नागपूर:- नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पअंतर्गत शहरात उभारण्यात येणाऱ्या दोन
मलशुद्धीकरण केंद्रांच्या प्रस्तावित जागांची पाहणी महापालिकेचे आयुक्त तथा
प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज (ता. ७) केली.यातील एक केंद्र विश्वेश्वरैय्या
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआईटी) परिसरात आणि दुसरे डॉ. पंजाबराव देशमुख
कृषी महाविद्यालयाच्या परिसरात प्रस्तावित आहे. यावेळी उपायुक्त श्री. मिलिंद
मेश्राम, सार्वजनिक अभियांत्रिकी विभागाच्या
अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी आणि प्रकल्पाची व्यवस्थापकीय सल्लागार कंपनी
टीसीईएनचे प्रतिनिधी उपस्थित होते.नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पअंतर्गत शहरात
तीन ठिकाणी ९३ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन मलशुद्धीकरण केंद्रांची उभारणी करण्यात
येणार आहे. या पैकी दोन मलनिःसारण केंद्रांसाठी जागांची पाहणी करण्यात आली.
यातील
एका केंद्राची क्षमता १२
दशलक्ष लिटर प्रतिदिन दुसरे केंद्र ३५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे राहणार आहे. यासाठी कॅनल रोड येथील नागनदीलगत डॉ
पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या परिसरात मलशुद्धीकरण केंद्र
प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या जागांची पाहणी आयुक्त डॉ. अभिजीत
चौधरी यांनी केली. आयुक्तांनी व्हीएनआयटी
परिसरात सुद्धा जागेची पाहणी केली. तसेच महाराजबाग परिसरात बोरनाला जवळच्या जागेची
पाहणी केली. मोरभवन बस स्थानकांच्या मागे असलेल्या कृषी विद्यापीठाच्या जागेची
सुद्धा त्यांनी पाहणी केली.
नागनदीला
प्रदूषण मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरसीडी) आणि जलशक्ती
मंत्रालयाने नागनदी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. यामध्ये शहरात ५२० किलोमीटर
लांबीची मलनिःसारण वाहिनी तसेच ७ ठिकाणी नवीन पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, कार्यकारी
अभियंता विजय गुरुबक्षानी, नागनदी
प्रकल्पाचे सल्लागार मो इजराईल, नवघरे
आणि रवि मांगे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment