Monday, April 28, 2025

मनपा मानेवाडा आरोग्य केंद्राच्या राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकनाला सुरुवात डॉ. सिद्धी घटवाल व डॉ. अमित शर्मा यांचेकडून दोन दिवस मूल्यांकन

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकन करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाकडून दोन सदस्यीय समिती नागपूरमध्ये दाखल झालेली आहे. राष्ट्रीय गुणवत्ता मूल्यांकन मानके (एनक्यूएएस) तपासण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन कर्ता गोवा येथील राज्य समन्वयक डॉ. सिद्धी घटवाल व हरियाणातील फरीदाबाद येथील जिल्हा समन्वयक डॉ. अमित शर्मा यांचे नागपूर शहरात आगमन झाले. सोमवारी (ता.२८) मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मनपाद्वारे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरशहर गुणवत्ता समन्वयक डॉ. राजेश बुरेमानेवाडा केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल पटलेसार्वजनिक आरोग्य व्यवस्थाक डॉ. शुभांगी कुंभरे आदी उपस्थित होते.एनक्यूएएसचे राष्ट्रीय मूल्यांकनकर्तांकडून सोमवार आणि मंगळवार (२८ व २९ एप्रिल) दोन दिवस मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन केले जाणार आहे. सामान्य दवाखानालसीकरणआरोग्य सेवेची व्याप्तीमाता आरोग्यबाल 
आरोग्यऔषधालयप्रयोगशाळा अशा विविध १२ सेवांच्या कार्याचे मूल्यांकन होणार आहे. राष्ट्रीय चमूकडून होणाऱ्या मूल्यांकनामध्ये सर्व वैद्यकीय अधिकारीपरिचारिका व इतर कर्मचारी यांनी पूर्ण सहकार्य करावे. समितीकडून विचारण्यात येणारी माहितीप्रश्नांची व्यवस्थित व योग्य माहिती देण्यात यावी. मनपाच्या आरोग्य केंद्राचे कार्याला राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम मानांकन मिळावेयादृष्टीने सर्वांनी कार्य करण्याचे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.
एनक्यूएएसचे राष्ट्रीय मूल्यांकन कर्ता डॉ. सिद्धी घटवाल व डॉ. अमित शर्मा यांनीही यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारीपरिचारीका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दोन दिवस चमूकडून मूल्यांकनाचे कार्य होत असताना आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या शंकांचे देखील निरसरण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.  मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात दोन्ही राष्ट्रीय मूल्यांकनकर्तांचे मनपाद्वारे शालश्रीफळ आणि रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनल पटेल यांनी मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्याची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. संचालन शहर गुणवत्ता समन्वयक डॉ. राजेश बुरे यांनी केले.यानंतर एनक्यूएएसचे राष्ट्रीय मूल्यांकन कर्ता डॉ. सिद्धी घटवाल व डॉ. अमित शर्मा यांच्यातर्फे नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन केले जाणार आहे. तसेच गुजरात येथील डॉ. मोईज मेघराजीया व राजस्थान येथील डॉ. कर्नल प्रमोद कुमार या समितीद्वारे कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन केले जाणार आहे.

महापालिका आयुक्तांनी दिली लोकसेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ

 मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी जनमाहिती अधिकार कार्यशाळा संपन्न  जनमाहिती अधिकारी श्री. प्रशांत चौधरी यांनी केले मार्गदर्शन
नागपूर:- महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 च्या दशकपूर्तीनिमित्ताने महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क दिनाच्या दशकपूर्ती निमित्त आज (ता. 28) सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात शपथ दिली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायद्यामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेला त्वरित व पारदर्शक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची शपथ महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. तसेच झोन स्तरावर सुध्दा लोकसेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.यावेळी उपायुक्त श्री. मिलिंद मेश्रामअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारपरिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधववैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरकार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचेटवारनगररचना विभागाचे सहाय्यक संचालक श्री. ऋतुराज जाधवसहाय्यक आयुक्त श्री. हरीश राऊतसहाय्यक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकरसहाय्यक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडेसहाय्यक आयुक्त श्रीमती स्नेहलता 
कुंभारसहाय्यक आयुक्त श्री. शाम कापसेसहाय्यक आयुक्त श्रीमती सोनम देशमुखसामान्य प्रशासन अधीक्षक राजकुमार मेश्रामअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री. डॉ. नरेंद्र बहीरवार व महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकसेवा दिनानिमित्त कार्यशाळा:- लोकसेवा हक्क दिनाच्या निमित्ताने महापालिकेतील जनमाहिती अधिकाऱ्यांची कार्यशाळा डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह येथे आयोजित केली होती. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून जनमाहिती अधिकारचे
राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. प्रशांत चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपायुक्त श्री.अशोक गराटेउपायुक्त श्री.गणेश राठोडकार्यकारी अभियंता अश्विनी यलचटवार सहायक आयुक्त श्री. श्याम कापसेसहाय्यक आयुक्त श्री. प्रमोद वानखेडेसहाय्यक आयुक्त श्री. विजय थूलसहाय्यक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकरपारितोष कंकाळसहाय्यक आयुक्त श्रीमती स्नेहलता कुंभारसहायक आयुक्त श्रीमती सोनम देशमुखश्री. सतीश चौधरीमहापालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनीउपअभियंता राजीव गौतमसामान्य प्रशासन अधीक्षक श्री. राजकुमार मेश्रामअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारप्रामुख्याने उपस्थित होते.





