Tuesday, March 25, 2025

भगवान महावीर' आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत 'नागपुर' जिल्ह्याने 'तिसरा क्रमांक' पटकावला

नागपूर:- महावीर जैन यांचे सिद्धांत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र सरकारतर्फे  'भगवान महावीर २५५० वा निर्वाण कल्याणक महोत्सव समितीतर्फे भगवान महावीरांच्या जीवन चारित्र्यावर आधारीत राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  होते. यात सर्वाधिक सहभागिता श्रेणीमधुन राज्यस्तरावर 'नागपुरजिल्ह्याने 'तिसरा क्रमांकपटकावला असून जिल्हा नियोजन कार्यालय नागपूर येथे मंगळवारी (ता. २५) रोजी महाराष्ट्र सरकारतर्फे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगलजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच निबंध स्पर्धेत जिंकलेल्या शालेय विध्यार्थाचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी मनपा अति. आयुक्त श्री. अजय चारठाणकरशिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामजैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. ललित गांधीसमितीचे सदस्य श्री. निखिल कुसुमगरश्री. अनिल जैनश्रीमती पायल मेहताश्री. प्रफुल पारेखॲड .प्रीती रांकारिचा जैन,  नवकार बचत गट यांच्यासह इतर शालेय विध्यार्थी उपस्थित होते. भगवान महावीर स्वामींच्या 
२५५० व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्तमहाराष्ट्र सरकारतर्फे भगवान महावीर स्वामींच्या चरित्रावर आधारित भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील १,०४,००० शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात ५ ते ७ वर्ग व ८ ते १० व्या वर्गाच्या विविध शाळेतील विध्यार्थानी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या जीवनात भगवान महावीरांची अहिंसाविश्वास आणि भक्तीची तत्त्वे रुजविणे हा होता. या स्पर्धेमुळे विध्यार्थ्यानी भगवान महावीर स्वामींची पुस्तके वाचली. त्यांचे विचार- मूल्ये समजण्याचा प्रयत्न केला व विध्यार्थ्यानी ते निबंधात उतरविले. या स्पर्धेत पहिले पारितोषिक कोल्हापूर जिल्ह्यानेदुसरे पारितोषिक नाशिक जिल्ह्याने आणि तिसरे पारितोषिक नागपूर जिल्ह्याने जिंकले आहे. या स्पर्धेत नागपूर जिल्हा पातळीवरही अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये प्राची ओमप्रकाश बिसेनपूर्वी गेडाममानसी कलसुरेकुशांक देशमुखइशिता सरदकर वेंकट डोंपालाआराध्या जैनस्वरा गोइरखडेमानसी रामटेके आणि मोक्षदा टेंबुरकर यांचा  मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

कुष्ठरोग निर्मुलनासाठी समन्वयाने कार्य करा : डॉ. दीपक सेलोकर मनपा मध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा

