नागपूर:- नागपूर
महानगरपालिकातर्फे ‘बेटी
बचाओ-बेटी पढाओ’ या संकल्पनेला पाठबळ देण्याकरीता
मनपा शाळांध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनींना प्रत्येक वर्षी ४ हजार रुपयांची
आर्थिक मदत केली जाणार आहे. महापालिका
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी (ता. २१ मार्च) सादर केलेल्या
अर्थसंकल्पात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या संकल्पनेद्वारे महापालिका शाळांमधील मुलींचा टक्का
वाढावा यासाठी ही विशेष तरतूद केली आहे. महानगरपालिका
शाळांध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असतात. शाळांमध्ये
मुलींचे प्रमाण वाढावे, त्यांना
शिकतांना कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १
ते १२ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या व ८०
टक्केच्या वर उपस्थिती असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यींनीना थेट त्यांच्या खात्यावर
प्रतिवर्षी ४ हजार रुपये पैसे जमा केले जाणार आहे. याकरीता महापालिकेच्या
अर्थसंकल्पात २. १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.# समुपदेशक
करणार
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:- नागपूर महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना
दैनंदिन आयुष्यात अनुभवाव्या लागणाऱ्या समस्या त्यातून त्यांना येवू शकणारे
नैराश्य टाळण्यासाठी या
वर्षापासून मनपा शाळातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच
शहरातील इतर ही विद्यार्थी ज्यांना समुपदेशनाची गरज असेल त्यांना
टेलीकॉन्फसरिंगद्वारे समुपदेशन उपलब्ध करून दिले जाईल. याकरिता अर्थसंकल्पात १
कोटीची तरतूद करण्यात आली आहे.# मनपा
शाळांमध्ये बालवाडीची सुरुवात:- नवीन शैक्षणिक धोरणान्वये प्राथमिक शाळांसोबत
बालवाडी/ पूर्वप्राथमिक वर्ग संलग्न करून वयाच्या ३ वर्षांपासून बालकांच्या
शिक्षणाची सुरुवात केली
जाईल. पूर्वप्राथमिक वर्ग मुलां-मुलींच्या जडणघडणीतील
महत्त्वाचा टप्पा असून यात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन लाभले तर त्याचा
त्यांना पुढील शिक्षणात लाभ निश्चित होतो. ज्या बालवाडीमध्ये २० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, त्या
शाळांमध्ये पूर्वप्राथमिक वर्गाना शिकवणारे प्रशिक्षित शिक्षक नियुक्त केले जाईल.
यासाठी 55 लाख
तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.# स्पर्धा
परीक्षांचे प्रशिक्षण – सुपर 75:- नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील
विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय, सीए, एनडीए
इत्यादीमध्ये यश मिळावे, याकरीता
महानगरपालिकेतर्फे सुपर ७५ ची सुरुवात करण्यात आली आहे. या मार्फत विद्यार्थ्यांना
स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या परीक्षांच्या प्रवेशपूर्व
परीक्षा तयारी करीता खाजगी शिकवणी वर्गांच्या सहकार्याने दरवर्षी महापालिकेच्या
शाळांमधील ८ व्या वर्गातील प्रथम
७५ गुणवंत विद्यार्थ्यांची परिक्षेद्वारा निवड केली जाईल. त्यांना १० वी पर्यंत
विशेष शिकवणी वर्ग मनपाच्या नेताजी मार्केट शाळेत दर शनिवार व रविवार तसेच इयत्ता
१० वी नंतर स्पर्धा परीक्षाचे प्रशिक्षण देऊन तयारी करून घेतली जाईल.
या विद्यार्थ्यांना गणवेश, पाठयपुस्तक, बॅग, प्रवास भत्ता इ. सुविधा मनपातर्फे देण्यात येतात.# कौशल्य विकासावर भर:- नवचेतना कार्यक्रमाअंतर्गत १८ शाळांमध्ये १४ डिजिटल
बोर्ड व पाच शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब देण्यात आले. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये
कौशल्य विकसित होण्यास मदत मिळणार आहे.# स्टेम
व रोबोटिक लॅब:- महापालिकेत
शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धींगत व्हावा याकरीता २ कनिष्ठ
महाविद्यालय व ३ माध्यमिक शाळांमध्ये अभ्यासक्रमावर आधारीत अत्याधुनिक
विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत तसेच पुढील वर्षी STEM व ROBOTICS
lab उभारण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment