श्रीमती आंचल गोयल यांनी झोनचे सहायक आयुक्तांशी बैठक घेतली आहे. याशिवाय त्यांनी
स्वत: अर्ज स्वीकृती केंद्रांना भेट देउन प्रक्रियेची पाहणी देखील केली आहे.
जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या अर्ज स्वीकृती
केंद्रात आवश्यक कागदपत्रांसह भेट देण्याचे आवाहन मनपा आयुक्त डॉ. अभिजीत
चौधरी यांनी केले आहे.मनपाच्या दहाही झोनमध्ये आतापर्यंत एकूण ३३०३७ अर्ज जमा झाले
आहेत. यामध्ये १३१५४ अर्ज ऑफलाईन तर १९८८३ अर्ज आनलाईन जमा करण्यात आले. तसेच
विधानसभा निहाय आंगणवाडी केंद्रांवर अर्ज १२१०२ ऑफलाईन तर ३०८९३ अर्ज ऑनलाईन असे
एकूण ४२९९५ अर्ज जमा झाले आहेत. झोनमधील केंद्र आणि आंगणवाडी असे दोन्ही मिळुन
७६०३२ अर्ज जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी दिली.
Friday, July 26, 2024
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीला गतीआतापर्यंत बुजविले ९६८ खड्डे*
नागपूर:- पावसामुळे नागपूर
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार हॉट मिक्स प्लाँट
विभागाद्वारे खड्डे बुजविण्याच्या कामाला गती आलेली आहे. मागच्या दहा दिवसात
मनपाच्या दहाही झोनमध्ये यंत्रेणेने ९६८ खड्डे (५६०२ चौ.मी.) बजुविले आहे. या
कामात इंस्टा व जेट पॅचरचा सुध्दा वापर करण्यात आला
आहे.मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार हॉट मिक्स प्लाँट विभागाद्वारे रस्त्यावरील
खड्डे बुजविण्यासाठी विशेष चमू देखील गठीत करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवरील
खड्डे बुजविण्याच्या कामात सुसूत्रता यावी व वेळेत खड्डे बुजविले जावेत याकरिता
प्रत्येक झोन स्तरावर समन्वयक नेमून त्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. यासाठी
साप्ताहिक वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून पाच पाच झोनमध्ये खड्डे बुजविण्याची
कार्यवाही सुरू आहे. २३ ते २५ जुलै २०२४ या कालावधीमध्ये मंगळवारी, धंतोली, गांधीबाग, आशीनगर
आणि लकडगंज या पाच झोनमधील खड्डे बुजविण्यात आले. तर २६, २७
आणि २९ जुलै २०२४ या कालावधीत धरमपेठ, सतरंजीपुरा, नेहरूनगर, लक्ष्मीनगर आणि हनुमान नगर झोनमधील खड्डे बुजविण्याबाबत
कार्य सुरू झाले आहेत. सुरळीतपणे खड्डे बुजविण्याबाबत कार्यवाही व्हावी याकरिता
प्रत्येक झोनमध्ये उपअभियंता यांना समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नागपूर
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पावसामुळे आणि जड वाहतुकीमुळे मोठे खड्डे तयार झाले
आहेत. दहाही झोन अंतर्गत वस्त्यांमधील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यासाठी हॉट मिक्स
प्लॉंट विभागाद्वाने मोहिम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण ९६८
खड्डे बुजविण्यात आले आहेत. ही माहिती कार्यकारी अभियंता श्री. अजय डहाके यांनी
दिली.
कारगिल विजय दिनी “अमर जवान” स्मारकाची स्वच्छता
नागपूर: भारतीय सैन्याच्या असीम शौर्याची आठवण जागृत ठेवणाऱ्या कारगिल विजय दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या चमुद्वारे अमर जवान शहीद स्मारकाची व थोर हुतात्मा यांच्या पुतळयाला स्वच्छता करून समस्त हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासह शहराच्या सौंदर्य करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका विशेष कार्य करीत आहे. 25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्यावतीने अमर जवान शहीद स्मारकासह शहरातील विविध ठिकाणी
असणाऱ्या
स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांची देखील स्वच्छता करण्यात आली.मनपा आयुक्त तथा
प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल
गोयल यांच्या नेतृत्वात आणि दहाही झोनचे सहायक आयुक्त यांच्या देखरेखीत शहरातील
दहाही झोन मध्ये असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांस्थानी श्रमदान करण्यात
आले. स्वच्छतेदरम्यान नागरिकांनी देखील श्रमदान करीत उपक्रमाला उत्स्फूर्त
प्रतिसाद दिला.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 39 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर:- नागपूर
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर
करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (26) रोजी शोध पथकाने 39
प्रकरणांची नोंद करून 48100 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात
अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद
करून 5600 रुपयांची वसुली
करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4
प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1
प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत
1 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद
करणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 5500 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा
ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली
करण्यात आली. वैद्यकिय व्यवसायिकांना बायोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे
या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 25000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर
उपद्रव व्यक्ती असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 1200 दंड वसूल करण्यात
आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद
करून 6000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक
प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने
मंगळवारी झोन अंतर्गत मे. कुणाल हॉस्पीटल यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन
केल्याबददल रू. 25,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 1 प्रकरणांची
नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला.
