नागपूर:- नागपूर पोलिस व नागपूर महानगरपालिकेतर्फे
सीताबर्डी मेन रोडवरील अतिक्रमण विरोधी कारवाईला करण्यात आली आहे. या
कारवाईनंतर अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी मंगळवारी (20 मे) सीताबर्डी मेनरोडवरील
वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त श्री. हरीश राऊत, प्रवर्तन विभागाचे अधीक्षक
श्री. संजय कांबळे, श्री. भास्कर माळवे, उपद्रव शोध पथक जवान आणि पोलीस जवान उपस्थित होते.राज्यसरकारने गेल्या एप्रिल २०२४ मध्ये
काढलेल्या राजपत्रातील आदेशानुसार नागपूर महापालिका आणि नागपूर पोलिस यांच्या
संयुक्त कारवाईत सीताबर्डी मेन रोडवरुन जवळपास हॉकर्सना हटविण्यात आले आहेत. त्यांना महाराजबाग
रस्त्यावर जागा देण्यात आली आहे. यामुळे सीताबर्डी मेन रोड अतिक्रमण मुक्त झाला
आहे.
या ठिकाणी आता दुचाकी आणि चारचाकी वाहनाकरीता पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. अतिक्रमण
हटविल्याने सीताबर्डी मेन रोड वाहतूक कोंडीमुक्त झाला आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक
डॉ. अभिजीत चौधरी यांनी सीताबर्डी रोडवरील अतिक्रमण हटविण्याकरीता निर्देश दिले
होते. त्यानुसार महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने सीताबर्डी मेनरोडवरील हॉकर्सचे अतिक्रमण हटविले आहे. या
कारवाईनंतर अतिरिक्त आयुक्त श्री.अजय
चारठाणकर यांनी मंगळवारी (ता. २०) दुपारी भेट दिली आणि पाहणी केली.
यावेळी श्री.
चारठाणकर यांनी मोदी गल्ली क्रमांक 1, 2 व 3 येथेही भेट दिली व पाहणी
केली. तसेच येथील अतिक्रमण काढण्याचे निर्देश त्यांनी अतिक्रमण विभागाला दिले. तर
सीताबर्डी मेन रोडावर मनपाची वाहने रात्रीपर्यंत गस्तीवर ठेवण्याचे निर्देश
दिले. तसेच यापुढे कोणत्याही हॉकर्सला सीताबर्डी मेन रोडवर दुकाने लावण्यास मनाई
करावी, अशा सूचनाही त्यांनी
अतिक्रमण विभागास केले. अतिक्रमण कारवाई
करताना काही अडचणी आल्यास ताबडतोब पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना श्री.
चारठाणकर यांनी केल्या.सीताबर्डी मेन रोडावर राहणार दुचाकी आणि चारचाकी पार्किगची
व्यवस्था:- सीताबर्डी येथील हॉकर्स झोन
महाराजबाग येथील रस्त्यावर हलविल्यानंतर येथील दोन्ही बाजूने पार्किंगची व्यवस्था
करण्यात आली आहे.
ग्लोकल मॉलच्या रांगेत व्हेरायटी चौकात बाटा शोरुम ते नॉव्हेल्टी
सीताबर्डी मेन रोडच्या उजव्या बाजूला, बॉम्बेवाला दुकान ते ड्रीम शॉपपर्यंत सीताबर्डी मेन रोडच्या
उजव्या बाजूला, व्यंकटेश मार्केट ते पारेख
ज्वेलर्स दुकानापर्यंत सीताबर्डी मेन रोडच्या उजव्या बाजूला चारचाकी वाहनाची
पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. व्हेरायटी चौकात बाळा फुटवेअरपासून राजा ऑप्टि कलपर्यंत, सिल्की लॉन्जी दुकानापासून
खादी ग्रामोद्योग दुकानापर्यंत, जोशी आईस्क्रीम ते पारेख ज्वेलर्स जुने दुकान या
रस्त्याच्या डाव्या बाजूला दुचाकी पार्किग व्यवस्था राहणार आहे.
No comments:
Post a Comment