Monday, April 7, 2025

सुदृढ आरोग्यासाठी पुढाकार हा उज्ज्वल भवितव्याचा पाया अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत : मनपामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत माता व बालकांच्या संगोपनाची विशेष काळजी घेतली जाते. गरोदर महिलांना तसेच बालकांना अगदी पहिल्या दिवसापासून लसीकरण केले जाते. आशा सेविका यामध्ये महत्त्वाची भूमिका वठवितात. जागतिक आरोग्य दिनाची यंदाची थीम ही 'आरोग्यदायी सुरुवातआशादाय भविष्य' (हेल्दी बिगिनींगहोपफुल फ्यूचर) अशी आहे. माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी पुढाकार म्हणजे आरोग्यदायी सुरुवात असून तो देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया आहेअसे प्रतिपादन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी केले.नागपूर महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी (ता.७) जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत होत्या. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारसाथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरेहिवताप व हत्तीरोग 
अधिकारी डॉ. मंजूषा मठपतीशहर प्रमुख व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकमशहर क्षयरोग अधिकारी डॉ. डॉ.शिल्पा जिचकारशहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. राजेश बुरेशहर लेखा अधिकारी श्री. निलेश बाभरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमात आयुष नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हजारीपहाड नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा व एएनएम यांच्याद्वारे पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी या दोन्ही पथनाट्याचे कौतुक केले. मनपाचे लसीकरण अभियानसाथरोग सर्वेक्षण तसेच शासनाच्या विविध योजनांचा समाजातील व्यक्तींना लाभ मिळवून देण्यासाठी आशा सेविकांची भूमिका महत्वाची आहे. 
मनपाच्या आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी म्हणून नव्हे तर कुटूंबातील सदस्य म्हणून देखील आशा सेविकांचे स्थान असते. लहान बाळांचे संगोपनजन्मानंतर त्यांची घ्यावयाची काळजीत्यांच्यासाठी आवश्यक गोष्टीगरोदर महिलांनी पाळावयाचे पत्थ्य या सर्वांची माहिती आशा सेविकांना असते. त्या घरातील सदस्यांप्रमाणे संबंधित मातांना त्याचे पालन करायला लावतात. माता आणि बाल संगोपन हे आरोग्य विभागाच्या कार्यकक्षेतील महत्वाचे केंद्र आहे. त्यासाठी आणखी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन श्रीमती वसुमना पंत यांनी यावेळी केले.वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी प्रास्ताविकमध्ये जागतिक आरोग्य दिनाची थीम विषद केली. व्यक्तीची शारीरिकमानसिकसामाजिक आणि आर्थिक स्थिती चांगली असणे ही आरोग्याची परिपूर्ण संकल्पना आहे. आरोग्यदारी सुरुवात सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आपल्या कामात सातत्य आवश्यक आहे. त्यातून पुढे माता मृत्यू कमी करता येतील. बालकांचे संपूर्ण लसीकरण करून त्यांना पुढील आजारांपासून सुरक्षित करता येईल. सुरक्षित बालकांचा विकास होउन त्यातून देशाचे स्वस्थ भवितव्य साकारता येईल. आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार सर्व स्तरातून करुन त्याचे पालन करणे हीच खरी ‘आरोग्यदायी सुरुवात’ ठरेलअसा विश्वास डॉ. दीपक सेलोकर यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाला झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडेडॉ. सुनील कांबळेडॉ.ख्वाजा मोईनुद्दीनडॉ. गजानन पवानेडॉ. विजय तिवारीडॉ. अतिक खानडॉ. सुलभा शेंडेडॉ. जयश्री चन्नेडॉ. कांचन किंमतकरडॉ. वर्षा देवस्थळेडॉ. सुषमा खंडागळेपीएचएन अर्चना खाडेज्योती मानकरदीपाली गणोरकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्रीमती दीपाली नागरे यांनी केले.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...