राज्यात महाराष्ट्र राज्य लोक सेवा हक्क आयोगाची स्थापना 28 एप्रिल 2015 रोजी झाली असून  28 एप्रिल हा दिवस ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दशकपूर्तीचे औचित्य साधून विशेष उपक्रम राबविले गेले. येथे सोमवारी (ता.28) नागपूर महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जन माहिती अधिकार कायद्याची सखोल माहिती व्हावी तसेच जनमाहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी श्री. प्रशांत चौधरी अधिकारी- कर्मचारी यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कीज्या ठिकाणी आपण काम करतो तिथे सर्वसामान्यसाठी कामे करणे गरजेचे आहे. त्याकरीता स्वत:हून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. 
ज्या ठिकाणी आपण काम करतो ते आपले कर्तव्य पार पाडण्याचे एक पवित्र स्थान आहेअसे मानले तर देशाची प्रगती होईलअसेही ते म्हणाले. माहिती अधिकार कायदा अंतर्गत आलेला अर्ज एकाच संस्थेच्या विविध विभागांशी संबंधित असेल तर त्याकरीता संवाद वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी माहितीचा अधिकारामधील विविध कलमे
शासन निर्णंयाची माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले जनमाहिती अधिकार कायदा 2005, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 हे दोन्ही कायदे जनतेच्या कल्याणाकरीता आहे. या कायदयामुळे जनता योग्य ती माहिती प्राप्त करुन घेवु शकते. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदयामुळे चांगले सकारात्मकता परिणाम दिसुन आले आहे. तसेच नागरीकांचा त्रास कमी झालेला आहे. नागरीकांना घरबसल्या अर्जांची स्थिती जाणून घेता येते. नागरीकांना संधी उपलब्ध करुन केल्याबद्दल श्री. प्रशांत चौधरी यांनी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. असेच कायदे राज्यात यावे अशी अपेक्षा केली. 

शहरातील १० शासकीय रुग्णालयांमध्ये कोल्ड वॉर्डची व्यवस्था उष्माघात प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