Tuesday, July 23, 2024
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मनपाची यंत्रणा सुसज्ज ठेवा *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश
नागपूर:- महिलांच्या
आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा ‘मुख्यमंत्री – माझी
लाडकी बहीण’ योजनेची
माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचावी व या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला
मिळावा याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनची संपूर्ण यंत्रणा सुसज्ज
ठेवावी, शासन-प्रशासनाद्वारे
प्राप्त निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक
डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.‘मुख्यमंत्री– माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात मंगळवारी (ता:२३)
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात
आली. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती
आंचल गोयल, उपायुक्त
डॉ. रंजना लाडे, उपायुक्त
तथा सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, मिलिंद मेश्राम, नरेंद्र
बावनकर, घनशाम
पंधरे. गणेश राठोड, हरीश राऊत, प्रमोद वानखेडे, अशोक
घरोटे, विजय
थूल, वैद्यकीय
आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, साथरोग
अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, बालविकास
प्रकल्प अधिकारी सर्वश्री. दामोधर कुंभरे, नितीन मोहुर्ले, श्रीमती
भारती मानकर, अपर्णा
कोल्हे, राष्ट्रीय
नागरी उपजीविका अभियान शहर व्यवस्थापक श्री. प्रमोद खोब्रागडे, श्रीमती
नूतन मोरे, अंगणवाडी
पर्यवेक्षक(शहर) मनपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रतिनिधी प्रामुख्याने
उपस्थित होते. बैठकीत
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ‘मुख्यमंत्री – माझी
लाडकी बहीण’ योजनेसाठी
मनपाच्या दहाही झोन निहाय आणि प्रभाग निहाय यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशित
केले. सर्व सहायक आयुक्तांनी मनपाच्या दहाही झोन केंद्र, प्रभाग
निहाय केंद्रांवर ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याच्या व्यवस्थेचे योग्य नियोजन
करावे, सर्व
केंद्रावर ऑफलाईन प्राप्त होत असलेल्या अर्जांना ऑनलाईन करण्यासाठी लागणारे पुरेसे
व अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे, प्राप्त अर्जाची योग्य छाननी करण्यासाठी छाननी समिती, मान्यता
समिती स्थापन करून शासन-प्रशासनाद्वारे प्राप्त निर्देशांचे काटेकोरपणे पालन
करावे, अपात्र
अर्जांच्या हरकती मागविण्यासाठी ३ दिवसांकरिता यादी झोन स्तरावर ऑनलाईन स्वरुपात
प्रसिद्ध करण्यात यावी, योजनेचा व्यापक प्रचार - प्रसार व प्रत्यक्ष लाभ
याविषयीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अर्ज ऑनलाईन स्वरुपात भरण्यासाठी
प्रासंगिक आशा सेविकांची मदत घावी असे देखील आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी
यांनी सूचित केले.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 36 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या
उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर
करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मगंळवार (23) रोजी शोध पथकाने 36 प्रकरणांची नोंद करून 29400 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता
फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/ उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे (रु. 500/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची
वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता
(रु. 400/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात
आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 100 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200
रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा
हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या
अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4000 रुपयांची वसुली करण्यात
आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान स्टेज इत्यादी
रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून
16000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे
इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 2600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे
इतर उपद्रव संस्था असल्यास 3 प्रकरणांची नोंद करून 3000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध
पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. ओम ऑटो स्टेशन यांच्या
विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 5,000/- चे
दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन मे. राधे संदेश बिल्डर्स यांच्या कडून सुध्दा
रू. 10,000/- दंड वसूल करण्यात आले. हनुमान नगर
झोन अंतर्गत मे. करण बिल्डर्स व मे. ओरीयंट ग्रुप यांच्या रू. 15,000/- दंड वसूल करण्यात आले. धंतोली झोन
अंतर्गत मे. गिरडे कंट्रक्शन यांच्या कडून यांच्या रू. 10,000/- दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा
झोन अंतर्गत मे. सुपर सोनपापडी यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.
