Friday, August 9, 2024

हर घर तिरंगा’ अभियानाचा थाटात शुभारंभ मनपात अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली “तिरंगा प्रतिज्ञा”

नागपूर:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या हर घर तिरंगा’ या अभियानाचा नागपूर महानगरपालिकेमध्ये थाटात शुभारंभ झाला. अभियानांतर्गत शुक्रवारी (ता.९) नागपूर महानगरपालिकेत तिरंगा प्रतिज्ञा’ घेण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना तिरंगा शपथ’ दिली.सदर अभियान देशवासीयांच्या हृदयात देशभक्तीची भावना वृदिंगात करेल तसेच राष्ट्रध्वजाप्रती अधिक सन्मान जागृत करेल. गेल्या दोन वर्षांपासून राज्यभर सुरू असलेले हे अभियान आता लोकचळवळ बनले आहे. यावर्षी देखील नागपूर शहरात मोठ्या उत्साहाने अभियान राबविण्याचा निर्धार मनपातर्फे करण्यात आला असल्याचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांनी मी शपथ घेतो कीमी आपला तिरंगा ध्वज 

फडकवेलस्वातंत्र्यसैनिक व वीर हुतात्म्ये यांच्या भावनांचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन. या आशयाची प्रतिज्ञा दिली.यावेळी अतिरिक्त आयुक्तद्वय श्रीमती आंचल गोयलश्री अजय चारठाणकरउपायुक्त सर्वश्री प्रकाश वराडेश्री. मिलिंद मेश्रामडॉ. रंजना लाडेडॉ. गजेंद्र महल्लेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरसहायक आयुक्त सर्वश्री. हरिश राऊतप्रमोद वानखेडेश्याम कापसेमुख्य अग्निशमन अधिकारी बी. पीचंदनखेडेशिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामउद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपागरक्रीडा अधिकारी डॉ. पीयूष अंबुलकरजनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.नागपूर महानगरपालिकेतर्फे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. यात नागपूर शहराचाही उत्स्फूर्त सहभाग राहील. शहरात देशभक्तीपर वातावरण निर्मितीसाठी मनपा कार्यरत आहेअसे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी माध्यमांना सांगितले.हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून या कालावधीमध्ये 
तिरंगा यात्रातिरंगा रॅलीतिरंगा दौडतिरंगा कॉन्सर्टतिरंगा कॅनव्हॉसतिरंगा शपथतिरंगा सेल्फीतिरंगा मानवंदनातिरंगा मेला आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांचे योग्यरित्या नियोजन करून यामध्ये विद्यार्थीनागरिकमहिला या सर्वांनाच सहभागी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहेअसे ही मनपा आयुक्तांनी सांगितले.शहरातील प्रमुख ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारुन येथे नागरिकांना तिरंगा शपथ घेण्याबाबत व्यवस्था करावी. तसेच नागरिकांना अत्यंत कमी दरात कापडी तिरंगा उपलब्ध व्हावा याकरिता दहाही झोन सह प्रमुख ठिकाणी स्टॉल उभारण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहे.हर घर तिरंगाअभियानाच्या कालावधीमध्ये शहरातील राम झुला तसेच प्रमुख ठिकाणी तिरंगी रोषणाई करण्याचे ही निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विभागाला दिले आहे. घर हर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर घराघरात पोहोचविला जात आहे. या अभियानामध्ये सहभागी होउन तिरंग्यासोबत सेल्फी काढून ती हर घर तिरंगा च्या संकेतस्थळावर अपलोडक करण्याचे दिशानिर्देश केंद्र शासनाद्वारे जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सेल्फीसाठी मनपा मुख्यालयात तिरंगा ठेवण्यात आलेला आहे. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील तळमजल्यावर मोठा तिरंगा ठेवण्यात आलेला आहे. या तिरंग्यासोबत सेल्फी काढून अधिकारी आणि कर्मचारी https://harghartiranga.com/ या संकेतस्थळावर अपलोड करीत आहेत.

No comments:

Post a Comment

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...