Wednesday, April 9, 2025

पंढरपुर से लंदन तक अंतरराष्ट्रीय दिंडी का आयोजन,70 दिन और 22 देशों से होकर गुजरेगी

नागपुर:- देशभर में प्रसिद्ध पंढरपुर स्थित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर और वारी की कहानी अब दुनिया तक पहुंचेगी। आने वाले वर्षों में लंदन यानि ब्रिटेन में श्री विठ्ठल रुक्मिणी का भव्य मंदिर बनाया जानेवाला है। इसी उद्देश्य से 15 अप्रैल 2025 से जून 2025 तक पंढरपुर से लंदन तक दुनिया की सबसे बड़ी अंतरराष्ट्रीय दिंडी का आयोजन किया जाएगा। 16 अप्रैल को दिंडी नागपुर पहुचेगी और विष्‍णु जी की रसोई में शाम 5 बजे से दर्शन के लिए रखी जाएगी। लंदन स्थित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर की टीम इसके लिए कड़ी मेहनत कर रही है। नागपुर के अंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त शेफ विष्णु मनोहर, प्रबंधन विशेषज्ञ और एलआईटी विश्वविद्यालय के प्रधान सलाहकार मोहन पांडे मंदिर समिति के सदस्य हैं और भारत में समन्वयक होंगे। उन्हें भारत में धन/निधी जुटाने और अन्य समन्वय से संबंधित जिम्मेदारियां दी गई हैं।शेफ विष्णु मनोहर ने इस बारे में जानकारी देते हुए कहा, "अमेरिका, यूरोप, लंदन में इस्कॉन, अक्षरधाम, बालाजी जैसे कई भारतीय मंदिर हैं, साथ ही विदेशों में राजस्थान के देवी-देवताओं के मंदिर भी हैं, लेकिन पंढरपुर के संत साहित्य की इतनी पुरानीपरंपरा वाला कोई मंदिर नहीं है।" इसी कारण से, वारि को विदेशो में ले जाने के लिए यह पहल की जा रही है। मैंने वारी के प्रेम, आत्मीयता और सद्भाव का अनुभव किया है। मेरी हार्दिक इच्छा है कि विश्व को इसका लाभ मिले। विदेशों में मॉरीशस, जर्मनी और न्यू जर्सी में भारतीय मंदिर हैं, लेकिन वहां वारी परंपरा का, भगवान पांडुरंग का कोई मंदिर नहीं है, यह मराठी लोगों का अफसोस रहा है।इस अवसर पर मोहन पांडे ने दिंडी यात्रा के बारे में जानकारी देते हुए बताया कि वास्तव में देखा जाए तो दिंडी की पादुकाएं विमान से लंदन तक जा सकती हैं, लेकिन भगवान के प्रती भक्ति एवं समर्पण की निशानी के रूप में लाखों श्रद्धालु पैदल यात्रा करनेवाले है। इसके लिए यह दिंडी लगभग 22 देशों से होकर 18,000 किलोमीटर की यात्रा करेगी और भक्ति की परंपरा भारत से बाहर तक पहुंचाएगी। यह पादुका 15 
अप्रैल को पंढरपुर से रवाना होगी। 18 अप्रैल को नेपाल, चीन, रूस और यूरोप सहित 22 देशों से होते हुए पादुका 70 दिनों में 18,000 किलोमीटर की यात्रा वाहन से संपन्न करेगी। इस वारी की खुशबू बाईस देशों से होकर पूरे विश्व में फैलेगी। पंढरपुर की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिति ने इसके लिए पूरा सहयोग किया है और कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेलके और अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ने उत्कृष्ट योजना बनाई है, ऐसा मोहन पांडे ने बताया,राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, सांसद उदयनराजे भोसले, एमआईटी के विश्वनाथ कराड और वारकरी समुदाय के सदस्यों ने इस पहल के लिए शुभकामनाएं व्यक्त की हैं और आश्वासन दिया है कि वे हर संभव मदद प्रदान करेंगे। ब्रिटेन, खाड़ी, जर्मनी, आयरलैंड और अमेरिका के 48 से अधिक मराठी मंडल इसमें शामिल हो रहे हैं और जल्द ही एक भव्य मंदिर का निर्माण किया जाएगा। इस अवसर पर तमिल, कन्नड़, गुजराती और तेलुगु भक्त भी शामिल हो रहे हैं। ये लोग मराठी नहीं जानते लेकिन अभंग गा सकते हैं। इस माध्यम से महाराष्ट्र राज्य की सातसौ साल पुरानी परंपरा, राज्य के आराध्य देवता श्री विठ्ठल की पादुका के रूप में, दुनिया तक पहुंचने जा रही है!विट्ठल पाटिल ने एक किलो चांदी दान कर इस शुभ आयोजन को शुभकामनाए दी है, तथा प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफले ने भी पूर्ण सहयोग का आश्वासन दिया है। इस अवसर पर मैनचेस्टर, यूके से प्रसिद्ध आईटी उद्यमी संग्राम वाघ, नागपुर से पर्यावरण विशेषज्ञ और उद्यमी उत्कर्ष खोपकर, उद्यमी मिलिंद देशकर, विजय जठे विशेष रूप से उपस्थित थे।पत्रकार परिषद में विष्णू मनोहर, मोहन पांडे, संग्राम वाघ और विजय जथे उपस्थित थे।  

