मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी
जनमाहिती अधिकार कार्यशाळा संपन्न जनमाहिती अधिकारी श्री. प्रशांत
चौधरी यांनी केले मार्गदर्शन
नागपूर:- महाराष्ट्र
राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 च्या
दशकपूर्तीनिमित्ताने महापालिका
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क
दिनाच्या दशकपूर्ती निमित्त आज (ता. 28) सर्व
अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात शपथ दिली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क
कायद्यामध्ये अंतर्भूत असलेल्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जनतेला
त्वरित व पारदर्शक सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची शपथ महापालिका
आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
घेतली. तसेच झोन स्तरावर सुध्दा लोकसेवा
हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.यावेळी
उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, अधीक्षक
अभियंता श्री. मनोज तालेवार, परिवहन
व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, वैद्यकीय
आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी
अभियंता श्रीमती अश्विनी येलचेटवार, नगररचना
विभागाचे सहाय्यक संचालक श्री. ऋतुराज जाधव, सहाय्यक
आयुक्त श्री. हरीश राऊत, सहाय्यक
आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, सहाय्यक
आयुक्त श्री. प्रमोद वानखेडे, सहाय्यक
आयुक्त श्रीमती स्नेहलता
कुंभार, सहाय्यक
आयुक्त श्री. शाम कापसे, सहाय्यक
आयुक्त श्रीमती सोनम देशमुख, सामान्य
प्रशासन अधीक्षक राजकुमार मेश्राम, अतिरिक्त
वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री. डॉ. नरेंद्र बहीरवार व
महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकसेवा दिनानिमित्त कार्यशाळा:- लोकसेवा हक्क दिनाच्या निमित्ताने
महापालिकेतील जनमाहिती अधिकाऱ्यांची कार्यशाळा डॉ.
पंजाबराव देशमुख सभागृह येथे आयोजित
केली होती. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून जनमाहिती अधिकारचे
राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. प्रशांत चौधरी
यांनी मार्गदर्शन केले. यावेळी
उपायुक्त श्री.अशोक गराटे, उपायुक्त
श्री.गणेश राठोड, कार्यकारी
अभियंता अश्विनी येलचटवार सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, सहाय्यक आयुक्त श्री.
प्रमोद वानखेडे, सहाय्यक आयुक्त श्री. विजय थूल, सहाय्यक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, पारितोष कंकाळ, सहाय्यक
आयुक्त श्रीमती स्नेहलता कुंभार, सहायक
आयुक्त श्रीमती सोनम देशमुख, श्री.
सतीश चौधरी, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, उपअभियंता राजीव गौतम, सामान्य
प्रशासन अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम, अतिरिक्त
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, प्रामुख्याने
उपस्थित होते.
राज्यात महाराष्ट्र राज्य लोक सेवा हक्क आयोगाची स्थापना 28 एप्रिल 2015 रोजी
झाली असून 28 एप्रिल
हा दिवस ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात
येतो. या दशकपूर्तीचे औचित्य साधून विशेष
उपक्रम राबविले गेले. येथे सोमवारी
(ता.28) नागपूर महापालिकेतील
कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जन माहिती अधिकार कायद्याची सखोल माहिती व्हावी तसेच
जनमाहितीचा अधिकार 2005 आणि
महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत
कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यावेळी श्री. प्रशांत चौधरी अधिकारी- कर्मचारी
यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ज्या
ठिकाणी आपण काम करतो तिथे सर्वसामान्यसाठी कामे करणे गरजेचे आहे. त्याकरीता
स्वत:हून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
ज्या ठिकाणी आपण काम करतो ते आपले
कर्तव्य पार पाडण्याचे एक पवित्र स्थान आहे, असे
मानले तर देशाची प्रगती होईल, असेही
ते म्हणाले. माहिती अधिकार कायदा अंतर्गत आलेला अर्ज एकाच संस्थेच्या विविध
विभागांशी संबंधित असेल तर त्याकरीता संवाद वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी
सांगितले. याप्रसंगी त्यांनी माहितीचा अधिकारामधील विविध कलमे
, शासन निर्णंयाची माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले जनमाहिती अधिकार कायदा 2005, महाराष्ट्र राज्य
लोकसेवा हक्क कायदा 2015 हे दोन्ही कायदे जनतेच्या कल्याणाकरीता आहे. या
कायदयामुळे जनता योग्य ती माहिती प्राप्त करुन घेवु शकते. महाराष्ट्र राज्य
लोकसेवा हक्क कायदयामुळे चांगले सकारात्मकता परिणाम दिसुन आले आहे. तसेच
नागरीकांचा त्रास कमी झालेला आहे. नागरीकांना घरबसल्या अर्जांची स्थिती जाणून घेता
येते. नागरीकांना संधी उपलब्ध करुन केल्याबद्दल श्री. प्रशांत चौधरी यांनी मा.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. असेच कायदे राज्यात यावे अशी
अपेक्षा केली.
No comments:
Post a Comment