नागपूर:- नागपूर
महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी आज (ता.8) अंबाझरी तलावाला भेट दिली व जलपर्णी वनस्पती कापणीचे
कामांचा आढावा घेतला आणी तेथे काम करणाऱ्या महिलांशी चर्चा केली.यावेळी
लक्ष्मीनगर झोनचे समाज विकास उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त श्री सतीश चौधरी, व्यवस्थापक श्री. विनय त्रिकोलवार, श्री. रितेश बांते, श्रीमती
नूतन मोरे, कम्युनिटी ऑर्गनाझर संघटक श्रीमती
ज्योती शेगोकार, स्वास्थ निरीक्षक बी.एस.गजभीये
आदी उपस्थित होते.अंबाझरी तलावातील जलपर्णी वनस्पतीपासून इको फ्रेंडली वस्तू तयार करण्याचा
उपक्रम महापालिकेतर्फे राबविला जाणार आहे. याकरिता
नागपूर महानगरपालिकेतर्फे शंभर
महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे शहरातील
स्वयंसहायता बचत गट व महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे.यावेळी
अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी जलपर्णी कापणीचे कामे पावसाळयापूर्वी
पूर्ण करण्याचे निर्देश दिलें. तसेच त्यांनी जलपर्णीचे गठठे बांधण्याची प्रक्रिया, कामाचे तास, कामगार
महिलांना मिळणारे मानधन, पिण्याच्या
पाण्याची सुविधांची माहिती जाणून घेतली.त्यांनतर श्रीमती वैष्णवी बी. यांनी
सीताबर्डी येथील दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत
सोनचिरैया शहरी उपजीविका केंद्र, स्टिचिंग
क्लस्टर आणि प्रशिक्षण केंद्रास भेट दिली व पाहणी केली.
यावेळी शहरी उपजिविका
केंद्राचे नुतनीकरणाची कामे जूनपर्यंत करण्यात यावे, करण्याचे
निर्देश कंत्राटदारांना त्यांनी दिले. तसेच प्रत्येक आठवडयात कामाची प्रगती सादर
करण्याचे निर्देश कंत्राटदार सह अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय त्यांनी
सोनचिरैया केंद्रातील स्टिचिंग क्लटर प्रशिक्षणाची माहिती घेतली. यावेळी
उपअभियंता सचिन चमाटे, कंत्राटदार
राकेश असाटी आणि शर्मिष्ठा गांधी आदी उपस्थित होते. याशिवाय उपायुक्त डॉ. रंजना
लाडे यांनीही बुटी कन्या शाळेतील आधार शहरी बेघर निवारा केंद्रास भेट दिली व पाहणी
केली. या शहरी बेघर निवारा केंद्राची योग्य दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी
यावेळी केल्या.
No comments:
Post a Comment