Friday, February 16, 2024

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वांनी प्रयत्न करा मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

नागपूर :नागपूर शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मनपासह वाहतूक पोलिसकेंद्रीय  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळनीरी या सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेअसे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी दिले.वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मनपा द्वारे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा शुक्रवारी (ता.१६मनपा आयुक्तांनी आढावा घेतलामनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या आढावा बैठकीत मनपाचे उपायुक्त श्रीरवींद्र भेलावेअधीक्षक अभियंता श्रीमनोज तालेवारडॉश्वेता बॅनर्जीसहायक पोलिस आयुक्त (वाहतूकश्रीजयेश भांडारकरमनपा परिवहन प्रशासकीय अधिकारी श्रीरवींद्र पागे, ‘नीरीच्या  प्रिसिंपल सायंटिस्ट संगीता गोयलकार्यकारी अभियंता अल्पना पाटनेसार्वजनिक आरोग्य अभियंता श्रीसंदीप लोखंडेप्रकल्प अधिकारी श्री.
राऊतश्रीगभने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्रीराजेंद्र पाटीलसल्लागार डॉगीतांजलीकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सल्लागार डॉसंदीप नारनवरे आदी उपस्थित होते.वायू गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध कामांचे कार्यादेश प्रदान करण्यात आलेले आहेतयापैकी बहुतांश कामे पूर्णत्वास आलेली आहेत तर काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेतयामध्ये मनपाच्या परिवहन सेवेमध्ये विद्युत बसेसचा अंतर्भाव करण्यात आलेला आहेमनपाद्वारे १४४ नवीन -बसेससाठी कार्यादेश देण्यात आला असून६० -बसेस सध्या सेवेत आहेत. वाडी, हिंगणा आणि लकडगंज येथील चार्जिंग स्टेशन आणि बस डेपोचे काम देखील पूर्ण झाले असून वाठोडा बस डेपोचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्तांपुढे सादर करण्यात आली. 
शहरात हरीत  क्षेत्राच्या  विकासासाठी  उद्यान  विभागाद्वारे विविध कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेतयातील भारत माता उद्यानामध्ये हरीत क्षेत्र विकसित करण्यात आलेले आहेयाशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेले आहे.रस्त्यांवरील खड्डे बुजवून त्याचे समतलीकरण आणि पर्यावरणपूरक दहन घाटांच्या विकासासाठी कार्यादेश प्रदान करण्यात आलेले आहेतयाशिवाय सर्वाधिक प्रदूषणाची नोंद असलेल्या  नागरी वस्तीनिहाय गंगाबाई घाटमोक्षधाम घाट आणि मानेवाडा या दहन घाटांवर वायू प्रदूषण नियंत्रण प्रणाली लावण्याचे कामाचे निविदा प्रकाशित करण्यात आली आहेजयताळाचिंचभुवन आणि फ्रेन्ड्स कॉलनी येथील दहनघाट विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहेवायू गुणवत्ता सुधारणा आणि बळकटीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेने सीएसआयआरनीरी चे सहकार्य घेतले आहेवाहतुकीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी  त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपावाहतूक पोलिसनीरी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या समितीचा आढावा घेण्याची सूचना यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी केली.  

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...