Thursday, May 22, 2025

मनपा शाळेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश, गणवेश आणि पाठ्यपुस्तके,मनपा शाळेत 2025-26 च्या शैक्षणिक सत्राकरीता प्रवेश देणे सुरु, मराठी, हिंदी, उर्दू सह इंग्रजी माध्यमांचे शिक्षण

नागपूर:- नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये सन 2025-26 सत्रासाठी नर्सरी आणि पहिल्या वर्गापासून प्रवेश देणे सुरु झाले असून मनपा शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे.  तसेच मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तके व इतर सुविधा दिल्या जात आहे. या वैशिष्ट्यामुळे महापालिकेच्या मराठीहिंदी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. मनपाच्या शाळांमध्ये मराठीहिंदीउर्दूमाध्यमांच्यासह 11 शाळांमध्ये सेमी इंग्रजी   7 शाळांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळत आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी.यांच्या मार्गदर्शनात मनपा शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ होत आहे. या गुणवत्ता वाढीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मनपा विद्यार्थीची परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेण्याची संख्या वाढली आहे. अशी माहिती शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी दिली.मनपा शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळापीएम श्री शाळामिशन नवचेतना आणि स्मार्ट सिटीच्या योजनामुळे महापालिकेच्या शाळेच्या गुणवत्तेत वाढ झाली आहे. या योजना अंतर्गत वर्ग 1 ते 8 या वर्गातील मुलांना शासनाकडून मोफत गणवेशपाठ्यपुस्तके  इतर सुविधा दिले जात आहे. महापालिकेतर्फे बालवाडी, वर्ग 9 ते 12 यातील विद्यार्थांना मोफत प्रवेश व गणेवशपाठ्यपुस्तके इतर सुविधा 
दिली जात आहे. मनपा शाळेतील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे याकरीता उपस्थिती 80च्यावर असलेल्या मुलींना 2 टप्प्यात प्रत्येकी 2 हजार याप्रमाणे एकूण हजार रुपये उपस्थिती भत्ता,  दूरवरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलविद्यार्थ्यांना मोफत बस पास सुविधा उपलब्ध होत असते.मनपा शाळेत प्रशिक्षित असे दर्जेदार शिक्षक असल्याने दहावीच्या निकालातही वाढ झाली आहे. याशिवाय शैक्षणिक कालावधीत विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समास्यापासून मुक्त होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक दर्जात वाढ करण्यासाठी  विविध योजनेअंतर्गत मानसशास्त्रज्ञाकडून अभ्यास कसा करायचा आणि परीक्षेत उत्तरे सोडवायचे याचे धडे सुद्धा मिळू लागले आहे.यामुळे खाजगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकेच्या शाळांनी आता एक पाऊल समोर टाकले आहे. मिशन नवचेतनामुळे मनपा शाळांचा इमारती आता देखण्या झाल्या तसेच भिंती बोलक्या झाल्या आहेत.सध्या नागपूर महापालिकेतर्फे एकूण 114 शाळा संचालित केले जात आहे. यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमांच्या 27 शाळा हिंदी माध्यमांच्या 37 शाळाउर्दू-18 आणि  इंग्रजी मध्यमाच्या 7 अशा 86 शाळांचा समावेश आहे.  याशिवाय माध्यमिक शाळांमध्ये मराठी माध्यम 7, हिंदी माध्यम-11, उर्दू माध्यम- 9 व इंग्रजी माध्यमाची एक शाळा अशा 28 शाळा आहेत. तर चार कनिष्ठ महाविद्यालयात कलावाणिज्य व विज्ञानाचे शिक्षण दिले जाते.तर महापालिकेतर्फे इंग्रजी माध्यमाची जी.एम.बनातवाला शाळामध्ये नर्सरी ते  दहावी पर्यंत दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने शाळेत प्रवेश 

घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तके  दिले जाणार आहे. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती  शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी दिली. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचे शाळेत स्वागत करण्यात येणार आहे. शाळांची स्वच्छता करणेवर्गाची सजावट करणेतसेच मुलांचे स्वागत वाजत गाजत करणेयासह गुलाब पुष्प देऊन विविध रंगांचे फुगे उडवून आणि मिठाई देऊन करण्यात येणार आहे.शाळेमध्ये उपलब्ध मोफत-सुविधा:- मोफत प्रवेश, 12 वी पर्यंत मोफत शिक्षण,मोफत शैक्षणिक पाठ्यपुस्तके,मोफत गणवेश (२ नग), जोडे, मोजे (वर्ग 9 ते 12 व बालवाडी),पोषण आहार (आठवी पर्यंत),दूरवरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल,शाळेत जाणे-येणे करीता मोफत बस पास,दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता (प्रमाणपत्रानुसार),80 टक्के उपस्थित असलेल्या मुलींसाठी प्रतीवर्ष 4 हजार रुपये आर्थिक मदत (उपस्थिती भत्ता),11 वी ते 12 वी हुशार विद्यार्थ्यांकरीता सुपर 75 योजना,दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता जेईई, नीट प्रशिक्षण मिळावे याकरिता नामांकित क्लासेसमध्ये मोफत प्रशिक्षण,पाचव्या वर्गापासून शासकीय शिष्यवृत्तीचा लाभ,सी.सी.टी.व्ही सुरक्षा/डीजीटल बोर्ड द्वारे शिक्षण शाळेची वैशिष्ट्य:- डिजिटल क्लासरूम,स्टेम लॅब,आधुनिक सायन्स लॅब,मध्यान भोजन (मिड डे मील) योजना,शाळेचे प्रशस्त मैदान,किचन गार्डन,विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी क्रीडा आणि संगीत वर्ग,सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मोफत उपचार,9 वी 10 वी विद्यार्थ्यांकरीता ऑटोमोबाईल टेक्निशियन अभ्यासक्रम,मानसिक स्वास्थ सुदृढ करण्यासाठी मानसोपचार/ मानसशास्त्रज्ञाकडून तपासणी आणि मार्गदर्शन,विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असलेले क्रीडा शिक्षक  दरवर्षी शिक्षण उत्सव समारंभ # प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे:-जन्म दाखला,आधार कार्ड,विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला,मागील वर्षाचे गुणपत्रक (मार्कशिट),पासपोर्ट आकाराचा फोटो.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...