Thursday, May 22, 2025

मतीमंद घटकातील दिव्यांग शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद,शिबीराच्या पहिल्याच दिवशी 125 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

नागपूर:-  नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे मनपा मुख्यालयात गुरुवार, 22 मे पासून आयोजित  दोन दिवसीय मतिमंद घटकातील दिव्यांगांना प्रतिमहा 500 रुपये निवार्ह भत्ता शिबिराला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 125 दिव्यांग लाभार्थ्यांनी नोंदणी केली.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अति. आयुक्त श्रीमती वैष्णवी बी.यांच्या मार्गदर्शनाखाली समाज विकास विभागाअंतर्गंत मतिमंदसेरेबल पाल्सीऑटिझमविशेष विकलांगबहु विकलांग प्रवर्गातील दिव्यांगांकरिता निर्वाह भत्ता अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे.अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी.यांनी मतिमंद घटकातील दिव्यांगांना प्रतिमहा 500 रुपये निवार्ह भत्ता शिबीराला भेट दिली. नागरीकांशी चर्चा केली आणि मार्गदर्शन केले. याप्रसंगी समाज विकास उपायुक्त डॉ. रंजना लाडेसमाज विकास विभागातील श्री. विनीत टेंभुर्णेश्रीमती नूतन मोरेश्री. सुरेंद्र सरदारेश्री. चंद्रशेखर 
पाचोरेसोमय्या शेख आदी उपस्थित होते.मतीमंद प्रवर्गातील योजनांपासून शहरातील कुणीही दिव्यांग वंचित राहू नये यासाठी महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत गुरुवार 22 मेपासून दोन दिवसीय शिबीर महापालिका मुख्यालयात आयोजित केले आहे. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांतर्फे शिबीरात लाभार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. उद्या शुक्रवार 23 मे रोजी मनपा मुख्यालयात मतिमंद घटकातील दिव्यांगाना प्रतिमहा 500 रुपये निर्वाह भत्ता शिबीर आयोजित करण्यात येणार असून लाभार्थी किंवा त्यांच्या कौटुंबिक सदस्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबीर स्थळी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.

मिनीमातानगर येथे साकार होणार ३० बेडचे मनपा रुग्णालय,यूसीएचसी इमारतीच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

 नागपूर:- नागपूर महानगरपालिकेद्वारे मिनीमाता नगर येथे नवीन नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र (यूसीएचसी) साकारले जात आहे. या ३० बेडच्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम कार्य सुरु असून गुरुवारी (ता.२२) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी कामाची पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंतमुख्य अभियंता श्री. मनोज तालेवारवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरकार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणेलकडगंज झोनचे सहायक आयुक्त श्री. विजय थूलउपअभियंता श्री. राजीव गौतमश्री. देवचंद काकडेझोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीनशहर लेखा व्यवस्थापक श्री. नीलेश बाभरेझोनचे शाखा अभियंता श्री. जगदीश बावनकुळेकंत्राटदार श्री. संजय मेडपल्लीवार आदी उपस्थि‍त होते.मिनीमानगर येथे मनपा रुग्णालयाच्या दोन माळ्याच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. बांधकामाशी संबंधित प्रलंबित कार्य तसेच उर्वरित कार्य लवकरात 
लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. फर्निचररुग्णालयातील इतर कामेबाहेरील परिसरातील कामे याकडे देखील लक्ष दिले जावेपार्कींगरुग्णालयाच्या प्रवेशद्वारापुढील परिसर याची देखील व्यवस्था योग्य असावी त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी विभागाला दिले. मनपा आरोग्य विभागाद्वारे या रुग्णालयाचे संचालन केले जाणार आहे. रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि उपकरणांसाठी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावायाबाबत आयुक्तांनी आरोग्य विभागाला निर्देशित केले. मिनीमाता नगर येथील नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र (यूसीएचसी) येथे ३० खाटांची व्यवस्था असणार आहे. 