नागपूर:- कुष्ठरोग हा आजार सर्वांसाठीच मोठे आव्हान आहे. कुष्ठरुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना सुरु आहेत. अशात कुष्ठरुग्णांचा शोध घेन त्यांना उपाचाराखाली आणणे व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे. कुष्ठरोग निर्मूलनासाठी मनपाअधीक्षक नागरी कुष्ठरोग पथक (SULU), शासकिय व खासगी डॉक्टर्स या सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहेअसे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सोमवारी (ता.२४) वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्टर्स करिता राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. सेलोकर बोलत होते. कार्यशाळेत सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. विजय डोईफोडेमनपा अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवारलता मंगेशकर हॉस्पिटलचे कुष्ठरोग विभाग प्रमुख डॉ. सुशील पांडेअधीक्षक नागरी कुष्ठरोग पथक -३ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्दीक अहमद शेखडॉ. संजय पुलकवारडॉ. शाजीया 
शम्सडॉ. दिपिका साकोरेडॉ. महेंद्र चांदुरकरमनपाचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळेडॉ. दीपांकर भिवगडेपीएचयू अर्चना खाडे यांच्यासह मोठ्या संख्येत आरोग्य अधिकारीखासगी डॉक्टर्स आदी उपस्थित होते. पूर्व विदर्भात कुष्ठरोगाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. नागपूर शहरातही कुष्ठरुग्णांची संख्या ही दखलपात्र आहे. कुष्ठरोग या आजाराच्या निर्मूलनासाठी रुग्णांना उपचाराच्या कक्षेत आणणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराची इतर आजारांप्रमाणे तीव्र लक्षणे नसल्यामुळे रुग्णालाही आपल्याला कुष्ठरोग आहे हे कळत नाही. अशात अशा रुग्णांचा शोध घेणे आव्हानात्मक ठरते. या स्थितीत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. कुष्ठरोग व त्याचे प्रकार ओळखणे आवश्यक आहे. मनपाच्या आशा सेविका घरोघरी जातात. त्यांच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांचा शोध घेता ये शकतो. याशिवाय प्रत्येक पांढरा किंवा लाल चट्टा हा कुष्ठरोग असू शकत नाहीत्यामुळे चाचणी आणि निदान यादृष्टीने लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक रुग्ण त्वचेवरील चट्टाडाग यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये जातात. अशात त्यांची नोंद घेऊन त्यांची माहिती मनपाला देणे आवश्यक आहे. कुष्ठरोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने समन्वयाने काम करण्याचे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले. कार्यशाळेमध्ये सहायक संचालक कुष्ठरोग 

डॉ. विजय डोईफोडे यांनी कुष्ठरोगाची होणारी लागणत्याची जगभरातील स्थिती आणि भारतातील संख्या या सर्वांचा उहापोह केला. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक कुष्ठरुग्ण असून त्यातीत सर्वात जास्त गडचिरोली जिल्ह्यात आढळतात. पाठोपाठ चंद्रपूरगोंदियाभंडारा आणि नागपूरचा क्रमांक आहे. कुष्ठरोग जीवघेणा आजार नाही पण तो निष्काळजीपणामुळे वाढतो. वेळीच उपचाराने कुष्ठरोग बरा होतो. त्यामुळे रुग्णांचा शोध घेणे हे सर्वात महत्वाचे आहेअसे सांगत त्यांनी येत्या काळात सर्वांनी समन्वयातून सर्वाधिक रुग्ण शोधण्याचे आवाहन यावेळी केले. लता मंगेशकर हॉस्पिटलचे कुष्ठरोग विभाग प्रमुख डॉ. सुशील पांडे यांनी कुष्ठरोगाबाबत सविस्तर माहिती दिली. कुष्ठरोग हा रुग्णाच्या जीवनशैलीवर प्रभाव करतो. त्यामुळे रुग्णाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असते. त्यासाठी रुग्णाचे योग्य निदान आवश्यक आहे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला शरीरावरील डागचट्टे याविषयी विचारणा करुन त्याची नोंद ठेवल्यास पुढील उपचारासाठी मदत होउ शकतेअसेही ते म्हणाले. कार्यशाळेत डॉ.दिपिका साकोरे यांनी देखील माहिती दिली.कार्यशाळेच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यशाळेचे संचालन पीएचयू अर्चना खाडे यांनी केले व डॉ. शाजीया शम्स यांनी आभार मानले.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 45 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  मंगळवार (25)  रोजी शोध पथकाने  45  प्रकरणांची नोंद करून  रु.30,300/-  रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत  11  प्रकरणांची नोंद करून  रु.4,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रु.100/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत  07 प्रकरणांची नोंद करून रु.2,800/- रुपयांची वसुली करण्यात आली.  मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी 
रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु.8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्यांचा कचर रस्ता, फुटपाथ मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1  प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे व साठवणे टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रु.1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून रु.3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 08 प्रकरणांची नोंद करून रु.8,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. विनर इन्स्टीटयूट यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. हनुमान नगर झोन अंतर्गत अतुलेश कॉन्हवेंट ॲन्ड हाय सकुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला आणी आरॅन बिल्डर्स ॲन्ड डेव्लपर्स यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधी बाग झोन अंतर्गत मे. किरन स्वीट भंडार यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.



