Thursday, January 16, 2025

लकड़गंज में अत्याधुनिक फायर स्टेशन का प्रस्ताव तैयार है करने के आयुक्त के निर्देश

नागपुर:- नागपुर नगर निगम द्वारा लकड़गंज में जलाराम मंदिर के सामने पुराने फायर स्टेशन की जगह पर एक नया अत्याधुनिक फायर स्टेशन बनाया जाएगा। नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी ने गुरुवार (16 तारीख) को इस जगह का निरीक्षण किया. उन्होंने अत्याधुनिक भवन निर्माण के लिए संबंधित विभाग को प्रस्ताव तैयार करने का निर्देश दिया. इस अवसर पर अपर आयुक्त श्री अजय चारथंकर , अधीक्षण अभियंता श्री मनोज तालेवार , मुख्य अग्निशमन अधिकारी श्री बीपी चंदनखेड़े , उपायुक्त श्री मिलिंद मेश्राम , श्री गणेश राठौड़ उपस्थित थे। कमिश्नर ने यहां ग्राउंड फ्लोर प्लस 2 फ्लोर बिल्डिंग बनाने के निर्देश दिए। इसकी प्रस्तावित लागत 
लगभग 8 करोड़ रुपये है और इस केंद्र के अंतर्गत इतवारीक्वेटा कॉलोनी , लकड़गंज , दही बाजार , शांति नगर कॉलोनी , वर्धमान नगर , चापरूनगर , बगड़गंज , नंदनवन , टाडा , महल , गांधी पुतला चौक के नागरिक आएंगे। अग्निशमन सेवा का लाभ प्राप्त करें। लकड़गंज फायर स्टेशन की स्थापना 1953 में हुई थी। उस समय यह नागपुर का दूसरा बड़ा फायर स्टेशन था.. सेंटर का निर्माण बहुत पुराना है  जर्जरता के कारण जून 2018 से केंद्र को न्यू बगड़गंज प्राथमिक विद्यालय में स्थानांतरित कर दिया गया। अग्निशमन विभाग के मास्टर प्लान के अनुसार, नागपुर के क्षेत्रफल/जनसंख्या को देखते हुए 22 नए फायर स्टेशनों की आवश्यकता है और वर्तमान में 11 फायर स्टेशन मौजूद हैं। 
नये प्रस्तावित केन्द्रों में यह केन्द्र भी शामिल है। कमिश्नर के निर्देशानुसार 14 नई दमकल गाड़ियां 70 मीटर ऊंचा हाइड्रोलिक प्लेटफार्म खरीदने की प्रक्रिया शुरू कर दी गई है। कमिश्नर ने पूरे क्षेत्र का निरीक्षण किया और इस सेंटर के लिए जल्द से जल्द प्रस्ताव तैयार करने का निर्देश दिया. इस अवसर पर सहायक आयुक्त श्री प्रमोद वानखेड़े , विजय थुले , घनश्याम पंधारे , अग्निशमन विभाग के तुषार बरहाटे , कार्यकारी अभियंता रक्षमवार, कार्यकारी अभियंता पंकज पाराशर, पूर्व नगरसेवक मनोज चाफले, सुनील पडोले और अन्य उपस्थित थे।
 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 72 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  गुरुवार (16) रोजी शोध पथकाने 72 प्रकरणांची नोंद करून 56,800/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून  8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 100 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 800/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 32,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन 

विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशापगॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ताफुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत्त 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 17 प्रकरणांची नोंद करून 3,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. सुभाष मिष्ठान  यांनी ड्रेनेज लाईन चेंबरला जोडलेली असल्याने रू.10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत श्री. बलराम शाहू यांनी परवानगीशिवाय चेंबरच्या जोडणीसाठी रस्ता तोडल्यामुळे रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 2 प्रकरणांची नोंद करून रू. 15,000/- दंड वसूल केला.
 

पौर्णिमा दिवस’ निमित्त प्रताप नगर चौकामध्ये जनजागृती

नागपूर:- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या वतीने पौर्णिमा दिवस' अभियानाद्वारे बुधवार (ता.१५) प्रताप नगर चौक  परिसरात जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी सुरभी जयस्वालमेहुल कोसुरकरबिष्णुदेव यादवप्रिया यादवश्रिया जोगेपार्थ जुमडेपिनाकी बनिक आदींनी जनजागृती केली.स्वयंसेवकांनी व्यापारी 
बांधवांना अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या अभियानाला  प्रताप नगर  चौक परिसरातील व्यावसायिक,  दुकानदार,  नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.

भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे संपूर्ण ५४ एकर जागा मोकळी

नागपूर :- प्रत्येक शहरामध्ये नियमानुसार विकास आराखड्यात घनकचरा व्यवस्थापनाकरीता जागा राखीव असते. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या मान्यतेनुसार नागपुरातील भांडेवाडी मधील  जागा कचरा डम्पिंगसाठी व कचरा प्रक्रियेसाठी सुनिश्चित केली गेली आहे. येथे शहरातील संपूर्ण कचऱ्याचे संकलन करून त्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व  तेथील जागा स्वच्छ आणि मोकळी राहावी याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायोमायनिंग प्रकल्प राबविला जात आहे. नागपूर महानगरपालीकेकडून आत्तापर्यंत जुन्या २० लक्ष मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आलेली आहे. भांडेवाडी बिडगांव रोड येथील ५४ एकर जागा सन २०१९ पर्यंत ही कचऱ्याने संपूर्ण भरलेली होती तेथे प्रक्रिया न झालेला कचरा साठवून ठेवण्यात आला होता.  नागपूर 
महानगरपालिकेने स्वखर्चाने या कचऱ्यावर बायोमायनिंग चा प्रकल्प राबविला व  संपूर्ण ५४ एकर जागा मोकळी केली.  शहरात स्वच्छता राहावी व साचलेल्या कचऱ्याची प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी याकरिता नागपूर महानगरपालिकेकडून सतत प्रयत्न केले जातात.भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे दोन जागेवर (५५ एकर जागा आणि दुसरी ५४ एकर जागा) कचरा साठवण्यात येत होता. ५५ एकर जागा आणि ५४ एकर जागा ही जुन्या कचऱ्याने संपूर्ण भरलेली होती. प्रक्रिया न झालेला कचरा साठवून ठेवण्यात आला होता. ५४ एकर जागेवर अंदाजे १० लाख मेट्रिक टन जुना घनकचरा जमा होता. ही संपूर्ण जागा स्वच्छ आणि मोकळी व्हावी याकरिता नागपूर  महानगरपालिकेने या कचऱ्यावर स्वखर्चाने बायोमायनिंग चा प्रकल्प राबविला.
नंतर नागपूर महानगरपालिकेने या कचऱ्यावर (legacy waste) बायोमायनिंग करून संपूर्ण परिसर फेब्रुवारी २०२१ ला मोकळा केला गेला. या ५४ एकर जागेवर सध्या नागपूर महानगरपालिकेने विविध पर्यावरण प्रकल्प राबविले आहे. जसे बांधकाम आणि पाडाव (Construction and Demolition) कचरा प्रक्रिया केंद्र वेस्ट टू एनर्जी अंतर्गत १००० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचे सीबीजी प्लँन्ट उभारणेएसएलएफ चे बांधकाममियावाकी पर्यावरणीय प्रकल्प इत्यादीयापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित   प्रकल्पाचे बांधकाम कार्य सुरु झाले आहे त्याकरिता जागा सुनिश्चित करण्यात आली आहे


ही माहिती अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी दिली.त्याचबरोबर भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील ५५ एकर जागेवर एसएलएफ (sanitary landfill) मध्ये साचलेल्या २१.३० लक्ष टन  कचऱ्याचे सुद्धा बायोमायनिंग करून तो संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. आजपर्यंत १० लाख टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सुमारे १५ एकर जागा मोकळी करण्यात आली आहे.  हे काम वर्ष २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा मनपाचा मानस आहे. त्यामुळे अंदाजे २७ एकर जागा मोकळी होऊन त्या जागेवर पुन्हा नवीन पर्यावरणीय प्रकल्प राबविण्यात येऊ शकतील.नागपूर शहरात दैनंदिन १३००-१४०० टन घनकचऱ्याची निर्मिती होते. राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणीय प्रकल्पांमुळे आजूबाजूच्या परिसरावर होणारे प्रदूषण बऱ्याच अंशी कमी होईल व लोकांना देखील दिलासा मिळेल. नागपूर महानगरपालिकेद्वारे भांडेवाडी येथे  मियावाकी पद्धतीने ५००० चौरस मीटरमध्ये १५,५०० झाडे लावण्यात आली आहे. शहरात स्वच्छता राहावी व पर्यावरण शुद्ध राहावे याकरिता नागपूर महानगरपालिकेकडून सतत प्रयत्न केले जात आहेत.