या रुग्णालयात ओपीडीआयपीडी ची व्यवस्था असेल. नवजात शिशूबालरोगस्त्रीरोगनेत्रदंत यासह २४ तास आपात्कालीन सेवारेडिओलॉजी सेवाशस्त्रक्रिया या सर्व सुविधा या रुग्णालयामधून दिल्या जाणार आहेत. मनपाचे नवे रुग्णालय सुरु करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व बाबींची लवकरात लवकर पूर्तता करुन पुढील कार्यवाही करण्याचे यावेळी मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी निर्देश दिले आहेत.

'झुडपी ' संदर्भातील 'सर्वोच्च' आदेशामुळे विकासातील अडथळा दूर होणार!

आज सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगलासंदर्भात दिलेला आदेश हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दूरदृष्टीपूर्ण आहेया आदेशामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासोबतच विकासाच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या अनाठायी अडचणी दूर होतील.महाराष्ट्र शासनाने या मुद्द्यावर सातत्याने न्यायालयात प्रभावी मांडणी केलीविशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर दाखवलेली तातडीभूमिका आणि दूरदृष्टी यांचे मनःपूर्वक कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत्यांच्या नेतृत्वाखाली शासनाने झुडपी जंगलांबाबतची वस्तुनिष्ठ भूमिका मांडूनपर्यावरणाचा तोल राखत विकासाला गती देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.हा निर्णय राज्यातील अनेक विकास प्रकल्पांना नवी चालना देईलनागपूरसह विदर्भातील झुडपी जंगल म्हणून ओळखल्या गेलेल्या भूभागात विकासाच्या संधी निर्माण होतीलतसेच स्थानिक लोकांना रोजगार  पायाभूत सुविधांचाही लाभ मिळेलनागपूर शहरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघातील अंबिका नगरजयताळा,  एकात्मता नगरतकीया धंतोलीसरस्वती नगरजयताळा दक्षिण पश्चिम तसेच पश्चिम नागपुरातील कृष्णा नगरआझाद नगरसुरेंद्रागढमानवता नगरआदिवासी नगरगधेघाट छावणीगोवा कॉलनीनवीन फुटाळा वस्ती (उत्तर), यासारख्या अनेक झोपडपट्टीवासीयांना पट्टे मिळण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे मोकळा झाला आहे.या ऐतिहासिक निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवनविभाग आणि संपूर्ण प्रशासनाचे मनापासून आभार मानतो.


{  
आमदार संदीप जोशी }

Tuesday, May 20, 2025

पीएम श्री मनपा शाळा’ ठरणार गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र

