नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी
प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (29) रोजी शोध पथकाने 66 प्रकरणांची नोंद करून 49,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते
यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 5,200/- रुपयांची वसुली करण्यात
आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300/- रुपयांची वसुली करण्यात
आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या
अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात
आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद
करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून
17,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 3,000 रुपयांची वसुली करण्यात आली.उपरोक्त
यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 22 प्रकरणांची नोंद करून 4,400/- दंड वसूल करण्यात आलेला
आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध
पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे,प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या
अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5000 रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर
झोन अंतर्गत मे. शिवगौरी रेसीडंसी यांनी इमारतीच्या तळघरात अस्वच्छता आढळल्याने रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सुभाष निकम यांनी रस्त्यावर
सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. आईचा स्वयंपाक
यांनी चेंबर ब्लॉक केल्यामुळे रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मेहुल
पटेल यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. जिनाद क्रियेशन यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू.
10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. समर्थ ॲग्रीक्लचर यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू.
10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत मे. ताज टावर अर्पाटमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू.
10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत गणेश मुर्ती भंडार, शाहु मुर्ती भंडार, भक्ती मुर्ती भंडार, लोणारे मुर्ती भंडार, रमेश मुर्ती भंडार, शिवाणी आर्ट भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता
ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 60,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे.
अष्टविनायक मुर्ती भंडार भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता
ठेवल्याबाबत रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले व मे. खापेकर मिष्ठान्न भंडार यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. आशीनगर झोन अंतर्गत मे. निलेश फुलझेले मुर्ती भंडार, मे. ठाकुर मुर्ती भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता
ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे
नागपूर - शहरातील अंबाझरी , फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...

-
नागपुर:- केंद्र सरकार ने जमीन-जायदाद खरीदी-बिक्री से जुड़े किसी भी गति विधी के लिए महारेरा एक्ट के साथ बार कोड की भी अनिवार्यता लागू की,लेकि...
-
आकाशवाणी नागपुर केन्द्र में संविधान निर्माता विश्वभूषण डा. बाबासाहेब अम्बेडकर की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई। पिछले वर्ष से ही आकाशवाणी...
No comments:
Post a Comment