Thursday, May 29, 2025

ऑटोडीसीआर प्रणालीच्या प्रशिक्षण वर्गाला उत्तम प्रतिसाद

नागपूर:-नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने पुणे येथील सॉफ्टटेक इंजीनियर्स लिमिटेडतर्फे नागपुरातील वास्तूशिल्पकारविकासक आणि बिल्डर्सयांच्यासाठी ऑटोडीसीआर प्रणालीच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन गुरुवारी (ता.२९) करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी प्रशिक्षण वर्गाला उत्तम प्रतिसाद दिला.वनामती सभागृहात आयोजित प्रशिक्षण वर्गात मनपाच्या नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. रामचंद्र महाजनसहायक संचालक श्री. ऋतुराज जाधवसॉफ्टटेक कंपनीच्या उपाध्यक्ष श्रीमती शीतल जगतापएनएआरईडीसीओचे अध्यक्ष श्री. कुणाल पडोळेक्रेडाईचे अध्यक्ष श्री. राजमोहन शाहूआर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पराग येळणे आणि लायसन्स इंजिनिर्स अससोसिएशनचे सचिव श्री. रवींद्र नागपुरे प्रामुख्याने उपस्थित होते.मार्गदर्शन करतांना नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. रामचंद्र महाजन यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य शासनाने वर्तमान बीपीएमएस प्रणालीसोबत ऑटोडीसीआर प्रणाली आणली आहे. मुंबईतील नगरपालिका प्रशासन संचालकांनी आणि पुण्यातील नगररचना संचालकांसह राज्यभरातील इमारत योजना मंजुरीसाठी 
समांतर प्रणाली म्हणून ऑटोडीसीआर प्रणाली वापरण्याची मुभा वास्तूविशारदअभियंता आणि विकासकांना दिली आहे. नागपूरसह राज्यभरात मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्या जात आहेत. विकासकांना सुलभतेने परवानगी मिळण्याकरिता शासनाचा प्रयत्न आहे. हे वर्तमान प्रणाली आणि नवीन प्रणालीचा वापर करू शकतात. मनपाच्या या प्रयत्नाला विकासकांचा आणि वास्तूविशारदांचा सकारात्मक प्रतिसाद प्राप्त होईल,असा विश्वास श्री. महाजन यांनी व्यक्त केला.यावेळी सॉफ्टटेक कंपनीच्या उपाध्यक्ष श्रीमती शीतल जगताप यांनी ऑटोडीसीआर प्रणाली बद्दल सादरीकरण करताना सांगितले की, हे सॉफ्टवेअर सध्या देशातील १८ राज्यांमधील १५०० शहरातील ४ लाखांपेक्षा जास्त नागरिक वापरत आहेत. या प्रणालीमुळे विकासकांना मोठा फायदा होत आहे. यापूर्वी  याप्रणालीचा प्रयोग पुणे आणि नागपूर येथे करण्यात आला होता. श्री. गणेश मस्के यांनी उपस्थितांना प्रणालीचे प्रशिक्षण दिले, तसेच विकासकांच्या प्रश्नांचे निरसन केले. याप्रसंगी नगररचना विभागाचे श्री. मंगेश गेडामविद्युत ढेंगळेआनंद मोखाडेविवेक तेलरांधे आणि इतर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...