नागपूर:- भीषण उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढत आहेत. अशात शहरातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील १० शासकीय रुग्णालयांमध्ये कोल्ड वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांना देखील उष्माघातासाठी अलर्ट’ राहण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.उष्माघात प्रतिबंधासाठी नागपूर शहरात विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याशिवाय शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयडॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालयकामठी रोडसेंट्रल रेल्वे रुग्णालयइ.एस.आय.एस. रुग्णालयसोमवारी पेठडागा रुग्णालय गांधीबागतसेच मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगरपाचपावली स्त्री रुग्णालयआयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा या दहा रुग्णालयांमध्ये विशेष कोल्ड वार्ड तयार करण्यात आले आहेत. १०८ च्या 
रुग्णवाहिका तसेच मनपाच्या रुग्णवाहिका सज्ज आहेत. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उष्माघाताच्या रुग्णांवर त्वरीत उपचार व्हावेत यासाठी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना देखील पत्र देण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाल्यास त्याचा अहवाल मनपा आरोग्य विभागाला पाठविण्याचे देखील आदेश देण्यात आले आहे.विशेष म्हणजेखासगी रुग्णालयांमध्ये कोल्ड वार्ड उपलब्ध नसल्यास मनपाद्वारे सुविधेसाठी संपर्क करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. मनपाद्वारे विविध आजारांच्या संदर्भात तसेच उन्हाळ्यात उष्माघाताच्या संदर्भात रुग्णांचा नोंदणी अहवाल नियमितरित्या खासगी रुग्णालयांकडून मागविण्यात येत असतो
अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.उष्माघाताची लक्षणे:- शरीराचे तापमान वाढल्यास त्याला उष्माघात म्हणतात. मळमळउलटीतापत्वचा कोरडी पडणेथकवाचक्करडोकेदुखीमनाची स्थिती बिघडतेचिडचिडजीभ जड होणेजास्त घाम येणेपायात गोळे येणेपोटऱ्यात वेदनारक्तदाब वाढणेमानसिक बेचैनीबेशुद्धावस्था.अशी घ्या काळजी:- नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघणे टाळावे.उन्हात जाण्याची वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी.उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावेभरपूर पाणी प्यावे.स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी हलकीपातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत बाहेर जाताना गॉगल्सछत्री किंवा हॅटबूट किंवा चप्पलचा वापर करावाप्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावीउन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा.ओल्या कपड्याने डोकेमानचेहरा झाकणेशरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएसलिंबूपाणीताक आदी पेय नियमीत पिणेघर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदेपंखाकुलर आदींचा वापर करावा.हे टाळा:उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणेउन्हात कष्टाची कामे करणे टाळा.लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका.गडदघट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावेउन्हात स्वयंपाक करणे टाळावेस्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.मद्यचहाकॉफीसॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावीशिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 43 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (28) रोजी शोध पथकाने 43 प्रकरणांची नोंद करून रु.61,000/- रुपयाचा दंड वसूल केला. हातगाडी, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 39 प्रकरणांची नोंद करून रु.15,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून रु.2,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोडींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/-रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा 
रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु. 12,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन रू.2,000/- दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून रु.3,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतेर उपद्रव संस्था असल्यास 03 प्रकरणांची नोंद करून रु.3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. मंगलुरु किचन यंनी अन्नपदार्थ टाकून चेंबरमध्ये अडथळा निर्माण झाला आणि ग्रीन ट्रिब्युनल कायद्याअंतर्गत रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला.
धरमपेठ झोन अंतर्गत मे. कैंसर क्लिनिक सामान्य कचऱ्यासोबत जैव वैद्यकीय कचरा आढळला आणि BMW-1998 अंतर्गत रु.20,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. नरसिंग येडे यांनी वैयक्तिक कामासाठी वाहन क्रमांक MH-CT-7773 द्वारे रस्ता अडवल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. मालगुडी कॅफे यांनी कॅफेचा कचरा जवळच्या रस्त्याच्या पसरल्याबद्दल 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. राजा बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल एकुण रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन मे. विजय किराणा शॉप यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. आसी नगर झोन अंतर्गत तुषार अनिल  इंदूरकर  यांनी जवळच्या फूटपाथ परिसरात केटरिंग साहित्य पसरवल्याबद्दल 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 07 प्रकरणांची नोंद करून रू. 65,000/- दंड वसूल केला.

Monday, April 21, 2025

नागपूर महापालिकेला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान मुख्यमंत्री मान. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्तांनी स्वीकारला पुरस्कार

नागपूर:- महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने दिल्या जाणारा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना मुंबईत नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कौशल्य विकास मंत्री मा. श्री मंगल प्रभात लोढा व राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक उपस्थित होते.महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या आर्थिक नियोजन प्रणाली अर्थात फायनान्सियल अकाऊंटिंग सिस्टम (एफएएस)या प्रणालीसाठी हा १० लाख रुपयांचा पुरस्कार सन २०२३-२४ या वर्षासाठी प्रदान करण्यात आला आहे. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२३-२४ अंतर्गत राज्यस्तरावर थेट प्राप्त प्रस्ताव आणि 
विभागीय समित्यांकडून प्राप्त प्रस्तावांमधून राज्यस्तरिय निवड समितीने नागपूर महापालिकेने राबविलेल्या या प्रणालीची या पुरस्कारासाठी निवड केली. या पुरस्कारांची घोषणा राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काही दिवसांपूर्वी केली होती. या पुरस्कारने नागपूर महापालिकेने राबवलेल्या या अभिनव प्रणालीचा राज्यपातळीवर गौरव झाला आहे.यापूर्वी सुद्धा नागपूर महापालिकेला राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जिओ-सिव्हीक मालमत्ता कर व्यवस्थापन प्रणालीसाठी गेल्यावर्षी नागपूर महापालिकेला सन्मानित करण्यात आले होते. नागपूर महापालिकेला सलग दुसऱ्यांदा प्रशासकीय गतिमानता पुरस्कार मिळाल्याने नागपूर महापालिकेच्या प्रशासनाच्या कामकाजावर यशस्वीतेची मोहर उमटली आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 45 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (21) रोजी शोध पथकाने 45 प्रकरणांची नोंद करून 61,700/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 6,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा 
वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 12,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून 3,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 30,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. अन्ना इडली यांनी मोठ्या एक्झॉस्ट फॅनद्वारे जवळच्या शेजाऱ्यांमध्ये ध्वनी प्रदूषण पसरवल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. स्वागत लॉन यांनी नाल्यावर टाकाऊ अन्न/जेवण टाकले जात असल्याने आणि डिस्टिलिंग चेंबरची उपलब्धता नसल्याबद्दल 30,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. माया स्विट्स यांनी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 03 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.

Thursday, April 17, 2025

उष्माघात प्रतिबंधासाठी कळमना मार्केट यार्ड व्‍यापारी असोसिएशनचा संकल्प उष्माघात हॉटस्पॉट परिसरात मनपातर्फे जनजागृती

नागपूर:- वाढत्या तापमानामुळे संभावणारा धोका टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे विविध भागांमध्ये जनजागृती कार्य करण्यात येत आहे. उष्माघाताचे नागपूर शहरात दहा हॉटस्पॉट घोषित करण्यात आलेले आहेत. यातील कळमना मार्केट यार्ड परिसरात गुरुवारी (ता.१७) जनजागृती करण्यात आली. या जनजागृती नंतर कळमना मार्केट यार्डमधील व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उष्माघात प्रतिबंधासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प केला.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात शहरातील उष्माघात हॉटस्पॉट परिसरांमध्ये जनजागृती केली जात आहे. या अंतर्गत गुरुवारी (ता.१७) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय भवन येथील सभागृहामध्ये सर्व व्यापारी बांधवांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीत मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी व्यापारी बांधवांना माहिती 
दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अपर निबंधक तथा सचिव श्री. एन.पी. येगलेवाडउपसचिव श्री. आर.एस. चवरेश्री. डी.व्ही.बागडेमनपाच्या लकडगंज झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीनबाजार निरीक्षक श्री.एस.एस. निमकर आदी उपस्थित होते.यावेळी व्यापारी बांधवांना उष्माघात म्हणजे कायत्यावर प्राथमिक उपचार काय व उष्माघात झालेल्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी करावयाचे उपाय तसेच उष्माघात होउ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. खूप तापमान राहिल्यास त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. 
थेट उन्हात काम केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम. अशा स्थितीत काळजी घेणे आवश्यक आहे. घामोळ्या येणेपायाची नस लागणे (क्रॅम्प येणे)सुस्त वाटणेचक्कर येउन पडणे ही साधारणत: उष्णतेमुळे दिसणारे परिणाम आहेत. पण यात सर्वांत उष्माघात हा अत्यंत धोकादायक आहे. उष्माघात झालेली व्यक्ती अचेत होउन जाते व त्याला स्वत:वर नियंत्रण करता येत नाही. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होउन जाते घाम देखील येत नाही. शरीर संपूर्ण कोरडे असताना शरीराचे तापमान प्रचंड वाढते. अशा स्थितीत अशा व्यक्तीला सावलीत नेऊन वारा घालणेत्याच्या डोक्यावर कापडटॉवेल ठेवून त्यावर पाणी टाकून शरीराचे तापमान थंड करण्याचा प्रयत्न व १०८ या रुग्णवाहिका सेवा क्रमांकावर फोन लावून माहिती देणे अशा बाबींची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी डॉ. नवखरे यांनी केले.व्यापारी बांधवांनी दुपारच्या वेळी काम बंद ठेवावे. कामाच्या ठिकाणी ग्रीन नेट लावणेपिण्याच्या  पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्याचे आवाहन यावेळी मनपाद्वारे करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अपर निबंधक तथा सचिव श्री. एन.पी. येगलेवाड यांनीही व्यापारी बांधवांनी मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची सूचना केली. मार्केट यार्डच्या परिसरात ध्वनीप्रक्षेपकावरुन या सर्व सूचना देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.शरीराचे तापमान वाढल्यास त्याला उष्माघात म्हणतात. मळमळ
उलटीतापत्वचा कोरडी पडणेथकवाचक्करडोकेदुखीमनाची स्थिती बिघडतेचिडचिडजीभ जड होणेजास्त घाम येणेपायात गोळे येणेपोटऱ्यात वेदनारक्तदाब वाढणेमानसिक बेचैनीबेशुद्धावस्था. नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघणे टाळावे.उन्हात जाण्याची वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी.उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावेभरपूर पाणी प्यावे.स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी हलकीपातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत बाहेर जाताना गॉगल्सछत्री किंवा हॅटबूट किंवा चप्पलचा वापर करावाप्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावीउन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा. ओल्या कपड्याने डोकेमानचेहरा झाकणेशरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएसलिंबूपाणीताक आदी पेय नियमीत पिणेघर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदेपंखाकुलर आदींचा वापर करावा. उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणेउन्हात कष्टाची कामे करणे टाळा. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका.गडदघट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावेउन्हात स्वयंपाक करणे टाळावेस्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.मद्यचहाकॉफीसॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावीशिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.  

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...