नागपूर:- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'पीएम श्रीस्कूल (Pradhan Mantri Schools for Rising India) योजनेसाठी महापालिकेच्या दोन शाळाची निवड झाली आहे. यात नागपूर महानगरपालिकेच्या संजयनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा आणि लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक मनपा शाळा या  दोन शाळांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत महापालिका शाळांचा शैक्षणिक व परिसर कायापालाट झाला असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे.केंद्र सरकारने सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि सरकारी शाळांना आधुनिक बनवण्यासाठी 2022 वर्षी पीएम श्री स्कूल योजना’ देशभरात सुरू केली आहे. पीएम श्री स्कूल योजनेमधून विकसित झालेल्या शाळा इतर सामान्य शाळांपेक्षा वेगळ्या ठरत आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील काही निवडक शाळा आधुनिक शिक्षण सुविधांनी समृद्ध करून आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या आहेत.'पीएम श्रीशाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासगुणवत्तापूर्ण शिक्षणहरित शाळा संकल्पना आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP 2020) प्रभावी अंमलबजावणी या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. या योजनेत नागपूर महापालिकेच्या डिप्टी सिग्नल भागातील संजयनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा आणि हनुमान नगरातील लाल 
बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळांची निवड झाली आहे.या दोन्ही शाळांना आता उत्कृष्ट शैक्षणिक सुविधाआधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. या योजनेंतर्गत डिजिटल शिक्षण संसाधनेशिक्षकांना प्रशिक्षण. विद्यार्थ्यांसाठी वर्ग खोल्या अधिक चांगल्या पद्धतीने बनविण्यात आल्या आहेत. या शिवाय प्रयोगशाळेची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेत मुलांना विविध विषयांचे व्यवहारिक ज्ञान दिले जात आहे.अंध विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.मनपाच्या संजयनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा आणि लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा  या दोन्ही  शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावण्यास पीएम श्री शाळा योजनामुळे मोठी मदत झाली आहे. ही निवड मनपाच्या शाळेतील शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा  ठरत आहे. याकरीता केंद्र सरकारकडून समग्र शिक्षण अंतर्गत  निधी देण्यात आले आहे.पीएम श्री शाळेसोबत महापालिकेच्या इतर केजी पासून ते कनिष्ठ महाविद्यालयाचा गुणवत्तापूर्ण शैक्षणिक विकास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ लागला आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी विविध सूचना करून शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संजयनगर आणि लाल बहादूर शास्त्री मनपा हिंदी शाळेंचा शैक्षणिक आलेखात वाढ:- संजयनगर मनपा हिंदी शाळेची निवड महाराष्ट्र शासनाच्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ 2020 मध्ये निवड  होताच 
शाळेचा शैक्षणिक आलेख वाढू लागला आहे. आता पीएम श्री शाळा योजनेंतअतर्गत संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा आणि लाल बहादूर शास्त्री हिंदी  लाल बहादूर शास्त्री हिंदी शाळेची निवड झाली आहे. शाळेतील विद्यार्थी दहावी बोर्डांच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. गुणवत्ता यादीत मनपा शाळेतून हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेत शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने 85 टक्केच्यावर अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. या दोन्ही शाळांबरोबर मनपाच्या सर्व शाळांच्या गुणवत्तामध्ये वाढ झाली आहे अशी माहिती मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी दिली.पीएम श्री शाळा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना:-पीएम श्री शाळांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकरिता शाळेतील विद्यार्थ्यांकरीता क्षेत्रीय भेटीचे आयोजन करणेराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरीय प्रख्यात तज्ञ व्यक्तीचे शाळास्तरावर विविध विषयांचे व्याख्यान व मार्गदर्शनेशाळा स्तरावर तज्ञ व्यक्तीद्वारे योगाक्रीडा प्रशिक्षणआरोग्य शिबिरएलईडी   लाईटहरित शाळा म्हणून विकास करणेशाळेत भाजीपालाऔषधी,  वनस्पतीआणि परसबागची निर्मितीओला व सुका कचऱ्यांचे व्यवस्थापन समजावून सांगणेगांडूळ खत निर्मितीशालेय परिसरात झाडे व हिरवळ लावणेस्वच्छता पंधरवाडाविशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी  दहा महिन्यांकरिता भत्तागृह मार्गदर्शनसाहित्य व साधने उपकरणे उपलब्ध करून देणेअंशत: अंध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दहा महिन्याकरीता वाचक भत्तामनपा शाळेत मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे याकरीता उपस्थिती भत्तामुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करणेकिशारवयीन मुलींसाठी उपक्रम राबविणेतरुण संपादकीय विद्यार्थी लेखन मंडळ तयार करणे इत्यादी योजना सतत राबविले जात आहे.

अतिरिक्त आयुक्त चारठाणकर यांनी केली सीताबर्डी मेनरोडची पाहणी वाहने गस्तीवर ठेवा, मोदी गल्ली अतिक्रमणमुक्त करण्याचे अतिक्रमण विरोधी पथकाला निर्देश