सतरंजीपुरा झोन अंतर्गत स्वयम स्वीट्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला . लकडगंज झोन अंतर्गत राकेश सालविया यांनी  रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 06 प्रकरणांची नोंद करून रू. 30,000/- दंड वसूल केला.

Monday, March 24, 2025

मनपा शाळेतील विद्यार्थीनींना मिळणार वर्षाला ४ हजार रुपये,मनपातर्फे "बेटी बचाओ-बेटी पढाओ" संकल्पनेला पाठबळ

नागपूर:- नागपूर महानगरपालिकातर्फे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’  या संकल्पनेला पाठबळ देण्याकरीता मनपा शाळांध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनींना प्रत्येक वर्षी ४ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.  महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी (ता. २१ मार्च) सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या संकल्पनेद्वारे महापालिका शाळांमधील मुलींचा टक्का वाढावा यासाठी ही विशेष तरतूद केली आहे. महानगरपालिका शाळांध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असतात. शाळांमध्ये मुलींचे प्रमाण वाढावेत्यांना शिकतांना कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १ ते १२ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व  ८० टक्केच्या वर उपस्थिती असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यींनीना थेट त्यांच्या खात्यावर प्रतिवर्षी ४ हजार रुपये पैसे जमा केले जाणार आहे. याकरीता महापालिकेच्या अर्थसंकल्पात २. १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.# समुपदेशक 
करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:- नागपूर महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दैनंदिन आयुष्यात अनुभवाव्या लागणाऱ्या समस्या त्यातून त्यांना येवू शकणारे नैराश्य टाळण्यासाठी  या वर्षापासून मनपा शाळातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच शहरातील इतर ही विद्यार्थी ज्यांना समुपदेशनाची गरज असेल त्यांना टेलीकॉन्फसरिंगद्वारे समुपदेशन उपलब्ध करून दिले जाईल. याकरिता अर्थसंकल्पात १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.# मनपा शाळांमध्ये बालवाडीची सुरुवात:- नवीन शैक्षणिक धोरणान्वये प्राथमिक शाळांसोबत बालवाडी/ पूर्वप्राथमिक वर्ग संलग्न करून वयाच्या ३ वर्षांपासून बालकांच्या शिक्षणाची सुरुवात केली
जाईल. पूर्वप्राथमिक वर्ग मुलां-मुलींच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा असून यात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन लाभले तर त्याचा त्यांना पुढील शिक्षणात लाभ निश्चित होतो. ज्या बालवाडीमध्ये  २० पेक्षा जास्त विद्यार्थी  आहेतत्या शाळांमध्ये पूर्वप्राथमिक वर्गाना शिकवणारे प्रशिक्षित शिक्षक नियुक्त केले जाईल. यासाठी 55 लाख तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.# स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण सुपर 75:- नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीवैद्यकीयसीएएनडीए इत्यादीमध्ये यश मिळावेयाकरीता महानगरपालिकेतर्फे सुपर ७५ ची सुरुवात करण्यात आली आहे. या मार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 