Monday, January 13, 2025

मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित करुन दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रभावी अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणी व नियोजनाच्या संदर्भात आयुक्तांनी सोमवारी (ता.१३) सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मनपा मुख्यालतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभाकक्षात बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलअतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकरउपायुक्त श्रीमती विजया बनकरउपायुक्त सर्वश्री विजय देशमुखमिलींद मेश्रामप्रकाश वराडेगणेश राठोडअशोक गराटेपरिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधवउपायुक्त उपायुक्त डॉ. रंजना लाडेअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारडॉ. श्वेता बॅनर्जीउद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगारसहायक आयुक्त सर्वश्री श्याम कापसेहरीश राऊतघनश्याम पंधरेनरेंद्र बावनकरविजय थुलमुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी निश्चित केलेल्या प्रत्येक बाबींवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मनपा आयुक्तांनी नागपूर महानगरपालिकेचे संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करणे तसेच संकेतस्थळ ‘यूजर 


फ्रेंडली’ करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. मनपाने सुरु केलेल्या सर्व सेवांचा संकेतस्थळामध्ये अंतर्भाव करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मनपा आणि झोन कार्यालयांच्या सखोल स्वच्छतेचे देखील आयुक्तांनी निर्देश दिले. मनपाच्या दहाही झोनमध्ये स्वच्छता स्पर्धा घेण्याची देखील त्यांनी सूचना केली. झोन कार्यालय तसेच परिसरात देखील स्वच्छता राखली जावीकार्यवाहीमध्ये जप्त साहित्यवाहन आदी पडून असल्यास ते अन्य ठिकाणी जमा करुन त्यांच्या निर्लेखनाची कार्यवाही करण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागामध्ये लावलेल्या विभागांच्या माहिती फलकावरील माहिती अद्ययावत करणे तसेच मुख्यालय झोनमध्ये पिण्याचे पाणीअभ्यागत कक्ष यांची व्यवस्था देखील अद्ययावत करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देश दिले.तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रारी निकालात काढण्याची गती वाढविण्याबाबत सुद्धा आयुक्तांनी निर्देशित केले. पोर्टलसोबतच मनपा मुख्यालय तसेच झोनमध्ये नागरिकांकडून देण्यात येणाऱ्या तक्रारी व त्यावरील प्रतिसाद याचे रेकॉर्ड ठेवून प्रलंबित सर्व निकाली काढणे व तक्रारींच्या निराकरणासंदर्भात झोनस्तरावर चमू तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आयुक्तांनी नोडल विभाग म्हणून जबाबदारी निश्चित केली.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 94 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  सोमवार (13) रोजी शोध पथकाने 94 प्रकरणांची नोंद करून 58,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया,  स्टॉल्स,  पानठेले, फेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून  10,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी 
कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 23 प्रकरणांची नोंद करून 25,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून 4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. 
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास  10 प्रकरणांची नोंद करून 10,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत श्रीमती. राजश्री रायबोले यांनी चेंबर तोडल्यामुळे त्यातिल सांडपाणी रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. श्री निवास रेसेडेन्सी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अभिषेक किराणा यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 3 प्रकरणांची नोंद करून रू. 20,000/- दंड वसूल केला.