नागपूर:- नागपूर पोलिस व  नागपूर महानगरपालिकेतर्फे  सीताबर्डी मेन रोडवरील  अतिक्रमण विरोधी कारवाईला करण्यात आली आहे. या कारवाईनंतर अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी मंगळवारी (20 मे) सीताबर्डी मेनरोडवरील वाहतूक व्यवस्थेची  पाहणी केली. यावेळी अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त श्री. हरीश राऊतप्रवर्तन विभागाचे अधीक्षक श्री. संजय कांबळे,  श्री. भास्कर माळवेउपद्रव शोध पथक जवान आणि पोलीस जवान उपस्थित होते.राज्यसरकारने गेल्या एप्रिल २०२४ मध्ये काढलेल्या राजपत्रातील आदेशानुसार नागपूर महापालिका आणि नागपूर पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत सीताबर्डी मेन रोडवरुन जवळपास हॉकर्सना हटविण्यात आले आहेत. त्यांना महाराजबाग रस्त्यावर जागा देण्यात आली आहे. यामुळे सीताबर्डी मेन रोड अतिक्रमण मुक्त झाला आहे. 
या ठिकाणी आता दुचाकी आणि चारचाकी वाहनाकरीता पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. अतिक्रमण हटविल्याने सीताबर्डी मेन रोड वाहतूक कोंडीमुक्त झाला आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सीताबर्डी रोडवरील अतिक्रमण हटविण्याकरीता निर्देश दिले होते. त्यानुसार  महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने सीताबर्डी मेनरोडवरील हॉकर्सचे अतिक्रमण हटविले आहे. या कारवाईनंतर अतिरिक्त आयुक्त श्री.अजय चारठाणकर यांनी मंगळवारी (ता. २०) दुपारी भेट दिली आणि पाहणी केली.

यावेळी श्री. चारठाणकर यांनी मोदी गल्ली क्रमांक 1, 2  येथेही भेट दिली व पाहणी केली. तसेच येथील अतिक्रमण काढण्याचे निर्देश त्यांनी अतिक्रमण विभागाला दिले. तर सीताबर्डी मेन रोडावर मनपाची वाहने रात्रीपर्यंत गस्तीवर ठेवण्याचे निर्देश  दिले. तसेच यापुढे कोणत्याही हॉकर्सला सीताबर्डी मेन  रोडवर दुकाने लावण्यास मनाई करावीअशा सूचनाही त्यांनी अतिक्रमण विभागास केले. अतिक्रमण कारवाई करताना  काही अडचणी आल्यास ताबडतोब पो‍लिसांची मदत घेण्याच्या सूचना श्री. चारठाणकर यांनी केल्या.सीताबर्डी मेन रोडावर राहणार दुचाकी आणि चारचाकी पार्किगची व्यवस्था:- सीताबर्डी येथील हॉकर्स झोन महाराजबाग येथील रस्त्यावर हलविल्यानंतर येथील दोन्ही बाजूने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 



ग्लोकल मॉलच्या रांगेत व्हेरायटी चौकात बाटा शोरुम ते नॉव्हेल्टी सीताबर्डी मेन रोडच्या उजव्या बाजूलाबॉम्बेवाला दुकान ते ड्रीम शॉपपर्यंत सीताबर्डी मेन रोडच्या उजव्या बाजूलाव्यंकटेश मार्केट ते पारेख ज्वेलर्स दुकानापर्यंत सीताबर्डी मेन रोडच्या उजव्या बाजूला  चारचाकी वाहनाची पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.  व्हेरायटी चौकात बाळा फुटवेअरपासून राजा ऑप्टिकलपर्यंतसिल्की लॉन्जी दुकानापासून खादी ग्रामोद्योग दुकानापर्यंतजोशी आईस्क्रीम ते पारेख ज्वेलर्स जुने दुकान या रस्त्याच्या डाव्या बाजूला दुचाकी पार्किग व्यवस्था राहणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 16 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (20)  रोजी शोध पथकाने  16  प्रकरणांची नोंद करून  रु. 11,500‍/- रुपयाचा दंड वसूल केला हाथगाडयास्टॉल्स‍पानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत  07 प्रकरणांची नोंद करून  रु.2,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत  03 प्रकरणांची नोंद करून रु.1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता 
मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून रु.2,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 05 प्रकरणांची नोंद करून रु.1,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 04 प्रकरणांची नोंद करून रु.4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.‍तसेच उपद्रव शोध पथकाने  लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. ऐयरपोर्ट सेंटर पोईंट हॉटेल यांनी यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. हेडा बिल्डीकॉन ऐलिट हॉम यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल एकुण रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले.  गांधीबाग झोन अंतर्गत यांनी मे. ढाकने प्लास्टीक यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 03 प्रकरणांची नोंद करून रू. 20,000/- दंड वसूल केला. 

