Thursday, May 29, 2025

ऑटोडीसीआर प्रणालीच्या प्रशिक्षण वर्गाला उत्तम प्रतिसाद

नागपूर:-नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने पुणे येथील सॉफ्टटेक इंजीनियर्स लिमिटेडतर्फे नागपुरातील वास्तूशिल्पकारविकासक आणि बिल्डर्सयांच्यासाठी ऑटोडीसीआर प्रणालीच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन गुरुवारी (ता.२९) करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी प्रशिक्षण वर्गाला उत्तम प्रतिसाद दिला.वनामती सभागृहात आयोजित प्रशिक्षण वर्गात मनपाच्या नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. रामचंद्र महाजनसहायक संचालक श्री. ऋतुराज जाधवसॉफ्टटेक कंपनीच्या उपाध्यक्ष श्रीमती शीतल जगतापएनएआरईडीसीओचे अध्यक्ष श्री. कुणाल पडोळेक्रेडाईचे अध्यक्ष श्री. राजमोहन शाहूआर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पराग येळणे आणि लायसन्स इंजिनिर्स अससोसिएशनचे सचिव श्री. रवींद्र नागपुरे प्रामुख्याने उपस्थित होते.मार्गदर्शन करतांना नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. रामचंद्र महाजन यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य शासनाने वर्तमान बीपीएमएस प्रणालीसोबत ऑटोडीसीआर प्रणाली आणली आहे. मुंबईतील नगरपालिका प्रशासन संचालकांनी आणि पुण्यातील नगररचना संचालकांसह राज्यभरातील इमारत योजना मंजुरीसाठी 
समांतर प्रणाली म्हणून ऑटोडीसीआर प्रणाली वापरण्याची मुभा वास्तूविशारदअभियंता आणि विकासकांना दिली आहे. नागपूरसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्या जात आहेत. विकासकांना सुलभतेने परवानगी मिळण्याकरिता शासनाचा प्रयत्न आहे. हे वर्तमान प्रणाली आणि नवीन प्रणालीचा वापर करू शकतात. मनपाच्या या प्रयत्नाला विकासकांचा आणि वास्तूविशारदांचा सकारात्मक प्रतिसाद प्राप्त होईल,असा विश्वास श्री. महाजन यांनी व्यक्त केला.यावेळी सॉफ्टटेक कंपनीच्या उपाध्यक्ष श्रीमती शीतल जगताप यांनी ऑटोडीसीआर प्रणाली बद्दल सादरीकरण करताना सांगितले की, हे सॉफ्टवेअर सध्या देशातील १८ राज्यांमधील १५०० शहरातील ४ लाखांपेक्षा जास्त नागरिक वापरत आहेत. या प्रणालीमुळे विकासकांना मोठा फायदा होत आहे. यापूर्वी  याप्रणालीचा प्रयोग पुणे आणि नागपूर येथे करण्यात आला होता. श्री. गणेश मस्के यांनी उपस्थितांना प्रणालीचे प्रशिक्षण दिले, तसेच विकासकांच्या प्रश्नांचे निरसन केले. याप्रसंगी नगररचना विभागाचे श्री. मंगेश गेडामविद्युत ढेंगळेआनंद मोखाडेविवेक तेलरांधे आणि इतर उपस्थित होते. 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 38 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 
नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर,  थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (29) रोजी शोध पथकाने 38 प्रकरणांची नोंद करून 55,200/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया,  स्टॉल्स,  पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 22,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 14,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.





उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 2,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून 4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.  तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. अवन्ति इंस्टिट्यूट ऑफ कार्डियोलॉजी प्रा. लि. यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु. 10,000/- चे दंड वसूल करण्यात आले. तसेच गोपाल मेहाडीया यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत मे. स्पाइसी तड़का यांनी हॉटेलचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. धंतोली झोन अंतर्गत मे, फ्लोरेंस प्री. स्कूल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी असे एकुण रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. राजू किराणा स्टोअर्स व मे. अम्बे किराण स्टोर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. हटवार ट्रेडर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मुस्तफा अहसन यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रु. 5,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 08 प्रकरणांची नोंद करून रू. 45,000/- दंड वसूल केला.  

