Tuesday, February 27, 2024

मानेवाडा चौकात ‘पौर्णिमा दिवस’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 नागपूर:- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या पौर्णिमा दिवस अभियानाला सोमवारी (ता.२६) रात्री मानेवाडा चौकातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी महापौर व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानामध्ये ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसवेकांना जनजागृतीसाठी स्थानिक नागरिकांची देखील साथ मिळाली.पौर्णिमा दिवस अभियानांतर्गत सोमवारी (ता.६) मानेवाडा चौक येथे जनजागृती करण्यात आलीग्रीन व्हिजिलचे कौस्तभ चैटर्जीसुरभी जैसवालमेहुल कोसूरकरशीतल चौधरीविष्णु देव यादवश्रीया जोगेप्रिया यादवपार्थ जुमडेतुषार देशमुखसंस्कार माहेश्वरीमिताली पांडे या स्वयंसेवकांनी दुकानदार तसेच नागरिकांना एक तास विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन 
केले व नागरिकांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.मनपाचे प्रकाश रुद्राकरशेखर पवारमोहन कोहलेकरअमोल कोहळे यांच्यासह भोलानाथ सहारेमधुकर राव पाठकप्रणिता लोखंडेमनोज भालेरावपप्पू वासवानीउज्ज्वला टोपरेकविता टोपरेशर्मिला बादगेअपूर्व देराजा भांदककरश्रीकांत क्षीरसागरकिशोर भागतेमहादेवराव अंजनकरसंगीता लेंडे आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
 
 

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...