Tuesday, May 6, 2025

12वीं की परीक्षा में नगर निगम के मेधावी विद्यार्थियों को आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी ने किया सम्मानित

 
नागपुर :- 12वीं कक्षा में उत्कृष्ट सफलता प्राप्त करने वाले तथा नगर निगम महाविद्यालय का नाम रोशन करने वाले मेधावी विद्यार्थियों को सम्मानित किया गया। मंगलवार ( 6 मई) को नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी द्वारा किया गया। उन्होंने विद्यार्थियों को उनकी सफलता पर बधाई दी तथा उनके भविष्य के लिए शुभकामनाएं दीं। आयुक्त डॉ. ने यह भी कहा कि परिणाम के प्रतिशत पर ध्यान देने के साथ-साथ विद्यार्थियों की गुणवत्ता में सुधार पर भी ध्यान देने की जरूरत है। इस अवसर पर अभिजीत चौधरी ने किया। महाराष्ट्र राज्य शिक्षा बोर्ड द्वारा आयोजित 12वीं कक्षा की परीक्षा में विज्ञान, वाणिज्य और कला संकाय में मेरिट हासिल करने वाले छात्र आज नगर निगम आयुक्त के बैठक कक्ष में सम्मान समारोह आयोजित किया गया। यह हो गया. इस समय अपर आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. शिक्षा अधिकारी श्रीमती. साधना सायं , 6. शिक्षा अधिकारी श्री. सुभाष उपवास , श्री संजय दिघोर स्कूल इंस्पेक्टर श्री 
प्रशांत टेम्भुरने , श्रीमती सीमा खोबरागड़े , श्री विजय वाल्दे , श्रीमती अंजुम आरा , श्रीमती रजिया शाहीन , अंबेडकर जूनियर कॉलेज के प्रिंसिपल डॉ. मोहन करमकर और ताजाबाद उर्दू जूनियर कॉलेज की प्रिंसिपल श्रीमती माधुरी काठकर उपस्थित थे। नागपुर महानगरपालिका की 12वीं कक्षा की परीक्षा में जूनियर कॉलेज का परिणाम 93.91 प्रतिशत रहा। विज्ञान संकाय में प्रथम आने वाले तथा 12वीं की परीक्षा में सफलता प्राप्त कर नगर निगम महाविद्यालय का नाम रोशन करने वाले डाॅ. निर्मल कैलाश मटे ( 79.67 %) और दूसरे स्थान के विजेता पटाकाबाबासाहेब अम्बेडकर जूनियर कॉलेज के छात्र हैं नूरमुज़स्सम इस्तियाक खान (79.50 प्रतिशत) , साथ ही एम.ए.के. के छात्र आजाद उर्दू जूनियर कॉलेज ने तीसरा स्थान प्राप्त किया 


