नागपूर:- नागपूर
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉनपेक्षा कमी
प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई
ची सुरुवात केली आहे. सोमवार (28) रोजी शोध पथकाने 43 प्रकरणांची नोंद
करून रु.61,000/- रुपयाचा दंड वसूल
केला. हातगाडी, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 39 प्रकरणांची नोंद
करून रु.15,600/- रुपयांची वसुली
करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा
ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद
करून रु.2,800/- रुपयांची वसुली
करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोडींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हस
प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/-रुपयांची वसुली
करण्यात आली. वाहतूकीचा
रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना
करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु. 12,000/- रुपयांची वसुली
करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी
वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करुन रू.2,000/- दंड वसुल करण्यात
आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद
करून रु.3,600/- दंड वसूल करण्यात
आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतेर उपद्रव संस्था असल्यास 03 प्रकरणांची नोंद
करून रु.3,000/- दंड वसूल करण्यात आलेला
आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात
आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन
अंतर्गत मे. मंगलुरु किचन यंनी अन्नपदार्थ टाकून चेंबरमध्ये अडथळा निर्माण झाला
आणि ग्रीन ट्रिब्युनल कायद्याअंतर्गत रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला.
धरमपेठ झोन अंतर्गत मे. कैंसर
क्लिनिक सामान्य कचऱ्यासोबत जैव वैद्यकीय कचरा आढळला आणि BMW-1998 अंतर्गत रु.20,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. नरसिंग येडे यांनी वैयक्तिक
कामासाठी वाहन क्रमांक MH-CT-7773 द्वारे रस्ता अडवल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. मालगुडी कॅफे यांनी कॅफेचा
कचरा जवळच्या रस्त्याच्या पसरल्याबद्दल 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. राजा
बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल एकुण रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन मे. विजय किराणा
शॉप यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल
करण्यात आला. आसी नगर झोन अंतर्गत तुषार अनिल इंदूरकर यांनी जवळच्या फूटपाथ परिसरात केटरिंग साहित्य
पसरवल्याबद्दल 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 07 प्रकरणांची नोंद
करून रू. 65,000/- दंड वसूल केला.
No comments:
Post a Comment