Monday, April 7, 2025

जी.एम. बनातवाला शाळेत सामाजिक-भावनिक शिक्षण कार्यक्रमाची यशस्वी सांगतामनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप

नागपूर:-  नागपूर महापालिका आणि  रेनोवाटिओ फाउंडेशनच्या संयुक्तविद्यमाने महानगरपालिका आयुक्त तथा  प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता.5) जी.एम. बनातवाला शाळेत शैक्षणिक वर्ष 2024-25 या कालावधीत 20 महानगरपालिका शाळेमध्ये व मनपा क्षेत्रातील 5 अनाथ आश्रम शाळेत राबविण्यात आलेल्या सामाजिक-भावनिक शिक्षण (SEL) कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.  डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम , सहाय्यक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे,  रेनोवाटिओ फाउंडेशनचे संस्थापक श्री.नकुल अग्रवाल व श्रीमती श्रद्धा अग्रवालएसएमएस लि. चे संचालक श्री परम संचेतीश्री. प्रफुल गणात्राडॉ. टी. सी. केलवानीनवरात्र चॅरिटेबल हॉस्पिटलचे सामाजिक कार्यकर्ता श्री. शोएब मेमन,  मुख्याध्यापक श्रीमती ममता प्रजापति , श्री. किशोर संकुलवार आणि 
शाळा  निरीक्षकशिक्षक आदी उपस्थित होते.रेनोवाटिओ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांद्वारे आठवड्याला घेतल्या जाणाऱ्या सत्रांमुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तामानसिक लवचिकता आणि सामाजिक कल्याणात झालेल्या सकारात्मक बदलांना या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. यावेळी मनपा  आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सामाजिक-भावनिक शिक्षण (SEL)  या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि सामाजिक तयारीचे महत्त्व अधोरेखित केले. 
अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडते आणि जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी ते तयार होतातअसे ते म्हणाले. डॉ. चौधरी यांनी सामाजिक-भावनिक कौशल्ये ही करिअर तयार करण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठीबुद्धिमत्तेपेक्षा अधिक आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी शिक्षक आणि स्वयंसेवकांनी यशोगाथा अनुभव  कथन करताना सांगितले कीविद्यार्थ्यांमध्ये भावना हाताळण्याची क्षमता आणि परस्पर संबंध सुधारले आहेत. विद्यार्थ्यांनी देखील या कार्यक्रमामुळे तणावावर नियंत्रण मिळवण्यात आणि आत्मभान वाढवण्यात मदत झाल्याचे सांगितले. उपक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक भेट देण्यात आलीतसेच शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके देण्यात आले. या कार्यक्रमात स्वयंसेवकाद्वारे राबविण्यात येणाऱ्या  वैयक्तिक आणि सामूहिक उपक्रमांचा समावेश होताज्याद्वारे विद्यार्थ्यांना भावनिक लवचिकता आणि सकारात्मक नातेसंबंधांसाठी आवश्यक जीवनकौशल्ये मिळाली.यावेळी रेनोवाटिओ फाउंडेशनतर्फे भविष्यातही सामाजिक-भावनिक शिक्षण (SEL) कार्यक्रम इतर शाळांमध्ये राबविण्याची आणि शिक्षकांसाठी पाठबळ देण्याची योजना जाहीर केली.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...