नागपूर:- भीषण उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढत आहेत. अशात शहरातील
आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत
चौधरी यांच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील १० शासकीय रुग्णालयांमध्ये कोल्ड
वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांना
देखील उष्माघातासाठी ‘अलर्ट’ राहण्याचे आवाहन मनपाद्वारे
करण्यात आले आहे.उष्माघात प्रतिबंधासाठी नागपूर शहरात विविध प्रकारच्या उपाययोजना
राबविण्यात येत आहेत. याशिवाय शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
(मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
(मेयो), शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालय, कामठी
रोड, सेंट्रल रेल्वे रुग्णालय, इ.एस.आय.एस.
रुग्णालय, सोमवारी पेठ, डागा
रुग्णालय गांधीबाग, तसेच मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली
स्त्री रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा
या दहा रुग्णालयांमध्ये विशेष कोल्ड वार्ड तयार करण्यात आले आहेत.
१०८ च्या
रुग्णवाहिका तसेच मनपाच्या रुग्णवाहिका सज्ज आहेत. मनपा आयुक्तांच्या
निर्देशानुसार उष्माघाताच्या रुग्णांवर त्वरीत उपचार व्हावेत यासाठी शहरातील सर्व
खासगी रुग्णालयांना देखील पत्र देण्यात आले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये
उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाल्यास त्याचा अहवाल मनपा आरोग्य विभागाला
पाठविण्याचे देखील आदेश देण्यात आले आहे.विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयांमध्ये कोल्ड वार्ड उपलब्ध नसल्यास
मनपाद्वारे सुविधेसाठी संपर्क करण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. मनपाद्वारे
विविध आजारांच्या संदर्भात तसेच उन्हाळ्यात उष्माघाताच्या संदर्भात रुग्णांचा
नोंदणी अहवाल नियमितरित्या खासगी रुग्णालयांकडून मागविण्यात येत असतो,
अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर
यांनी दिली.उष्माघाताची लक्षणे:- शरीराचे
तापमान वाढल्यास त्याला उष्माघात म्हणतात. मळमळ, उलटी, ताप, त्वचा कोरडी पडणे, थकवा, चक्कर, डोकेदुखी, मनाची स्थिती बिघडते, चिडचिड, जीभ जड होणे, जास्त घाम येणे, पायात
गोळे येणे, पोटऱ्यात वेदना, रक्तदाब
वाढणे, मानसिक बेचैनी, बेशुद्धावस्था.अशी
घ्या काळजी:- नागरिकांनी
कामाशिवाय उन्हात निघणे टाळावे.- उन्हात जाण्याची वेळ आल्यास
योग्य खबरदारी घेतली जावी.- उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे
टाळावे, भरपूर पाणी प्यावे.- स्वत:सह
इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी हलकी, पातळ
व सच्छिद्र कपडे वापरावीत बाहेर जाताना गॉगल्स, छत्री
किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा.- ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात
पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर
थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा.हे टाळा:- उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत
घराबाहेर जाणे, उन्हात कष्टाची कामे करणे टाळा.- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क
केलेल्या वाहनात ठेवू नका.- गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावे, उन्हात स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाक
करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.- मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावी, शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न
खाणे टाळावे.
No comments:
Post a Comment