5,000/- हजार
रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 45,000/- दंड वसूल केला.
लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन
नागपूर:- “स्वराज्य हा माझा
जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्यलढयाचे थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतीय स्वातंत्र्यलढयातील थोर
क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र
अभिवादन केले.याप्रसंगी अति. आयुक्त आंचल गोयल, जनसंपर्क
अधिकरी मनिष सोनी, अमोल तपासे, राजेश गजभिये, गजानन जाधव, राजेश लोहितकर, विनोद डोंगरे, प्रकाश खानझोडे, संजय भिसे, किर्ती खापेकर, संगिता गायकवाड, किरण उराडे उपस्थित होते.
गुरु पूर्णिमा कार्यक्रम संपन्न लायंस क्लब नागपुर आयुर्वेद द्वारा श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर कोराडी में
नागपूर:- दिनांक
21 जुलाई
2024 को
शाम 5:30 बजे
गुरुपूर्णिमा के पर्व पर श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी मंदिर के हाल में, लायंस क्लब नागपुर आयुर्वेद द्वारा
गुरु पूर्णिमा का पर्व मनाया गया। इस कार्यक्रम मे लायंस क्लब नागपुर आयुर्वेद की
अध्यक्ष डॉ.मृणालिनी थटेरे ने सभी का स्वागत किया तथा इस गुरु पूर्णिमा कार्यक्रम
की संकल्पना एवं पार्श्वभूमी के बारे में विस्तृत जानकारी दी। गुरु पूर्णिमा के
अवसर पर श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी मंदिर के पुजारीयो का सत्कार किया गया। इनमे श्री केशव महाराज,
श्री अशोक महाराज, श्री राजु महाराज, श्री गुप्ताजी, श्री बाबूलाल परिहार, श्री शोभेलालजी तथा श्री दिलीप
बांगरे का सत्कार किया गया साथ ही
आयुर्वेद के गुरु डॉ. वेद प्रकाश शर्मा, डॉ. गिरजा शंकर ज्योतिषी इनका गुरु पूर्णिमा के पर्व पर लायंस क्लब नागपुर
आयुर्वेद के द्वारा सत्कार किया गया। लायंस क्लब नागपुर आयुर्वेद के सीनियर सदस्य
डॉ.किरण तिवारी, डॉ.सुरेश
खानोरकर, डॉ.मंगेश
भलमे, डॉ.
संजय थटेरे का सत्कार किया गया। लायंस क्लब नागपुर आयुर्वेद द्वारा क्लब के
सदस्यों के माता-पिता का भी इस अवसर पर सत्कार किया गया। इनमे श्रीमती मालिनी
शिवनकर, श्रीमती
ममता नवलकर, श्री
दशरू मरकाम, श्रीमती
कांतीबाई मरकाम, डॉ.
रमेश बारस्कर आदि का सत्कार किया गया। इस अवसर पर आचार्य डॉ. वेद प्रकाश शर्मा, डॉ.श्रीराम ज्योतिष सर ने गुरु
पूर्णिमा पर्व पर अपने विचार व्यक्त किए। कार्यक्रम के प्रमुख अतिथि के पास्ट डिस्ट्रिक्ट
गवर्नर एम.जे.एफ.राजेंद्र मिश्रा,
रीजन
चेयरपर्सन एम.जे.एफ.डॉ.पार्वती
राणे,ज़ोन चेयरपर्सन एम.जे.एफ.धनंजय ठोंबरे ने गुरु पूर्णिमा पर्व पर अपने विचार
व्यक्त किए। कार्यक्रम का मंच संचालन डॉ.संजय थटेरे ने किया। कार्यक्रम का आभार
प्रदर्शन सचिव डॉ.प्रशांत गनोरकर ने किया। इस अवसर पर लायंस क्लब नागपुर आयुर्वेद
की ओर श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी के परिसरमे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न हुआ एवं मंदिर की महिला
कर्मचारियों को साड़ियों का वितरण किया गया। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में लायंस
क्लब नागपुर आयुर्वेद के सदस्य,
पदाधिकारी
उपस्थित थे। इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए लायंस क्लब नागपुर आयुर्वेद के सभी
पदाधिकारी का सहयोग
रहा। उपरोक्त
जानकारी गुरु पूर्णिमा कार्यक्रम के प्रकल्प अधिकारी डॉ.संजय थटेरे ने पत्रकारों
को दी।
Monday, July 22, 2024
शंकरनगर परिसराची पाहणी करीत मनपा आयुक्तांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
नागपूर ता २२: नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा
प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शंकरनगर परिसराची पाहणी करीत स्थानिक नागरिकांच्या
समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी आमदार श्री. विकास ठाकरे व भागातील नागरिक
उपस्थित होते.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी धरमपेठ झोनच्या
अधिकार्यांसोबत इंदिरा गांधी रुग्णालय ते शंकरनगर दरम्याच्या बाभुळकर मार्गाचा
दौरा केला आणि नाग नदीच्या काठावर असलेले झोपडे तत्काळ हटविणायचे निर्देश दिले. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत
चौधरी यांनी इंदिरा गांधी
रुग्णालय ते शंकरनगर दरम्यानची पाहणी केली. यावेळी आयुक्त श्री. चौधरी यांनी नाग
नदीच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या झोपडे हटविण्याचे निर्देश दिले. याशिवाय
तुटलेली सीवर लाइन तात्काळ दुरुस्त करून पुलाची दुरूस्ती करावी, रस्त्यावर आलेल्या झाडांच्या
फांद्या कापाव्यात आदी निर्देशित केले.याप्रसंगी
मनपाचे अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी
अभियंता श्री. विजय गुरुबक्षानी, कनिष्ठ अभियंता श्री. मनोहर राठोड
उपस्थित होते.