शहर स्वच्छतेत सर्वांचे सहकार्य आवश्यक,स्वच्छ सर्वेक्षणासाठी झोननिहाय तयारी सुरु करा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

नागपूर:स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या पूर्व तयारी बाबत आढावा बैठक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत सोमवारी (ता. १३) मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या सभाकक्षात घेण्यात आली. या बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या तयारी बाबत सादरीकरण करण्यात आले व संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेसंबंधी कार्याचे निर्देश देण्यात आले. नागपूर शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षणची चमूद्वारे पाहणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने दहाही झोनमध्ये सुरू असलेले स्वच्छतेचे कार्य आणि आवश्यक कामाचा यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आयुक्तांच्या सभाकक्षात आयोजित आढावा बैठकीमध्ये उपायुक्त सर्वश्री विजय देशमुखमिलींद मेश्रामप्रकाश वराडेगणेश राठोडअशोक गराटेउपायुक्त डॉ. रंजना लाडेपरिवहन व्यवस्थापक श्री विनोद जाधवअधीक्षक 

अभियंता श्री मनोज तालेवारअधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जीमुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्लेसहायक आयुक्त सर्वश्री. हरीश राऊतघनश्याम पंधरेनरेंद्र बावनकरप्रमोद वानखेडेविजय थुलवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरउद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगारकार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारेकार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडेसुनील उईकेराजेंद्र राठोडनरेश शिंगनजुडेश्रीकांत वाईकरअजय पाझारेकमलेश चव्हाणअजय गेडाममनोज सिंगउपद्रव शोध पथक प्रमुख श्री. वीरसेन तांबेसर्व झोनल अधिकारीकेपीएमजीह्युमन मॅट्रिक्स या एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.स्वच्छ भारत अभियान २.० च्या अंतर्गत केपीएमजी एजन्सीद्वारे सादरीकरण देण्यात
आले. त्यांनी यावेळी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक बाबींची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. शहरातील दहाही झोनमध्ये ह्युमन मॅट्रिक्स या एजन्सीच्या प्रतिनिधींद्वारे कचरा संकलन आणि स्वच्छतेबाबत नियमित जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीद्वारे झोनमध्ये आवश्यक कार्यांची देखील माहिती यावेळी सादर करण्यात आली. यामध्ये स्वच्छतेसंबंधी सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहराला स्वच्छ ठेवण्यात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे तसेच त्याकरिता सर्व कार्यकारी अधिकारीझोनल अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावेअसे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. यावेळी घनकचरा व्यवस्थापनरस्त्याच्या कडेवरील स्वच्छताफुटपाथवरील स्वच्छतासार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व सुव्यस्थाघरोघरील कचरा व्यवस्थापनशाळेतील स्वच्छतावैद्यकीय कचरा व्यवस्थापननदी व नाला स्वच्छताकचऱ्यावर होणारी प्रक्रियाहोम कम्पोस्टिंगबांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन या सर्व ठळक बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. शहर स्वच्छतेचा मुख्य उद्देश अनेकांपर्यंत पोहोविण्याकरिता युवकांच्या व नागरिकांच्या सहकार्याने नवनवीन उपक्रम राबवून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात यावी. स्वच्छ सर्वेक्षणात आपले नागपूर शहर अधिक समोर गेले पाहिजे आणि उच्चांक गाठला पाहिजे याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मनपा आयुक्त म्हणाले. प्रत्येक झोननुसार तेथील सकारात्मक आणि नकारात्मक बाबी समजून त्यावर कार्य करणे गरजेचे आहे. याविषयी प्रत्येक झोनल अधिकाऱ्याने आराखडा तयार करून कार्य करावे. शहरात ठिकठिकाणी बांधकाम आणि पाडकाम कचरा (C AND D WASTE) बांधकामाच्या ठिकाणी आढळून येत असूनतेथील झोनल अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे कडक निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. शहरातील शौचालयात स्वच्छता असावीआवश्यक त्या सुविधांसह ते युक्त असावेनसल्यास त्याठिकाणी त्वरित काम करण्यात यावे असेही आयुक्त यावेळी म्हणाले. बैठकीमध्ये नदी व नाला स्वच्छतेवर भर देण्यात आला. नाल्यातील झाडीझुडपे तसेच कचरा स्वच्छ करण्यात यावा.शहरातील वायू गुण निर्देशांक सुधारण्यावर काम करा असे आयुक्त म्हणाले. शहरातील सौंदर्यीकरण प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच जीव्हीपी पॉईंट्स स्वच्छ करण्यात यावेत. झोनल अधिकाऱ्यांनी स्वच्छतेच्या या संपूर्ण कार्याचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...