नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे मनपा मुख्यालयात
गुरुवार, 22 मे
पासून आयोजित दोन
दिवसीय मतिमंद
घटकातील दिव्यांगांना प्रतिमहा 500 रुपये निवार्ह भत्ता शिबिराला लाभार्थ्यांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 125 दिव्यांग लाभार्थ्यांनी
नोंदणी केली.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अति. आयुक्त श्रीमती
वैष्णवी बी., यांच्या
मार्गदर्शनाखाली समाज विकास विभागाअंतर्गंत मतिमंद, सेरेबल पाल्सी, ऑटिझम, विशेष
विकलांग, बहु
विकलांग प्रवर्गातील दिव्यांगांकरिता निर्वाह भत्ता अर्थसहाय्य योजना राबविण्यात
येत आहे.अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., यांनी मतिमंद
घटकातील दिव्यांगांना प्रतिमहा 500 रुपये निवार्ह भत्ता शिबीराला भेट
दिली. नागरीकांशी चर्चा केली आणि मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाज विकास उपायुक्त
डॉ. रंजना लाडे, समाज
विकास विभागातील श्री. विनीत टेंभुर्णे, श्रीमती नूतन मोरे, श्री.
सुरेंद्र सरदारे, श्री.
चंद्रशेखर
पाचोरे, सोमय्या
शेख आदी उपस्थित होते.मतीमंद प्रवर्गातील योजनांपासून शहरातील कुणीही दिव्यांग
वंचित राहू नये यासाठी महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत गुरुवार 22 मेपासून
दोन दिवसीय शिबीर महापालिका मुख्यालयात आयोजित केले आहे. यावेळी
मनपा कर्मचाऱ्यांतर्फे शिबीरात लाभार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याचे
प्रशिक्षण देण्यात आले. उद्या शुक्रवार 23 मे रोजी मनपा मुख्यालयात मतिमंद घटकातील दिव्यांगाना प्रतिमहा 500 रुपये निर्वाह भत्ता शिबीर आयोजित करण्यात येणार असून लाभार्थी किंवा त्यांच्या
कौटुंबिक सदस्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबीर स्थळी उपस्थित राहून लाभ घेण्याचे
आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले
आहे.
No comments:
Post a Comment