मनपा आयुक्तांनी घेतला आपात्कालीन यंत्रणेच्या कामाचा आढावा
नागपूर:- पावसामुळे नागपूर शहरात निर्माण
झालेल्या आपात्कालीन प्रसंगातून दिलासा देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या
अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचे कार्य निरंतर सुरू आहे. मनपा आयुक्त तथा
प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सोमवारी (ता.२२)
मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर व प्रादेशिक
आपत्ती मुख्य नियंत्रण कडून अग्निशमन विभाग येथे भेट दिली व सुरू असलेल्या
मदतकार्याचा आढावा घेतला.शनिवारी २० जुलै रोजी मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक
भागात पाणी जमा झाले तर अनेक भागांमध्ये झाडांची पडझड झाली. रविवार २१
जुलैपर्यंत अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, उद्यान विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी
विभागाद्वारे मदत आणि बचाव कार्य करण्यात आले. रस्त्यावर, परिसरात जमा झालेल्या पाण्याचा
निचरा करण्यात आला. रस्त्यावर
पडलेली झाडे बाजूला सारुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा
करण्यात आला. तर आरोग्य विभाग, हिवताप व हत्तीरोग विभाग या विभागाद्वारे परिसरात फवारणी करून नागरिकांना
आवश्यक औषधांचा देखील पुरवठा करण्यात आला. आज सोमवारी २२ जुलै रोजी अग्निशमन व
आपत्कालीन सेवा विभागाद्वारे अनेक अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये जमा असलेले पाणी
काढण्याबाबत कार्य करण्यात आले.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि
अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी
वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर व प्रादेशिक आपत्ती मुख्य नियंत्रण कडून अग्निशमन विभाग
येथील नियंत्रण कक्षामध्ये भेट दिली व संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य
अग्निशमन अधिकारी श्री. बी. पी. चंदनखेडे यांनी शहरात अग्निशमन व आपत्कालीन सेवा
विभागाद्वारे करण्यात आलेली कामे आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या मदतकार्याची
माहिती आयुक्तांना दिली. मदतकार्य करण्यात आलेल्या भागांची यादी हिवताप व हत्तीरोग
विभागाला सोपवून संबंधित भागात फवारणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक
डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.शनिवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील दोन
व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला. हुडकेश्वर मार्गावरील सेंट पॉल स्कूल जवळील
नाल्यामध्ये ८५ वर्षीय सुधा वेळुकर ही महिला वाहून गेली. याबाबत माहिती मिळताच
सक्करदरा अग्निशमन केंद्राच्या पथकाद्वारे घटनास्थळी शोध मोहिम राबविण्यात आली.