Thursday, May 22, 2025

मनपा शाळेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश, गणवेश आणि पाठ्यपुस्तके,मनपा शाळेत 2025-26 च्या शैक्षणिक सत्राकरीता प्रवेश देणे सुरु, मराठी, हिंदी, उर्दू सह इंग्रजी माध्यमांचे शिक्षण

नागपूर:- नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये सन 2025-26 सत्रासाठी नर्सरी आणि पहिल्या वर्गापासून प्रवेश देणे सुरु झाले असून मनपा शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे.  तसेच मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तके व इतर सुविधा दिल्या जात आहे. या वैशिष्ट्यामुळे महापालिकेच्या मराठीहिंदी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. मनपाच्या शाळांमध्ये मराठीहिंदीउर्दूमाध्यमांच्यासह 11 शाळांमध्ये सेमी इंग्रजी   7 शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळत आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी.यांच्या मार्गदर्शनात मनपा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ होत आहे. या गुणवत्ता वाढीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मनपा विद्यार्थीची परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेण्याची संख्या वाढली आहे. अशी माहिती शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी दिली.मनपा शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळापीएम श्री शाळामिशन नवचेतना आणि स्मार्ट सिटीच्या योजनामुळे महापालिकेच्या शाळेच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे. या योजना अंतर्गत वर्ग 1 ते 8 या वर्गातील मुलांना शासनाकडून मोफत गणवेशपाठ्यपुस्तके  इतर सुविधा दिले जात आहे. महापालिकेतर्फे बालवाडी, वर्ग 9 ते 12 यातील विद्यार्थांना मोफत प्रवेश व गणेवशपाठ्यपुस्तके इतर सुविधा 
दिली जात आहे. मनपा शाळेतील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे याकरीता उपस्थिती 80च्यावर असलेल्या मुलींना 2 टप्प्यात प्रत्येकी 2 हजार याप्रमाणे एकूण हजार रुपये उपस्थिती भत्ता,  दूरवरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलविद्यार्थ्यांना मोफत बस पास सुविधा उपलब्ध होत असते.मनपा शाळेत प्रशिक्षित असे दर्जेदार शिक्षक असल्याने दहावीच्या निकालातही वाढ झाली आहे. याशिवाय शैक्षणिक कालावधीत विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समास्यापासून मुक्त होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक दर्जात वाढ करण्यासाठी  विविध योजनेअंतर्गत मानसशास्त्रज्ञाकडून अभ्यास कसा करायचा आणि परीक्षेत उत्तरे सोडवायचे याचे धडे सुद्धा मिळू लागले आहे.यामुळे खाजगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकेच्या शाळांनी आता एक पाऊल समोर टाकले आहे. मिशन नवचेतनामुळे मनपा शाळांचा इमारती आता देखण्या झाल्या तसेच भिंती बोलक्या झाल्या आहेत.सध्या नागपूर महापालिकेतर्फे एकूण 114 शाळा संचालित केले जात आहे. यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमांच्या 27 शाळा हिंदी माध्यमांच्या 37 शाळाउर्दू-18 आणि  इंग्रजी मध्यमाच्या 7 अशा 86 शाळांचा समावेश आहे.  याशिवाय माध्यमिक शाळांमध्ये मराठी माध्यम 7, हिंदी माध्यम-11, उर्दू माध्यम- 9 व इंग्रजी माध्यमाची एक शाळा अशा 28 शाळा आहेत. तर चार कनिष्ठ महाविद्यालयात कलावाणिज्य व विज्ञानाचे शिक्षण दिले जाते.तर महापालिकेतर्फे इंग्रजी माध्यमाची जी.एम.बनातवाला शाळामध्ये नर्सरी ते  दहावी पर्यंत दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने शाळेत प्रवेश 

घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तके  दिले जाणार आहे. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती  शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी दिली. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचे शाळेत स्वागत करण्यात येणार आहे. शाळांची स्वच्छता करणेवर्गाची सजावट करणेतसेच मुलांचे स्वागत वाजत गाजत करणेयासह गुलाब पुष्प देऊन विविध रंगांचे फुगे उडवून आणि मिठाई देऊन करण्यात येणार आहे.शाळेमध्ये उपलब्ध मोफत-सुविधा:- मोफत प्रवेश, 12 वी पर्यंत मोफत शिक्षण,मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तके,मोफत गणवेश (२ नग), जोडे, मोजे (वर्ग 9 ते 12 व बालवाडी),पोषण आहार (आठवी पर्यंत),दूरवरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल,शाळेत जाणे-येणे करीता मोफत बस पास,दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता (प्रमाणपत्रानुसार),80 टक्के उपस्थित असलेल्या मुलींसाठी प्रतीवर्ष 4 हजार रुपये आर्थिक मदत (उपस्थिती भत्ता),11 वी ते 12 वी हुशार विद्यार्थ्यांकरीता सुपर 75 योजना,दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता जेईई, नीट प्रशिक्षण मिळावे याकरिता नामांकित क्लासेसमध्ये मोफत प्रशिक्षण,पाचव्या वर्गापासून शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ,सी.सी.टी.व्ही सुरक्षा/डीजीटल बोर्ड द्वारे शिक्षण शाळेची वैशिष्ट्य:- डिजिटल क्लासरूम,स्टेम लॅब,आधुनिक सायन्स लॅब,मध्यान भोजन (मिड डे मील) योजना,शाळेचे प्रशस्त मैदान,किचन गार्डन,विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी क्रीडा आणि संगीत वर्ग,सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मोफत उपचार,9 वी 10 वी विद्यार्थ्यांकरीता ऑटोमोबाईल टेक्निशियन अभ्यासक्रम,मानसिक स्वास्थ सुदृढ करण्यासाठी मानसोपचार/ मानसशास्त्रज्ञाकडून तपासणी आणि मार्गदर्शन,विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेले क्रीडा शिक्षक  दरवर्षी शिक्षण उत्सव समारंभ # प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे:-जन्म दाखला,आधार कार्ड,विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला,मागील वर्षाचे गुणपत्रक (मार्कशिट),पासपोर्ट आकाराचा फोटो.

मतीमंद घटकातील दिव्यांग शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद,शिबीराच्या पहिल्याच दिवशी 125 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

नागपूर:-  नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे मनपा मुख्यालयात गुरुवार, 22 मे पासून आयोजित  दोन दिवसीय मतिमंद घटकातील दिव्यांगांना प्रतिमहा 500 रुपये निवार्ह भत्ता शिबिराला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 125 दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केली.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अति. आयुक्त श्रीमती वैष्णवी बी.यांच्या मार्गदर्शनाखाली समाज विकास विभागाअंतर्गंत मतिमंदसेरेबल पाल्सीऑटिझमविशेष विकलांगबहु विकलांग प्रवर्गातील दिव्यांगांकरिता निर्वाह भत्ता अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे.अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी.यांनी मतिमंद घटकातील दिव्यांगांना प्रतिमहा 500 रुपये निवार्ह भत्ता शिबीराला भेट दिली. नागरीकांशी चर्चा केली आणि मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाज विकास उपायुक्त डॉ. रंजना लाडेसमाज विकास विभागातील श्री. विनीत टेंभुर्णेश्रीमती नूतन मोरेश्री. सुरेंद्र सरदारेश्री. चंद्रशेखर 
पाचोरेसोमय्या शेख आदी उपस्थित होते.मतीमंद प्रवर्गातील योजनांपासून शहरातील कुणीही दिव्यांग वंचित राहू नये यासाठी महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत गुरुवार 22 मेपासून दोन दिवसीय शिबीर महापालिका मुख्यालयात आयोजित केले आहे. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांतर्फे शिबीरात लाभार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. उद्या शुक्रवार 23 मे रोजी मनपा मुख्यालयात मतिमंद घटकातील दिव्यांगाना प्रतिमहा 500 रुपये निर्वाह भत्ता शिबीर आयोजित करण्यात येणार असून लाभार्थी किंवा त्यांच्या कौटुंबिक सदस्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबीर स्थळी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.

