Saturday, February 24, 2024

दिव्यांगाना सौरऊर्जाचलित मोटराईज्ड ट्रायसिकलचे वितरण....

नागपूर:- केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतूनसमेकित क्षेत्रीय कौशल्य विकासपुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी.) यांच्या वतीने आणि विशाखापट्टणम येथील आंध्रप्रदेश मेड टेक झोन (एएमटीझेड) यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यापूर्वी आम्ही दिव्यांगांना ४० कोटी रुपयांचे साहित्य दिले होते.आज खासदार निधीतून ३५ दिव्यांगांना आम्ही सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटराईज्ड ट्रायसिकल दिल्या. नागपूर शहरातील प्रत्येक दिव्यांगाचे जीवन सुसह्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि त्यादृष्टीनेच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेअसे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. मंत्री महोदयांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमाला 
आमदार मोहन मतेआमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, जयप्रकाश गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकरजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात या ट्रायसिकलचे वितरण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही ना. श्री. गडकरी यांनी सांगितले. नागपूर शहरातील उपेक्षितदिव्यांगअनाथांची सेवा करणे आमचे कर्तव्य आहे. दिव्यांगांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी भविष्यात ट्रायसिकलची मॅरेथॉन आयोजित करण्याचाही विचार असल्याचे ना. श्री. गडकरी म्हणाले. यावेळी एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मारवी शर्माएन. नरेश कुमारके. लेंका, तर सीआरसीचे संचालक प्रफुल्ल शिंदेमाधुरी कांबळेव्यंकटेश बेलखोडेश्रीमती रोहिणी, डॉ. विंकी रुघवानीडॉ. प्रीती मनमोडे यांच्यासह भाजप वैद्यकीय व दिव्यांग आघाडीचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले.सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या वाहनाचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत आहे. याशिवाय ४० किलोमीटरचा कमाल मायलेज देण्याची क्षमता यामध्ये आहे. अतिशय मजबूत रचना आणि संक्षिप्त स्वरुपातील मोटराईज्ड ट्रायसिकलमध्ये इलेक्ट्रिक ब्रेक कंट्रोल सिस्टीमदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या वाहनाचे इलेक्ट्रिक चार्जिंगदेखील शक्य आहे. त्यादृष्टीने एक पॉवर केबल त्यासोबत देण्यात आला आहे. 
समायोजित (अ‍ॅडजस्टेबलहोऊ शकणारे हँडल आणि बॅटरी पातळी निर्देशक ही ट्रायसिकलची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने यावेळी दिव्यांगांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. भाजप वैद्यकीय व दिव्यांग आघाडीच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला ना. श्री. गडकरी यांनी भेट दिली. या शिबिरात नेत्र, दंत व कर्ण तपासणी करण्यात आली. डॉ. गिरीश चरडे, डॉ. सारंग दांडेकर, डॉ. अनुराधा, अजय मुखर्जी, शिवांगी गर्ग, डॉ. अंकित भांगे, डॉ. रुपाली थोटे, आशीष जोशी यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी परीश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...