Thursday, January 16, 2025

पौर्णिमा दिवस’ निमित्त प्रताप नगर चौकामध्ये जनजागृती

नागपूर:- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या वतीने पौर्णिमा दिवस' अभियानाद्वारे बुधवार (ता.१५) प्रताप नगर चौक  परिसरात जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी सुरभी जयस्वालमेहुल कोसुरकरबिष्णुदेव यादवप्रिया यादवश्रिया जोगेपार्थ जुमडेपिनाकी बनिक आदींनी जनजागृती केली.स्वयंसेवकांनी व्यापारी 
बांधवांना अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या अभियानाला  प्रताप नगर  चौक परिसरातील व्यावसायिक,  दुकानदार,  नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जनजागृती दरम्यान स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...