Tuesday, April 8, 2025

जलपर्णी कापणी कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करा अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी दिले निर्देश

नागपूर:-  नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी आज (ता.8) अंबाझरी तलावाला भेट दिली व जलपर्णी वनस्पती कापणीचे कामांचा आढावा घेतला आणी  तेथे काम करणाऱ्या महिलांशी चर्चा केली.यावेळी लक्ष्मीनगर झोनचे समाज विकास उपायुक्त डॉ. रंजना लाडे सहायक आयुक्त श्री सतीश चौधरीव्यवस्थापक श्री. विनय त्रिकोलवारश्री. रितेश बांतेश्रीमती नूतन मोरेकम्युनिटी ऑर्गनाझर संघटक श्रीमती ज्योती शेगोकारस्वास्थ निरीक्षक बी.एस.गजभीये  आदी उपस्थित होते.अंबाझरी तलावातील जलपर्णी वनस्पतीपासून इको फ्रेंडली वस्तू तयार करण्याचा उपक्रम महापालिकेतर्फे राबविला जाणार आहे. याकरिता 
नागपूर महानगरपालिकेतर्फे शंभर महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे शहरातील स्वयंसहायता बचत गट व महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे.यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी जलपर्णी कापणीचे कामे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिलें. तसेच त्यांनी जलपर्णीचे गठठे बांधण्याची प्रक्रियाकामाचे तासकामगार महिलांना मिळणारे मानधनपिण्याच्या पाण्याची सुविधांची माहिती जाणून घेतली.त्यांनतर श्रीमती वैष्णवी बी. यांनी सीताबर्डी येथील दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत सोनचिरैया शहरी उपजीविका केंद्रस्टिचिंग क्लस्टर आणि प्रशिक्षण केंद्रास भेट दिली व पाहणी केली. 
यावेळी शहरी उपजिविका केंद्राचे नुतनीकरणाची कामे जूनपर्यंत करण्यात यावेकरण्याचे निर्देश कंत्राटदारांना त्यांनी दिले. तसेच प्रत्येक आठवडयात कामाची प्रगती सादर करण्याचे निर्देश कंत्राटदार सह अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय  त्यांनी सोनचिरैया केंद्रातील स्टिचिंग क्लटर प्रशिक्षणाची माहिती घेतली. यावेळी  उपअभियंता सचिन चमाटेकंत्राटदार राकेश असाटी आणि शर्मिष्ठा गांधी आदी उपस्थित होते. याशिवाय उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनीही बुटी कन्या शाळेतील आधार शहरी बेघर निवारा केंद्रास भेट दिली व पाहणी केली. या शहरी बेघर निवारा केंद्राची योग्य दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 69 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  मंगळवार (08)  रोजी शोध पथकाने  58  प्रकरणांची नोंद करून  रु. 44,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडयास्टॉल्स‍पानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत  31  प्रकरणांची नोंद करून  रु.12,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रु. 100/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत  11 प्रकरणांची नोंद करून रु.4,400/-
रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून रु.5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.  वर्कशापगॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ताफुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रू.1,000/-  रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा जनावरे बांधणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून रू.7,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती
असल्यास 27 प्रकरणांची नोंद करून रु.5,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून रु.7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. विढोबा अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल एकुण रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. व मे. न्यू टि. व्ही. एस शोरुम यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  धरमपेठ झोन अंतर्गत पांडत पैठणी यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला.  हनुमान नगर झोन अंतर्गत सेंट पॉल सी.बी.एस.सी स्कूल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे.कविता स्वीट्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला मंगळवारी झोन अंतर्गत मे. जय माँ शेरावाली फ्रुट सेंटर व श्री. जय किसन शाहु यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल एकुण  रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आलाउपद्रव शोध पथकाने 07  प्रकरणांची नोंद करून रू. 45,000/- दंड वसूल केला.

