नागपूर:- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'पीएम श्री' स्कूल (Pradhan Mantri Schools
for Rising India) योजनेसाठी महापालिकेच्या दोन शाळाची निवड झाली आहे. यात नागपूर महानगरपालिकेच्या संजयनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा
आणि लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक मनपा शाळा या दोन शाळांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत महापालिका शाळांचा शैक्षणिक व परिसर
कायापालाट झाला असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे.केंद्र सरकारने सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि सरकारी शाळांना आधुनिक
बनवण्यासाठी 2022 वर्षी ‘पीएम श्री स्कूल योजना’ देशभरात सुरू केली आहे. पीएम श्री स्कूल योजनेमधून विकसित झालेल्या शाळा इतर
सामान्य शाळांपेक्षा वेगळ्या ठरत आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील काही निवडक शाळा आधुनिक शिक्षण सुविधांनी समृद्ध
करून आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या आहेत.'पीएम श्री' शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, हरित शाळा संकल्पना आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP 2020) प्रभावी अंमलबजावणी या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. या योजनेत नागपूर महापालिकेच्या डिप्टी सिग्नल भागातील संजयनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा आणि हनुमान नगरातील लाल
बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक
शाळांची निवड झाली आहे.या दोन्ही शाळांना आता उत्कृष्ट
शैक्षणिक सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे
पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक
चांगल्या वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. या योजनेंतर्गत डिजिटल शिक्षण संसाधने, शिक्षकांना प्रशिक्षण.
विद्यार्थ्यांसाठी वर्ग खोल्या अधिक चांगल्या पद्धतीने बनविण्यात आल्या आहेत. या
शिवाय प्रयोगशाळेची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेत मुलांना विविध विषयांचे
व्यवहारिक ज्ञान दिले जात आहे.अंध विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी स्वतंत्र
व्यवस्था करण्यात आली आहे.मनपाच्या संजयनगर मनपा हिंदी माध्यमिक शाळा आणि लाल
बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा या दोन्ही शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावण्यास ‘पीएम श्री शाळा योजना’मुळे मोठी मदत झाली आहे. ही निवड मनपाच्या शाळेतील शैक्षणिक क्षेत्रातील
प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. याकरीता केंद्र सरकारकडून समग्र शिक्षण अंतर्गत निधी देण्यात आले आहे.पीएम श्री शाळेसोबत महापालिकेच्या इतर केजी पासून ते कनिष्ठ महाविद्यालयाचा गुणवत्तापूर्ण
शैक्षणिक विकास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली
होऊ लागला आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी विविध सूचना
करून शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संजयनगर आणि लाल बहादूर शास्त्री मनपा हिंदी शाळेंचा शैक्षणिक आलेखात वाढ:- संजयनगर मनपा हिंदी शाळेची निवड महाराष्ट्र शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ 2020 मध्ये निवड होताच
शाळेचा शैक्षणिक आलेख वाढू लागला आहे. आता पीएम श्री
शाळा योजनेंतअतर्गत संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा आणि लाल बहादूर शास्त्री हिंदी लाल बहादूर शास्त्री हिंदी शाळेची निवड झाली आहे. शाळेतील विद्यार्थी दहावी बोर्डांच्या परीक्षेत उल्लेखनीय
यश मिळविले आहे. गुणवत्ता यादीत मनपा शाळेतून हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रथम
क्रमांक पटकावला आहे. शाळेत शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने 85 टक्केच्यावर अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. या
दोन्ही शाळांबरोबर मनपाच्या सर्व शाळांच्या गुणवत्तामध्ये वाढ झाली आहे अशी माहिती
मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी दिली.‘पीएम श्री शाळा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना:-पीएम श्री शाळांतर्गत
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकरिता शाळेतील विद्यार्थ्यांकरीता क्षेत्रीय भेटीचे आयोजन करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरीय प्रख्यात तज्ञ व्यक्तीचे शाळास्तरावर विविध
विषयांचे व्याख्यान व मार्गदर्शने, शाळा स्तरावर तज्ञ व्यक्तीद्वारे
योगा, क्रीडा प्रशिक्षण, आरोग्य शिबिर,
एलईडी लाईट,
हरित शाळा म्हणून विकास करणे, शाळेत भाजीपाला, औषधी, वनस्पती, आणि परसबागची निर्मिती, ओला व सुका कचऱ्यांचे व्यवस्थापन समजावून सांगणे, गांडूळ खत निर्मिती, शालेय परिसरात झाडे व हिरवळ लावणे, स्वच्छता पंधरवाडा, विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी दहा महिन्यांकरिता भत्ता, गृह मार्गदर्शन, साहित्य व साधने उपकरणे उपलब्ध करून देणे, अंशत: अंध प्रवर्गातील
विद्यार्थ्यांना दहा महिन्याकरीता वाचक भत्ता, मनपा शाळेत मुलींचे शिक्षणाचे
प्रमाण वाढावे याकरीता उपस्थिती भत्ता, मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करणे, किशारवयीन मुलींसाठी उपक्रम राबविणे, तरुण संपादकीय विद्यार्थी लेखन
मंडळ तयार करणे इत्यादी योजना सतत राबविले जात आहे.
No comments:
Post a Comment