या परीक्षांच्या प्रवेशपूर्व परीक्षा तयारी करीता खाजगी शिकवणी वर्गांच्या सहकार्याने दरवर्षी महापालिकेच्या शाळांमधील  ८ व्या वर्गातील प्रथम ७५ गुणवंत विद्यार्थ्यांची परिक्षेद्वारा निवड केली जाईल. त्यांना १० वी पर्यंत विशेष शिकवणी वर्ग मनपाच्या नेताजी मार्केट शाळेत दर शनिवार व रविवार तसेच इयत्ता १० वी नंतर स्पर्धा परीक्षाचे प्रशिक्षण देऊन तयारी करून घेतली जाईल.
  या विद्यार्थ्यांना  गणवेशपाठयपुस्तकबॅगप्रवास भत्ता इ. सुविधा मनपातर्फे देण्यात येतात.# कौशल्य विकासावर भर:- नवचेतना कार्यक्रमाअंतर्गत १८ शाळांमध्ये १४ डिजिटल बोर्ड व पाच शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब देण्यात आले. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित होण्यास मदत मिळणार आहे.# स्टेम व रोबोटिक लॅब:- महापालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धींगत व्हावा याकरीता २ कनिष्ठ महाविद्यालय व ३ माध्यमिक शाळांमध्ये अभ्यासक्रमावर आधारीत अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत तसेच पुढील वर्षी STEM  ROBOTICS lab उभारण्यात येणार आहे.

क्षयरोग रुग्णाविषयी डॉक्टरांनी संवेदनशील असणेची गरज डॉ.दिपक सेलोकर यांचे प्रतिपादन

नागपूर:- रुग्णालयात येणाऱ्या क्षयरोग रुग्णाविषयी डॉक्टरांनी संवेदनशील असण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी केले.मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सोमवारी (ता.24) केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत 100 दिवसीय क्षयरोग दुरीकरण मोहिम तसेच 24 मार्च रोजीच्या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्षयरोग विभाग प्रमुख प्रा. डॉ राधा मुंजे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार,  सहयोगी प्राध्यापक डॉ. ग्यानशंकर मिश्रा(मेयो)डॉ. अर्चना खाडे व सर्व झोनल वैद्यकिय अधिकारी,  टी.बी. समन्वयक यावेळी उपस्थित होते. डॉ.दिपक सेलोकर म्हणाले कीराष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण 
कार्यक्रमाविषयी गंभीरता असणे आवश्यक आहे. क्षयरोगाचे रुग्ण शोधणेत्यांच्यावर उपचार करणेया आजाराचा प्रसार होणार नाही याकरीता आवश्यक ती खबरदारी घेणेत्याकरिता गंभीररित्या देखरेख ठेवणे गरजचे आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांप्रती संवेदनशील असण्याची गरज आहे. क्षयरोगाचा आजार कमी करणे आपले उदिदष्ट असले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्षयरोग विभाग प्रमुख प्रा. डॉ राधा मुंजे यांनी सांगितले कीक्षयरोग या आजाराप्रती  लोकांच्या मनात चुकीची संकल्पना आहे, टीबी  हा एक जुना आजार आहे. यामुळे लोकांच्या मनात पूर्वीपासूनच टीबी बद्दल  शंका आणि भीती आहे. पूर्वीपासून टीबी  या रोगाशी सामाजिक नकारात्मकता जोडली गेली आहे. एकप्रकारे टीबी या नावाला स्टिग्मा जुडलेले आहे. यामुळे ते दूर करण्याची गरज आहे.  स्टीग्माला योग्यप्रकारे समोर गेले तर अनेक आजार कमी होऊ शकतो असे डॉ. मुंजे यांनी सांगितले. यावेळी श्रीमती सीमा पाटीलविजय डोमकावळेतुषार कावळे यावेळी उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 67 प्रकरणांची नोंद,उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  शुक्रवार (24)  रोजी शोध पथकाने  67  प्रकरणांची नोंद करून  रु.63,200/-  रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत  22  प्रकरणांची नोंद करून  रु.9,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.300/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत  09 प्रकरणांची नोंद करून रु.3,600/- रुपयांची 
वसुली करण्यात आली.  मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 08 प्रकरणांची नोंद करून रु.17,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्यांचा कचर रस्ता, फुटपाथ मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1  प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 31 प्रकरणांची नोंद करून रु.6,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून रु.13,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.  हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. गायत्री अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  
धरमपेठ झोन अंतर्गत मे. ओ. नो. होस्टेल यांनी वसतिगृहांमध्ये अन्नपदार्थ टाकून चेंबर लाईनमध्ये अडथळा आणणे आणि हरित न्यायाधिकरण कायद्या अंतर्गत रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. माय मोमो फाक्ट्री यांनी चेंबरमध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला  प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत सरस्वती शीशू मंदीर ॲन्ड प्ले स्कूल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला.   नेहरू नगर झोन अंतर्गत मे. पाटील क्लासेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला व मे. कीट्स मेंटोर ग्लोबल सकुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.  

