Friday, July 26, 2024

कारगिल विजय दिनी “अमर जवान” स्मारकाची स्वच्छता

 
नागपूर: भारतीय सैन्याच्या असीम शौर्याची आठवण जागृत ठेवणाऱ्या कारगिल विजय दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या चमुद्वारे अमर जवान शहीद स्मारकाची व थोर हुतात्मा यांच्या पुतळयाला स्वच्छता करून समस्त हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.स्वच्छसुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासह शहराच्या सौंदर्य करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका विशेष कार्य करीत आहे. 25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्यावतीने अमर जवान शहीद स्मारकासह शहरातील विविध ठिकाणी 
असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांची देखील स्वच्छता करण्यात आली.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात आणि दहाही झोनचे सहायक आयुक्त यांच्या देखरेखीत शहरातील दहाही झोन मध्ये असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांस्थानी श्रमदान करण्यात आले.  स्वच्छतेदरम्यान नागरिकांनी देखील श्रमदान करीत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...