Monday, April 7, 2025

सुदृढ आरोग्यासाठी पुढाकार हा उज्ज्वल भवितव्याचा पाया अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत : मनपामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत माता व बालकांच्या संगोपनाची विशेष काळजी घेतली जाते. गरोदर महिलांना तसेच बालकांना अगदी पहिल्या दिवसापासून लसीकरण केले जाते. आशा सेविका यामध्ये महत्त्वाची भूमिका वठवितात. जागतिक आरोग्य दिनाची यंदाची थीम ही 'आरोग्यदायी सुरुवातआशादाय भविष्य' (हेल्दी बिगिनींगहोपफुल फ्यूचर) अशी आहे. माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी पुढाकार म्हणजे आरोग्यदायी सुरुवात असून तो देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया आहेअसे प्रतिपादन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी केले.नागपूर महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी (ता.७) जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत होत्या. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारसाथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरेहिवताप व हत्तीरोग 
अधिकारी डॉ. मंजूषा मठपतीशहर प्रमुख व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकमशहर क्षयरोग अधिकारी डॉ. डॉ.शिल्पा जिचकारशहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. राजेश बुरेशहर लेखा अधिकारी श्री. निलेश बाभरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमात आयुष नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हजारीपहाड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा व एएनएम यांच्याद्वारे पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी या दोन्ही पथनाट्याचे कौतुक केले. मनपाचे लसीकरण अभियानसाथरोग सर्वेक्षण तसेच शासनाच्या विविध योजनांचा समाजातील व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी आशा सेविकांची भूमिका महत्वाची आहे. 
मनपाच्या आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी म्हणून नव्हे तर कुटूंबातील सदस्य म्हणून देखील आशा सेविकांचे स्थान असते. लहान बाळांचे संगोपनजन्मानंतर त्यांची घ्यावयाची काळजीत्यांच्यासाठी आवश्यक गोष्टीगरोदर महिलांनी पाळावयाचे पत्थ्य या सर्वांची माहिती आशा सेविकांना असते. त्या घरातील सदस्यांप्रमाणे संबंधित मातांना त्याचे पालन करायला लावतात. माता आणि बाल संगोपन हे आरोग्य विभागाच्या कार्यकक्षेतील महत्वाचे केंद्र आहे. त्यासाठी आणखी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन श्रीमती वसुमना पंत यांनी यावेळी केले.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी प्रास्ताविकमध्ये जागतिक आरोग्य दिनाची थीम विषद केली. व्यक्तीची शारीरिकमानसिकसामाजिक आणि आर्थिक स्थिती चांगली असणे ही आरोग्याची परिपूर्ण संकल्पना आहे. आरोग्यदारी सुरुवात सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आपल्या कामात सातत्य आवश्यक आहे. त्यातून पुढे माता मृत्यू कमी करता येतील. बालकांचे संपूर्ण लसीकरण करून त्यांना पुढील आजारांपासून सुरक्षित करता येईल. सुरक्षित बालकांचा विकास होउन त्यातून देशाचे स्वस्थ भवितव्य साकारता येईल. आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार सर्व स्तरातून करुन त्याचे पालन करणे हीच खरी ‘आरोग्यदायी सुरुवात’ ठरेलअसा विश्वास डॉ. दीपक सेलोकर यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाला झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडेडॉ. सुनील कांबळेडॉ.ख्वाजा मोईनुद्दीनडॉ. गजानन पवानेडॉ. विजय तिवारीडॉ. अतिक खानडॉ. सुलभा शेंडेडॉ. जयश्री चन्नेडॉ. कांचन किंमतकरडॉ. वर्षा देवस्थळेडॉ. सुषमा खंडागळेपीएचएन अर्चना खाडेज्योती मानकरदीपाली गणोरकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्रीमती दीपाली नागरे यांनी केले.

