Thursday, January 30, 2025

हुतात्मांना मनपा तर्फे विनम्र अभिवादन

नागपूर :भारताच्या स्वातंत्र्याकरीता असंख्य देशभक्तांची प्राणार्पंण केले अशा हुतात्मा देशभक्तांचे स्मरण करुन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन मिनिट मौन पाळून हुतात्मा  दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयामध्ये महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला तसेच थोर हुतात्म्यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करुन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अभिवादन केले. याप्रसंगी उपायुक्त श्रीमती विजया बनकरसहायक आयुक्त श्री. श्याम कापसेमुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी.चंदनखेडेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरसहायक संचालक नगर 
रचना श्री. ऋतुराज जाधवजनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनीसहायक अधीक्षक श्री. राजकुमार मेश्राम आदी उपस्थित होते. शहरात विविध ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला देखील मनपाद्वारे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आणि गांधीसागर बालोद्यान येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. जनसंपर्क विभागाचे अमोल तपासेश्री शैलेश जांभुळकरमाजी नगरसेवक श्री. मनोज साबळे श्री. राजेश कुंभलकर, डॉ. पांडे यांच्यासह पोलिस आणि अग्निशमक दलाचे जवान यांनी हुतात्मांच्या स्मृतींना अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...