मिनीमातानगर येथे साकार होणार ३० बेडचे मनपा रुग्णालय,यूसीएचसी इमारतीच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

 नागपूर:- नागपूर महानगरपालिकेद्वारे मिनीमाता नगर येथे नवीन नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र (यूसीएचसी) साकारले जात आहे. या ३० बेडच्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम कार्य सुरु असून गुरुवारी (ता.२२) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी कामाची पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंतमुख्य अभियंता श्री. मनोज तालेवारवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरकार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणेलकडगंज झोनचे सहायक आयुक्त श्री. विजय थूलउपअभियंता श्री. राजीव गौतमश्री. देवचंद काकडेझोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीनशहर लेखा व्यवस्थापक श्री. नीलेश बाभरेझोनचे शाखा अभियंता श्री. जगदीश बावनकुळेकंत्राटदार श्री. संजय मेडपल्लीवार आदी उपस्थि‍त होते.मिनीमानगर येथे मनपा रुग्णालयाच्या दोन माळ्याच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. बांधकामाशी संबंधित प्रलंबित कार्य तसेच उर्वरित कार्य लवकरात 
लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. फर्निचररुग्णालयातील इतर कामेबाहेरील परिसरातील कामे याकडे देखील लक्ष दिले जावेपार्कींगरुग्णालयाच्या प्रवेशद्वारापुढील परिसर याची देखील व्यवस्था योग्य असावी त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी विभागाला दिले. मनपा आरोग्य विभागाद्वारे या रुग्णालयाचे संचालन केले जाणार आहे. रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि उपकरणांसाठी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावायाबाबत आयुक्तांनी आरोग्य विभागाला निर्देशित केले. मिनीमाता नगर येथील नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र (यूसीएचसी) येथे ३० खाटांची व्यवस्था असणार आहे. 

या रुग्णालयात ओपीडीआयपीडी ची व्यवस्था असेल. नवजात शिशूबालरोगस्त्रीरोगनेत्रदंत यासह २४ तास आपात्कालीन सेवारेडिओलॉजी सेवाशस्त्रक्रिया या सर्व सुविधा या रुग्णालयामधून दिल्या जाणार आहेत. मनपाचे नवे रुग्णालय सुरु करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व बाबींची लवकरात लवकर पूर्तता करुन पुढील कार्यवाही करण्याचे यावेळी मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी निर्देश दिले आहेत.

'झुडपी ' संदर्भातील 'सर्वोच्च' आदेशामुळे विकासातील अडथळा दूर होणार!

आज सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगलासंदर्भात दिलेला आदेश हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दूरदृष्टीपूर्ण आहेया आदेशामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासोबतच विकासाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या अनाठायी अडचणी दूर होतील.महाराष्ट्र शासनाने या मुद्द्यावर सातत्याने न्यायालयात प्रभावी मांडणी केलीविशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर दाखवलेली तातडीभूमिका आणि दूरदृष्टी यांचे मनःपूर्वक कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत्यांच्या नेतृत्वाखाली शासनाने झुडपी जंगलांबाबतची वस्तुनिष्ठ भूमिका मांडूनपर्यावरणाचा तोल राखत विकासाला गती देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.हा निर्णय राज्यातील अनेक विकास प्रकल्पांना नवी चालना देईलनागपूरसह विदर्भातील झुडपी जंगल म्हणून ओळखल्या गेलेल्या भूभागात विकासाच्या संधी निर्माण होतीलतसेच स्थानिक लोकांना रोजगार  पायाभूत सुविधांचाही लाभ मिळेलनागपूर शहरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघातील अंबिका नगरजयताळा,  एकात्मता नगरतकीया धंतोलीसरस्वती नगरजयताळा दक्षिण पश्चिम तसेच पश्चिम नागपुरातील कृष्णा नगरआझाद नगरसुरेंद्रागढमानवता नगरआदिवासी नगरगधेघाट छावणीगोवा कॉलनीनवीन फुटाळा वस्ती (उत्तर), यासारख्या अनेक झोपडपट्टीवासीयांना पट्टे मिळण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे मोकळा झाला आहे.या ऐतिहासिक निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवनविभाग आणि संपूर्ण प्रशासनाचे मनापासून आभार मानतो.


{  
आमदार संदीप जोशी }

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...