Thursday, January 16, 2025

भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे संपूर्ण ५४ एकर जागा मोकळी

नागपूर :- प्रत्येक शहरामध्ये नियमानुसार विकास आराखड्यात घनकचरा व्यवस्थापनाकरीता जागा राखीव असते. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या मान्यतेनुसार नागपुरातील भांडेवाडी मधील  जागा कचरा डम्पिंगसाठी व कचरा प्रक्रियेसाठी सुनिश्चित केली गेली आहे. येथे शहरातील संपूर्ण कचऱ्याचे संकलन करून त्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व  तेथील जागा स्वच्छ आणि मोकळी राहावी याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायोमायनिंग प्रकल्प राबविला जात आहे. नागपूर महानगरपालीकेकडून आत्तापर्यंत जुन्या २० लक्ष मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आलेली आहे. भांडेवाडी बिडगांव रोड येथील ५४ एकर जागा सन २०१९ पर्यंत ही कचऱ्याने संपूर्ण भरलेली होती तेथे प्रक्रिया न झालेला कचरा साठवून ठेवण्यात आला होता.  नागपूर 
महानगरपालिकेने स्वखर्चाने या कचऱ्यावर बायोमायनिंग चा प्रकल्प राबविला व  संपूर्ण ५४ एकर जागा मोकळी केली.  शहरात स्वच्छता राहावी व साचलेल्या कचऱ्याची प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी याकरिता नागपूर महानगरपालिकेकडून सतत प्रयत्न केले जातात.भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे दोन जागेवर (५५ एकर जागा आणि दुसरी ५४ एकर जागा) कचरा साठवण्यात येत होता. ५५ एकर जागा आणि ५४ एकर जागा ही जुन्या कचऱ्याने संपूर्ण भरलेली होती. प्रक्रिया न झालेला कचरा साठवून ठेवण्यात आला होता. ५४ एकर जागेवर अंदाजे १० लाख मेट्रिक टन जुना घनकचरा जमा होता. ही संपूर्ण जागा स्वच्छ आणि मोकळी व्हावी याकरिता नागपूर  महानगरपालिकेने या कचऱ्यावर स्वखर्चाने बायोमायनिंग चा प्रकल्प राबविला.
नंतर नागपूर महानगरपालिकेने या कचऱ्यावर (legacy waste) बायोमायनिंग करून संपूर्ण परिसर फेब्रुवारी २०२१ ला मोकळा केला गेला. या ५४ एकर जागेवर सध्या नागपूर महानगरपालिकेने विविध पर्यावरण प्रकल्प राबविले आहे. जसे बांधकाम आणि पाडाव (Construction and Demolition) कचरा प्रक्रिया केंद्र वेस्ट टू एनर्जी अंतर्गत १००० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचे सीबीजी प्लँन्ट उभारणेएसएलएफ चे बांधकाममियावाकी पर्यावरणीय प्रकल्प इत्यादीयापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित   प्रकल्पाचे बांधकाम कार्य सुरु झाले आहे त्याकरिता जागा सुनिश्चित करण्यात आली आहे


ही माहिती अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी दिली.त्याचबरोबर भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील ५५ एकर जागेवर एसएलएफ (sanitary landfill) मध्ये साचलेल्या २१.३० लक्ष टन  कचऱ्याचे सुद्धा बायोमायनिंग करून तो संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. आजपर्यंत १० लाख टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सुमारे १५ एकर जागा मोकळी करण्यात आली आहे.  हे काम वर्ष २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा मनपाचा मानस आहे. त्यामुळे अंदाजे २७ एकर जागा मोकळी होऊन त्या जागेवर पुन्हा नवीन पर्यावरणीय प्रकल्प राबविण्यात येऊ शकतील.नागपूर शहरात दैनंदिन १३००-१४०० टन घनकचऱ्याची निर्मिती होते. राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणीय प्रकल्पांमुळे आजूबाजूच्या परिसरावर होणारे प्रदूषण बऱ्याच अंशी कमी होईल व लोकांना देखील दिलासा मिळेल. नागपूर महानगरपालिकेद्वारे भांडेवाडी येथे  मियावाकी पद्धतीने ५००० चौरस मीटरमध्ये १५,५०० झाडे लावण्यात आली आहे. शहरात स्वच्छता राहावी व पर्यावरण शुद्ध राहावे याकरिता नागपूर महानगरपालिकेकडून सतत प्रयत्न केले जात आहेत.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...