जी.एम. बनातवाला शाळेत सामाजिक-भावनिक शिक्षण कार्यक्रमाची यशस्वी सांगतामनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप

नागपूर:-  नागपूर महापालिका आणि  रेनोवाटिओ फाउंडेशनच्या संयुक्तविद्यमाने महानगरपालिका आयुक्त तथा  प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता.5) जी.एम. बनातवाला शाळेत शैक्षणिक वर्ष 2024-25 या कालावधीत 20 महानगरपालिका शाळेमध्ये व मनपा क्षेत्रातील 5 अनाथ आश्रम शाळेत राबविण्यात आलेल्या सामाजिक-भावनिक शिक्षण (SEL) कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.  डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम , सहाय्यक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे,  रेनोवाटिओ फाउंडेशनचे संस्थापक श्री.नकुल अग्रवाल व श्रीमती श्रद्धा अग्रवालएसएमएस लि. चे संचालक श्री परम संचेतीश्री. प्रफुल गणात्राडॉ. टी. सी. केलवानीनवरात्र चॅरिटेबल हॉस्पिटलचे सामाजिक कार्यकर्ता श्री. शोएब मेमन,  मुख्याध्यापक श्रीमती ममता प्रजापति , श्री. किशोर संकुलवार आणि 
शाळा  निरीक्षकशिक्षक आदी उपस्थित होते.रेनोवाटिओ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांद्वारे आठवड्याला घेतल्या जाणाऱ्या सत्रांमुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तामानसिक लवचिकता आणि सामाजिक कल्याणात झालेल्या सकारात्मक बदलांना या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. यावेळी मनपा  आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सामाजिक-भावनिक शिक्षण (SEL)  या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि सामाजिक तयारीचे महत्त्व अधोरेखित केले. 
अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडते आणि जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी ते तयार होतातअसे ते म्हणाले. डॉ. चौधरी यांनी सामाजिक-भावनिक कौशल्ये ही करिअर तयार करण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठीबुद्धिमत्तेपेक्षा अधिक आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी शिक्षक आणि स्वयंसेवकांनी यशोगाथा अनुभव  कथन करताना सांगितले कीविद्यार्थ्यांमध्ये भावना हाताळण्याची क्षमता आणि परस्पर संबंध सुधारले आहेत. विद्यार्थ्यांनी देखील या कार्यक्रमामुळे तणावावर नियंत्रण मिळवण्यात आणि आत्मभान वाढवण्यात मदत झाल्याचे सांगितले. उपक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्यात आलीतसेच शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके देण्यात आले. या कार्यक्रमात स्वयंसेवकाद्वारे राबविण्यात येणाऱ्या  वैयक्तिक आणि सामूहिक उपक्रमांचा समावेश होताज्याद्वारे विद्यार्थ्यांना भावनिक लवचिकता आणि सकारात्मक नातेसंबंधांसाठी आवश्यक जीवनकौशल्ये मिळाली.यावेळी रेनोवाटिओ फाउंडेशनतर्फे भविष्यातही सामाजिक-भावनिक शिक्षण (SEL) कार्यक्रम इतर शाळांमध्ये राबविण्याची आणि शिक्षकांसाठी पाठबळ देण्याची योजना जाहीर केली.