यात महिलेचा मृतदेह पथकाने बाहेर काढला. पुनापुर रोड भरतवाडा येथील नाल्यामध्ये
वाहून गेल्याने ५२ वर्षीय भोजराज पटले या व्यक्तीचा मृत्यू झाला. सुगत नगर व कळमना
अग्निशमन केंद्राच्या पथकाने त्यांचे शव बाहेर काढले. याशिवाय भरतवाडा पवनगाव येथे, १२ वर्षीय मुलगा
नाल्यात वाहून गेला. या घटनेची माहिती कळमना पोलिस स्टेशनमधून मिळताच सुगत नगर
अग्निशमन व लकडगंज अग्निशमन पथकाद्वारे शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
गोधनी रोड
झिंगाबाई टाकळी प्रकाश नगर चौक येथे एका घरामध्ये मुलगा बंद झालेला होता. घटनेची
माहिती मिळताच सुगत नगर अग्निशमन केंद्राच्या पथकाने घटनास्थळी जाउन मुलाला सुखरुप
बाहेर काढले. याशिवाय दीनदयाल नगर आजी आजोबा उद्यानात झाड पडले, आनंद अपार्टमेंट सक्करदरा येथे
पाणी जमा, नरेंद्र नगर येथील श्री. देवतारे
यांच्या घरात पाणी जमा, त्रिमुर्ती नगर येथील श्री. गजानन मंदिराजवळ पाणी जमा, अयोध्या नगर येथे श्याम प्रिंटर्स
येथे पाणी जमा, भांडेवाडे येथील देवीदास चौकात
पाणी जमा, व्यंकटेश नगर येथे पाणी जमा अशा
विविध तक्रारी प्राप्त झाल्या. यावर नजीकच्या अग्निशमन केंद्रांनी घटनास्थळी जाउन
पाणी बाहेर काढून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले. मनपाच्या
मलेरिया व फायलेरिया विभागा मार्फत मानेवाडा, बेसा, लकडगंज,
नंदनवन, लक्ष्मीनगर, कळमना,
अयोध्या नगर, मोहन नगर, सक्करदरा,
सुगत नगर, हुडकेश्वर, नरसाळा,
पिपळा गाव इतर भागात फवारणी करण्यात येत आहे. तसेच संतरा मार्केट,
मारवाडी चाल, इंदिरा गांधीनगर, झापेडपट्टी येथे सुध्दा मनपा तर्फे फवारणी व स्वच्छता करण्यात येत आहे.
पावसामुळे बाधित भागात मनपाचे मदतकार्य चिखल साफ, फवारणी देखील केली
नागपूर:- शनिवारी २० जुलै रोजी आलेल्या
पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पाणी जमा झाले. मनपा आयुक्त तथा
प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त द्वय श्रीमती आंचल गोयल
आणि श्री. अजय चारठणकर यांनी जलमय झालेल्या भागांमध्ये
भेट देऊन पाहणी केली. बाधित भागांमध्ये मदतकार्य करण्याचे निर्देश आयुक्तांनी
प्रशासनाला दिले. त्यांच्या निर्देशानुसार शनिवारपासून (ता.२०) मनपाद्वारे विविध
भागांमध्ये मदतकार्य सुरु आहे.नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा
विभाग, उद्यान विभाग, घनकचरा
व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग,
आरोग्य विभाग, हिवताप व हत्तीरोग विभाग या
सर्व विभागांद्वारे समन्वयाने मदत आणि सेवाकार्य करण्यात येत आहे.शनिवारी आलेल्या
पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पाणी
जमा झाले, झाडे
पडली. मनपाच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाद्वारे जलमय भागातून
नागरिकांना सुखरूप बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. झाडे
पडलेल्या भागात अग्निशमन व आपत्कालीन
सेवा विभाग आणि उद्यान विभागाद्वारे पडलेली झाडे, फांद्या हटविण्याचे कार्य आज रविवारी देखील
सुरु आहेत. पाणी जमा झालेल्या भागातून पाण्याचा निचरा करण्यात आला. या भागांमध्ये
चिखल जमा असून ते देखील घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे स्वच्छ करण्यात येत आहे.
पावसाळी नाल्यांची देखील स्वच्छता सुरु आहे. हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे
स्वच्छता झालेल्या भागांमध्ये डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येत आहे. पावसामुळे बाधित भागातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मनपाचे सर्व
विभाग प्राधान्याने जलदगतीने काम करीत आहेत. मनपा
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त द्वय श्रीमती आंचल गोयल
व श्री. अजय चारठणकर हे
देखील स्वतः वेळोवेळी कामाचा आढावा घेत आहेत.
Subscribe to:
Comments (Atom)
भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन
मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...
-
नागपुर:- केंद्र सरकार ने जमीन-जायदाद खरीदी-बिक्री से जुड़े किसी भी गति विधी के लिए महारेरा एक्ट के साथ बार कोड की भी अनिवार्यता लागू की,लेकि...
-
आकाशवाणी नागपुर केन्द्र में संविधान निर्माता विश्वभूषण डा. बाबासाहेब अम्बेडकर की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई। पिछले वर्ष से ही आकाशवाणी...
.jpeg)




.jpeg)

%20(1).jpeg)








.jpeg)



