नागपूर:- नागपूर
महानगरपालिकेद्वारे मिनीमाता नगर येथे नवीन नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र
(यूसीएचसी) साकारले जात आहे. या ३० बेडच्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम कार्य
सुरु असून गुरुवारी (ता.२२) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी
कामाची पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त श्री.
विजय थूल, उपअभियंता श्री. राजीव गौतम, श्री. देवचंद काकडे, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, शहर लेखा व्यवस्थापक श्री. नीलेश
बाभरे, झोनचे शाखा अभियंता श्री. जगदीश बावनकुळे, कंत्राटदार श्री. संजय मेडपल्लीवार
आदी उपस्थित होते.मिनीमानगर येथे मनपा रुग्णालयाच्या दोन माळ्याच्या इमारतीचे बांधकाम करण्यात
येत आहे. बांधकामाशी संबंधित प्रलंबित कार्य तसेच उर्वरित कार्य लवकरात
लवकर पूर्ण
करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. फर्निचर, रुग्णालयातील
इतर कामे, बाहेरील परिसरातील कामे याकडे देखील लक्ष
दिले जावे, पार्कींग, रुग्णालयाच्या
प्रवेशद्वारापुढील परिसर याची देखील व्यवस्था योग्य असावी त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही
करण्याचेही निर्देश त्यांनी विभागाला दिले. मनपा आरोग्य विभागाद्वारे या
रुग्णालयाचे संचालन केले जाणार आहे. रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि
उपकरणांसाठी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा, याबाबत आयुक्तांनी आरोग्य विभागाला निर्देशित केले. मिनीमाता नगर येथील नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र
(यूसीएचसी) येथे ३० खाटांची व्यवस्था असणार आहे.
या रुग्णालयात ओपीडी, आयपीडी ची व्यवस्था असेल. नवजात शिशू, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र, दंत
यासह २४ तास आपात्कालीन सेवा, रेडिओलॉजी सेवा, शस्त्रक्रिया या सर्व सुविधा या रुग्णालयामधून दिल्या जाणार आहेत. मनपाचे नवे रुग्णालय सुरु करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्य पूर्ण
करण्याच्या दृष्टीने सर्व बाबींची लवकरात लवकर पूर्तता करुन पुढील कार्यवाही
करण्याचे यावेळी मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी निर्देश दिले
आहेत.
No comments:
Post a Comment