दोन मलशुद्धीकरण केंद्रांच्या प्रस्तावित जागांची आयुक्तांनी केली पाहणी नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पअंतर्गत होणार

नागपूर:- नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पअंतर्गत शहरात उभारण्यात येणाऱ्या दोन मलशुद्धीकरण केंद्रांच्या प्रस्तावित जागांची पाहणी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज (ता. ७) केली.यातील एक केंद्र विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआईटी) परिसरात आणि दुसरे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या परिसरात प्रस्तावित आहे. यावेळी उपायुक्त श्री. मिलिंद मेश्रामसार्वजनिक अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी आणि प्रकल्पाची व्यवस्थापकीय सल्लागार कंपनी टीसीईएनचे प्रतिनिधी उपस्थित होते.नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पअंतर्गत शहरात तीन ठिकाणी ९३ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन मलशुद्धीकरण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. या पैकी दोन मलनिःसारण केंद्रांसाठी जागांची पाहणी करण्यात आली. 
यातील एका केंद्राची क्षमता  १२  दशलक्ष लिटर प्रतिदिन दुसरे केंद्र ३५  दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे  राहणार आहे. यासाठी कॅनल रोड येथील नागनदीलगत डॉ पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या परिसरात मलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या जागांची पाहणी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली. आयुक्तांनी व्हीएनआयटी परिसरात सुद्धा जागेची पाहणी केली. तसेच महाराजबाग परिसरात बोरनाला जवळच्या जागेची पाहणी केली. मोरभवन बस स्थानकांच्या मागे असलेल्या कृषी विद्यापीठाच्या जागेची सुद्धा त्यांनी पाहणी केली.
नागनदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरसीडी) आणि जलशक्ती मंत्रालयाने नागनदी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. यामध्ये शहरात ५२० किलोमीटर लांबीची मलनिःसारण वाहिनी तसेच ७ ठिकाणी नवीन पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. यावेळी कार्यकारी अभियंता राजेश दुफारेकार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानीनागनदी प्रकल्पाचे सल्लागार मो इजराईलनवघरे आणि रवि मांगे उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 69 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवर,  थुंकणाऱ्यांवर79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  शुक्रवार (04)  रोजी शोध पथकाने  69  प्रकरणांची नोंद करून  रु. 52,000/-  रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडयास्टॉल्स‍पानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) याअंतर्गत  46  प्रकरणांची नोंद करून  रु.18,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रु. 100/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत  07 प्रकरणांची नोंद करून रु.2,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा 
वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 09 प्रकरणांची नोंद करून रु.6,500/- रुपयांची वसुली करण्यात आली.  सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा जनावरे बांधणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रू.1000/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रु. 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 36 प्रकरणांची नोंद करून रु.7,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून रु.12,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. 
ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने  हनुमान नगर झोन अंतर्गत वैशाखी स्वीट्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आलामे. करण बिल्डर्स डेव्लर्प्स व मे. साई शाम ईनफ्रास्ट्र्कचर यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल एकुण रु.20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. मे. आयडि यल अकॅडमी यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला.  धंतोली नगर झोन अंतर्गत मे. महेश मलानी यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आलानेहरू नगर झोन अंतर्गत मे. निरामय ईनफ्रास्ट्र्कचर यांनी यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मेजय वैष्णवी स्वीट्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आलाव मे. आदर्श कोचींग सेंटर यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला.  सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. दमयंती बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. क्लासीक ग्रो अपार्टमेंट यांनी विनापरवानगी टिन शेड बांधून जवळच्या फूटपाथ परिसरात अडथळा निमार्ण केल्याबद्दल रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 10  प्रकरणांची नोंद करून रू. 65,000/- दंड वसूल केला.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...