आयशा फातिमा मोहम्मद मुजाहिद हुसैन  (74.64 प्रतिशत) व्यापार शाखा से सबसे पहले आने वाले एम.ए.के. फ़िज़ा आज़ाद उर्दू जूनियर कॉलेज से फ़िज़ा मो. रिज़वान हाशमी (71.83 प्रतिशत) , दूसरे स्थान पर  मो. सुफियान अंसारी मो. मुस्ताक (70.83 प्रतिशत) और तमन्ना खान, ताजाबाद उर्दू जूनियर कॉलेज की छात्रा। रईस ( 64.83 प्रतिशत) और कला स्ट्रीम से प्रथम आने वाले एम.ए.के. दूसरे स्थान पर आजाद उर्दू जूनियर कॉलेज की मुस्कान फिरदौस (81.83 प्रतिशत) रहीं  एम.ए.के. आजाद उर्दू जूनियर कॉलेज की छात्रा इकरा कौसर ( 80 प्रतिशत) और तीसरे स्थान पर रहीं अशरीना कौसर ( 74 प्रतिशत) को कमिश्नर डॉ. अभिजीत चौधरी और अति ने सम्मानित किया। आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. , एवं शिक्षा अधिकारी श्रीमती द्वारा किया गया। साधना संयम। इस अवसर पर नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी ने कहा , विद्यार्थियों की कड़ी मेहनत 12वीं के परीक्षा परिणाम में दिखी। हाँ। छात्रों को अभी भी कड़ी मेहनत करनी होगी। छात्रों के लिए यह ध्यान रखना महत्वपूर्ण है कि वे कैरियर के नजरिए से आगे क्या करना चाहते हैं। उन्होंने विद्यार्थियों को अपने भावी करियर के लिए परामर्शदाताओं और शिक्षकों से सहायता लेने की सलाह दी। नगर निगम स्कूलों के छात्रों को भी 12वीं कक्षा के बाद प्रतियोगी परीक्षाओं में सफल होना जरूरी है। उन्होंने यह भी सुझाव दिया कि कॉलेज को इस उद्देश्य के लिए छात्रों को हर संभव सहायता प्रदान करनी चाहिए  
कॉलेज के बारे में बोलते हुए डॉ. अभिजीत चौधरी ने कहा कि अगले वर्ष कॉलेज का परिणाम शत-प्रतिशत घोषित होने से म्युनिसिपल कॉलेज से अधिकाधिक विद्यार्थी बेहतर अंकों के साथ उत्तीर्ण होंगे। उन्होंने यह भी उम्मीद जताई कि उन्हें मेरिट सूची में शामिल किया जाएगा। उन्होंने यह भी आश्वासन दिया कि इसके लिए स्कूलों को आवश्यक सहायता उपलब्ध कराई जाएगी।
 उन्होंने यह भी आशा व्यक्त की कि प्रधानाचार्य और अध्यापक स्कूल का परिणाम सुधारने के लिए और अधिक प्रयास करेंगे । इस अवसर पर उन्होंने सभी शिक्षकों , विद्यार्थियों एवं अभिभावकों को बधाई दी तथा विद्यार्थियों को उनके उज्ज्वल भविष्य के लिए शुभकामनाएं दीं। इस बार तो बहुत ज्यादा हो गया।
आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. भी उपस्थित थीं। मेरिट सूची में स्थान पाने वाले विद्यार्थियों को बधाई और उनके भविष्य के लिए शुभकामनाएं। उन्होंने कहा कि आगामी शैक्षणिक वर्ष में कॉलेज के परिणामों को बेहतर बनाने के लिए और अधिक प्रयास करने की आवश्यकता है। उन्होंने अगले वर्ष भी शत-प्रतिशत परिणाम हासिल करने का लक्ष्य रखा  प्रारंभिक शिक्षा अधिकारी श्रीमती साधना सैयाम ने बताया कि इस वर्ष 12वीं की परीक्षा में 235 विद्यार्थियों को प्रवेश दिया गया। इनमें से 230 विद्यार्थियों ने परीक्षा दी। इनमें से 216 छात्र उत्तीर्ण हुए। इसमें 14 असफलताएं रहीं। म्युनिसिपल स्कूल का परिणाम 93.91 प्रतिशत रहा। पिछले वर्ष इस समय परिणाम 81 प्रतिशत था, जो इस वर्ष 13 प्रतिशत अधिक है। यह प्रधानाचार्य , शिक्षकों और छात्रों की कड़ी मेहनत के कारण संभव हुआ है  इस परंपरा को जारी रखते हुए, स्कूल में छात्रों की गुणवत्ता में सुधार हुआ है। उन्होंने कहा कि इसे बढ़ाने के प्रयास किये जायेंगे। कार्यक्रम का संचालन उपशिक्षा अधिकारी सुभाष उपासे ने किया। स्कूल इंस्पेक्टर विनोद वाल्दे ने धन्यवाद ज्ञापन किया।
 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...