गांधी बाग झोन अंतर्गत मे. तकदीर आईस गोला यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल
 रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला व मे. जैन स्वीट्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  आशी नगर झोन अंतर्गत श्रीमती. सोनाली तांबे यांनी अंडरग्राउंड कनेक्शनसाठी पाईपलाईन बसवण्यासाठी खोदकाम केल्याने सर्व्हिस रॉडचे नुकसान केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. मलिक फॅशन ॲन्ड लाइफ स्टाईल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू. 70,000/- दंड वसूल केला.

Tuesday, March 18, 2025

नगर निगम कर्मचारियों की कर्तव्यपरायणता तनावग्रस्त क्षेत्रों में तत्काल सफाई की गई

 नागपुर:- सोमवार रात मध्य नागपुर क्षेत्र में कुछ उपद्रवियों द्वारा आगजनी और तोड़फोड़ करने के बाद, नागपुर नगर निगम के ठोस अपशिष्ट प्रबंधन विभाग के कर्मचारियों ने उस रात क्षेत्र की सफाई करके कर्तव्य का उदाहरण पेश किया। नागपुर के हंसपुरी , चिटणीस पार्क , अग्रसेन चौक , शिर्के गली , भालदारपुरा , सेंट्रल एवेन्यू , मोमिनपुरा और शिवाजी पुतला इलाकों में सोमवार रात दो समूहों के बीच अचानक तनाव पैदा हो गया कई वाहन जलकर राख हो गए और कई सार्वजनिक संपत्तियों को भी नुकसान पहुंचा। सड़क पर टूटी हुई गाड़ियों की खिड़कियों के मलबे से ढकी हुई थी। वाहनों के टायरों के टुकड़े सड़क पर बिखर गए। इस सामाजिक बुराई के कारण क्षेत्र में सड़कों पर कांच, पत्थर और अन्य वस्तुएं बिखर गईं। इससे यातायात जाम हो गया। इस तनावपूर्ण स्थिति में नगर निगम के ठोस कचरा प्रबंधन विभाग के कर्मचारी रात में ड्यूटी पर नजर आए और इन असामाजिक तत्वों की हरकतों के कारण क्षेत्र की सभी सड़कों पर कचरे के ढेर जमा हो गए  इन सड़कों को यातायात के लिए उपयुक्त बनाना आवश्यक था।

नगर निगम के ठोस अपशिष्ट प्रबंधन विभाग के मुख्य सफाई अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले ने तुरंत इस घटना पर ध्यान दिया। नगर आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी से चर्चा के बाद इस क्षेत्र में ठोस अपशिष्ट विभाग के कर्मचारियों को तुरंत तैनात करने का निर्णय लिया गया। कर्मचारियों ने इस आपातकाल के दौरान अपने कर्तव्यों का पालन किया  इस अभियान में नगर निगम के ठोस अपशिष्ट प्रबंधन विभाग के लगभग 50 कर्मचारियों ने भाग लिया। इसके कारण मंगलवार सुबह क्षेत्र में यातायात से नागरिकों को किसी प्रकार की असुविधा नहीं हुई। नगर आयुक्त एवं प्रशासक डॉ. चौधरी ने ठोस अपशिष्ट प्रबंधन विभाग के इन कर्मचारियों को बधाई दी।

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...