Tuesday, March 25, 2025

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 45 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  मंगळवार (25)  रोजी शोध पथकाने  45  प्रकरणांची नोंद करून  रु.30,300/-  रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत  11  प्रकरणांची नोंद करून  रु.4,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रु.100/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत  07 प्रकरणांची नोंद करून रु.2,800/- रुपयांची वसुली करण्यात आली.  मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी 
रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु.8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्यांचा कचर रस्ता, फुटपाथ मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1  प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे व साठवणे टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रु.1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून रु.3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 08 प्रकरणांची नोंद करून रु.8,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. विनर इन्स्टीटयूट यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. हनुमान नगर झोन अंतर्गत अतुलेश कॉन्हवेंट ॲन्ड हाय सकुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला आणी आरॅन बिल्डर्स ॲन्ड डेव्लपर्स यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधी बाग झोन अंतर्गत मे. किरन स्वीट भंडार यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.



सतरंजीपुरा झोन अंतर्गत स्वयम स्वीट्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला . लकडगंज झोन अंतर्गत राकेश सालविया यांनी  रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 06 प्रकरणांची नोंद करून रू. 30,000/- दंड वसूल केला.

No comments:

Post a Comment

शालार्थ आईडी घोटाला:प्रधानाचार्य तो केवल नाममात्र के हस्ताक्षरकर्ता हैं; असली साजिशकर्ता तो संस्था के निदेशक हैं? विदर्भ शिक्षक संघ का प्रश्न

[Demo Pick]  नागपुर: - विदर्भ शिक्षक संघ ने इस बात पर कड़ी नाराजगी जताई है कि राज्य में चल रहे शलार्थ आईडी घोटाले की जांच में केवल उन्हीं प्...