Tuesday, May 28, 2024

किटकजन्य आजारांपासून सतर्कतेसाठी यंत्रणा सज्ज ठेवा - अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी घेतली बैठक

 नागपूर:- पावसाळ्यात उद्भवणा या डेंग्यूमलेरिया  चिकनगुनिया यासारख्या  किटकजन्य आजारांपासून  सतर्कतेसाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दिले.
मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी(ता.२८) 'राष्ट्रीय किटकजन्य  रोग नियंत्रण  कार्यक्रम 2024' अंतर्गत 'किटकजन्य आजार  डेंग्यूसंदर्भात बैठक घेण्यात आली. बैठकीत  उपायुक्त  श्री.प्रकाश वराडेउपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉगजेंद्र महल्लेअधीक्षक अभियंता डॉश्वेता बॅनर्जीवैद्यकीय 
आरोग्य अधिकारी डॉदीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉनरेंद्र बहिरवारमलेरिया फायलेरिया अधिकारी डॉमंजुषा मठपती यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होतेयावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना दिल्यातसेच डेंग्यूहत्तीरोगमलेरियाचिकनगुनियास्क्रब टायफस यासारख्या किटकजन्य आजारांपासून सतर्कतेसाठी उपाय योजना तयार ठेवण्याचे निर्देश दिलेयाशिवाय पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाणीसाचण्याची जागाबाजारपेठ परिसर आदी ठिकाणांचे सर्वेक्षण करून येथे गप्पीमासे सोडावेतस्थानिक नागरिकांना 'किटकजन्य आजार  डेंग्यू’ यासंदर्भात जनजागृत करण्यात यावेडेंग्यू नियंत्रण कक्ष आणि संपर्क क्रमांकाची तपासणी करून घ्यावीपुरेशा स्वरुपात धूरफवारणी मशीन असले असे नियोजन करावे 



असे निर्देशही  अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी दिले आहेबैठकीत सर्वप्रथम मलेरिया फायलेरिया अधिकारी डॉमंजुषा मठपती यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे 'किटकजन्य आजार  डेंग्यूसंदर्भात माहिती दिली.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...